एका उसनवारीच्या वादातून घडलेल्या क्रूर कृत्याचा पोलिसांनी असा लावला छडा (Photo Credit - X) 
क्राईम

जळकोट ते पुणे... खुनी महिलेचा प्रवास! एका उसनवारीच्या वादातून घडलेल्या क्रूर कृत्याचा पोलिसांनी असा लावला छडा

तुळजापूर तालुक्याच्या जळकोट येथील सुभद्रा रामशेट्टी पाटील या महिलेचा तीच्या राहत्या घरी अज्ञात व्यक्तीने गळा आवळून खून केला होता. तीच्या अंगावरील तब्बल चार लाख किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले होते.

नितिन कुऱ्हे
  • जळकोट वृद्धेच्या खून प्रकरणी पुण्यातून एका महिलेस अटक
  • उसनवारीतून केला खून
  • पोलिसांनी लावला दोन दिवसात छडा

धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी: दिलेल्या उसन्या पैशासाठी तगादा लावणाऱ्या एका ६० वर्षीय वृद्धेचा गळा आवळून मध्यरात्री खून करणाऱ्या शेजारील महिलेस स्थानिक गुन्हे शाखेने पुणे येथून गजाआड केले आहे. ही घटना तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे शुक्रवारी (२१ नोव्हेंबर) घडली होती. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी याचा तपास दोन दिवसांत लावला आहे.

चार लाख किमतीचे सोन्याचे दागिने लंपास

तुळजापूर तालुक्याच्या जळकोट येथील सुभद्रा रामशेट्टी पाटील या महिलेचा तीच्या राहत्या घरी अज्ञात व्यक्तीने गळा आवळून खून केला होता. तीच्या अंगावरील तब्बल चार लाख किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. या प्रकरणी नळदुर्ग (ता. तुळजापूर) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्याचे आव्हान लक्षात घेत पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे याचा तपास दिला होता.

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार यांनी घटनास्थळी जाऊन सर्व बाजूंनी तपास सुरू केला होता. दरम्यान, त्यांना मिळालेल्या तांत्रिक माहितीतून घटनास्थळी एक महिला सातत्याने आणि संशयास्पद फिरत असल्याचे त्यांना आढळून आले. तीच्या बाबत केलेल्या अधिक चौकशीतून याच परिसरात राहणारी वनिता झुंबर सुरवसे ही त्या महिलेची ओळख निघाली. तीच्या मुलाकडे तीच्या बद्दल विचारणा केली असता, ती पुण्याला गेल्याचे समजले. लगेच एक पथक पुण्याला रवाना करण्यात आले. तीथे ती भिगवण येथील तीच्या मुलीकडे ती आढळून आली.

तीने पोलिसांना या खुनाची कबुली दिली असून दागिने गहाण ठेऊन मयत वृद्धेकडून तीने ४० हजार रुपये उसने घेतले होते. या रकमेसाठी वृद्धेकडून सारखा तगादा होता. यामुळे चिडलेल्या वनिताने त्या वृद्धेचा शुक्रवारी मध्यरात्री गळा आवळून खून करत वृद्धेच्या अंगावरील दागिने घेऊन पोबारा केला होता. दरम्यान पुढील तपासासाठी वनिताला नळदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या खून प्रकरणातील आरोपीचा पोलिसांनी केवळ दोन दिवसात छडा लावला असून लोकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

Winter fashion: हिवाळ्यात कपडे खरेदी करताना निवडा हे ७ खास फॅब्रिक्स; लोकरीपासून फ्लिसपर्यंत जाणून घ्या कापडांचे प्रकार!

LinkedIn Study Entrepreneurship : स्टार्टअप आणि बिझनेसचा क्रेझ! 85% व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरु करायचाय; लिंक्डइनचा सर्वे काय सांगतो?

भातकापणीत मग्न सासू-सुनेवर काळाचा घाला; त्याच्या हल्ल्यात सासूचा मृत्यू, सून जखमी...

वृषणांची स्वतः तपासणी: पुरुषांना कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखण्यास मदत करणारी एक सोपी सवय

US Tariff : अमेरिकेचा भारताला मोठा झटका! भारतीय वस्तूंवर 25% आयात शुल्क लादण्याचा प्रस्ताव; पण ट्रम्प यांनी 'या' अटीवर दिलासा देण्याची दर्शवली तयारी