(फोटो सौजन्य - सोशल मीडिया) 
Business

Tomato Price Drop : शेतकऱ्यांची नामुष्की! लागवडीचा खर्चही पाण्यात, दरात मोठी घसरण; 20 किलोच्या क्रेटला अवघा 100 ते 125 रुपयांत

Tomato Price Drop : टोमॅटो उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. टोमॅटोच्या दरात प्रचंड घसरण झाली आहे. त्यामुळे २० किलोच्या क्रेटला अवघा १०० ते १२५ रुपये दर मिळत आहे. या पडत्या भावामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटांत सापडला आहे.

Ankita Karangutkar
  • टोमॅटोच्या दरात मोठी घसरण!
  • २० किलोच्या क्रेटला अवघा १०० रुपये दर
  • शेतकरी झाला हवालदिल

Tomato Price Drop :  एकीकडे महागाईचा भडका उडाला असताना साखर कांद्याचे दर गगनाला भिडले असताना मात्र मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची लागवड करण्यात आली आहे. परिणामी बाजारातील आवक वाढल्याने टोमॅटोसह बहुतांश फळभाज्या आणि पालेभाज्यांजे दर गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर घसरले आहेत. टोमॅटोचा दर तर बराच आपटला आहे. 20 किलो क्रेटला 100 ते 125 रुपयांचा दरच मिळत आहे. ( Tomato Price Drop ) 

टोमॅटोचा दर 5 ते 6 रुपये किलो

गेल्या महिन्यात 80 ते 100 रुपये किलोपर्यंत पोहोचलेला टोमॅटो सध्या बाजारात 20 किलो क्रेटला 100 ते 125 रुपयांचा दरच मिळत आहे. या दरात उत्पादनाचा खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. नाशिक जिल्ह्यात अनेक भागात शेतकऱ्यांनी मोठा खर्च करत टोमॅटोची लागवड केली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून मात्र या मेहनतीला काही फळ मिळत नाही. टोमॅटोचा दर लक्षणीय घसरत आहे. साध्या 20 किलोच्या टोमॅटोच्या क्रेटला अवघा 100 ते 125 रुपये म्हणजे 5 ते 6 रुपये किलोचा दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

या कारणामुळे कोसळले दर

काही दिवसांपूर्वी उष्णतेची तीव्रता आणि पावसाने घेतलेल्या दीर्घ विश्रांतीमुळे भाजीपाल्याची आवक घटली होती. त्यामुळे टोमॅटोसह भाज्यांचे दर वाढले होते. मात्र, सध्या शेततळ्यांमध्ये उपलब्ध पाण्याच्या जोरावर शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवड केली आहे. कमी कालावधीत उत्पादन मिळत असल्याने शेतकरी पारंपरिक पिकांऐवजी भाजीपाला पिकांकडे वळले आहेत. परिणामी बाजारातील आवकेवर झाला असून दर खाली आले आहे.

शेतकऱ्याचा खर्चही निघेना

शेतकऱ्यांना मोठा संकटाचा सामना करावा लागत आहे. पीकाला मिळत असलेला दर शेतकऱ्यांसाठी धक्का देणारा ठरत आहे. यातून लागवडीसाठी केलेला खर्च शिवाय तोडणीचा खर्च, गाडीचे भाडे वसूल होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना बऱ्याच नुकसानाला सामोरं जावं लागत आहे.

यासगळ्या पलीकडे तयार झालेलं पीक बाजारात विकलं जात नाही हे वेगळं मोठं टेन्शन शेतकऱ्यांसमोर उभं ठाकलं आहे. पिकलेल्या टोमॅटो व्यापारी घेत नसल्याने तो उकिरड्यावर फेकून द्यायची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास अशा पद्धतीने हिरावून घेतला जात असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात पुरंदर विमानतळाचा मुद्दा गाजणार; भूसंपादन अधिकाऱ्यांवर तारांकित प्रश्न

Alice Huang : चीनचा मोठा 'AI' डाव उघड! कथित गुप्तहेर ॲलिस हुआंगच्या नेटवर्कला तब्बल 2491 कोटींचा निधी; अमेरिकेची मोठी कारवाई

Tata Group : Noel Tata विरुद्ध N Chandrasekaran वाद कोर्टात! बॉम्बे हायकोर्टात कायदेशीर लढाईची तयारी; काय निर्णय होणार?

Amravati News: ६९ गावांत १०% पाणीकपात! १ डिसेंबरपासून अंमलबाजावणी; उन्हाळ्यापूर्वीच उद्भवणार जलसंकट

Harshad Atkari: ५० ATKT अन् गावभर नापासाचे होर्डिंग्ज! हर्षद अतकरीने सांगितला भूमिकेमागचा भन्नाट किस्सा!