(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)  
Marathi Serial

Neha Gadre Bikini Scene: चित्रपटात बिकिनी घालण्यास नेहा गर्देचा नकार, पण बाबांनी दिला अनपेक्षित सल्ला; अभिनेत्रीने सांगितला किस्सा

Neha Gadre Bikini Scene: अभिनेत्री नेहा गद्रेने एका दिलेल्या मुलाखतीत बिकिनी घालण्यास नकार दिल्याचा किस्सा सांगितला. वडिलांनी दिलेल्या प्रतिक्रियेने तीही झाली आश्चर्यचकित!

अमृता यादव

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री नेहा गद्रे गेल्या काही वर्षांपासून ऑस्ट्रेलियात राहत आहे. लग्नानंतर तिने काही काळ मनोरंजनविश्वातून ब्रेक घेतला होता. नेहा आणि तिचा पती ईशान बापट लग्नानंतर अनेक वर्षे ऑस्ट्रेलियात होते. आता तब्बल सहा वर्षांनंतर नेहा भारतात परतली आहे. नुकतीच तिने राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने वडिलांबद्दलचा एक खास किस्सा सांगितला आहे.

बिकिनी घालण्यास नेहाने दिला होता नकार

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत नेहाने सांगितले की, “माझे बाबा खूप स्ट्राँग आहेत. माझ्याकडे एकदा असा प्रोजेक्ट आला होता, ज्यामध्ये मला बिकिनी घालायची होती. त्यावेळी मी यासाठी स्पष्टपणे नकार दिला होता. त्यानंतर मी माझ्या बाबांशी याविषयी चर्चा केली.”

ती पुढे म्हणाली, “मी बाबांना सांगितले की, मला त्यात कम्फर्टेबल वाटत नव्हते, म्हणून मी नकार दिला. पण त्यावेळी माझे बाबा मलाच उलट ओरडले. खरं तर माझ्यासाठी हे खूप शॉकिंग होतं. माझे बाबा विचारांनी खूप प्रगत आहेत, हे मला माहीत होतं; पण ते इतके प्रगत आहेत, याची मला तेव्हा जाणीव झाली.”

“कामासाठी घालत असशील तर मला काहीच हरकत नाही”

वडिलांनी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल सांगताना नेहा म्हणाली, “बाबा मला म्हणाले की, तू हे असंच घालून गेली असतीस तर वडील म्हणून कदाचित मी तुझ्यावर रागावलो असतो. पण जर तू ते कामासाठी घालत असशील, तर मला काहीच हरकत नाही. ते तुझं क्षेत्र आहे. तुला काय करायचं आणि काय नाही, हे तुला माहीत आहे ना? मग झालं.”

पुढे नेहाने सांगितले की, प्रोफेशनल आयुष्यात वैयक्तिक विचार आणल्यामुळे तिचे वडील तिच्यावर प्रचंड रागावले होते. वडिलांचा हा विचार ऐकून आपल्याला आश्चर्य वाटल्याचेही तिने सांगितले.

मालिकांमधून मिळाली घराघरांत ओळख

नेहाच्या अभिनय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर तिने ‘मोकळा श्वास’ आणि ‘गडबड झाली’ यांसारख्या चित्रपटांत काम केले आहे. तसेच स्टार प्रवाहवरील ‘मन उधाण वार्‍याचे’ या मालिकेतून ती घराघरांत पोहोचली. यानंतर तिने झी मराठीवरील ‘अजूनही चांद रात आहे’ या मालिकेतही काम केले. आता सहा वर्षांनंतर भारतात परतलेल्या नेहाच्या या मुलाखतीची चर्चा रंगली आहे.

Weather Update : राज्यातील हवामानात होतोय बदल; थंडीची अद्याप प्रतिक्षाच, पुढील दोन ते तीन दिवसांत...

मध्यरात्री सोयाबीन चोरीचा पर्दाफाश; वाहनासह चार गोण्या जप्त, एकाला ठोकल्या बेड्या

राहुल गांधींचा चैन्नई दौरा यशस्वी? एम. के. स्टॅलिन यांनी भेटीनंतर सूचक पोस्ट केल्याने चर्चांना उधाण

Chandrapur News: शेतशिवारात वाघाचा वावर, महिला मजूर घाबरल्या! भद्रावतीतील शेतकऱ्यांसमोर नवे संकट, वनविभागाला निवेदन

Breakfast recipe: नाश्त्यासाठी बनवा जपानी एग सँडविच; मऊ, क्रीमी आणि चविष्ट रेसिपी होईल झटपट तयार!