Colors Marathi Serial:(फोटो सौजन्य- सोशलमीडिया) Colors Marathi Serial:(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Entertainment

Colors Marathi Serial: राजगुरूंच्या घरात क्रिकेटचा धुरळा! कोण मारणार बाजी?

कलर्स मराठीवरील 'मी जिंकून घेईन सारं' मालिकेत अनिकेत आणि छवीमधील अबोला दूर करण्यासाठी राजगुरू कुटुंबात पाच ओव्हर्सचा धमाल क्रिकेट सामना रंगला. बाई आजींच्या पैजेने सुरू झालेल्या या सामन्यात अनिकेत आणि छवीच्या टीममध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली.

Riddhi Vanne
  • Hanuman Ansh OTT: ‘हनुमान अंश’चा ओटीटीवर धमाका! 5 भाषांमध्ये होणार रिलीज; जाणून घ्या तारीख अन् प्लॅटफॉर्मनराजगुरूंच्या अंगणात रंगला पाच ओव्हर्सचा क्रिकेट सामना.

  • अनिकेत आणि छवीच्या टीममध्ये झाली चुरशीची लढत.

  • शेवटच्या बॉलवर छवी कोणता निर्णय घेणार, याची उत्सुकता.

Me Jinkun Ghein Saar Marathi Serial: कलर्स मराठीवरील 'मी जिंकून घेईन सारं' मालिकेत अनिकेत आणि छवीमधील गोड रुसवा-फुगवा मिटवण्यासाठी बाई आजींनी एका अनोख्या पैजेचा सल्ला दिला. अनिकेत जिंकला तर छवीने त्याच्याशी तात्काळ बोलायचं आणि छवी जिंकली तर अनिकेतने दिवसभर तिला अजिबात हाक मारायची नाही, या अटीवर राजगुरूंच्या अंगणात पाच ओव्हर्सचा हा धम्माल सामना रंगला.

या सामन्यासाठी अनिकेतने टॉस जिंकून चलाखीने घरातल्या सर्व खेळणाऱ्या म्हणजेच साकेत (दादू), जेसिका आणि मोरू काका यांना आपल्या टीममध्ये घेतलं. परिणामी, छवीच्या वाट्याला फक्त बेबी आत्या, वत्सला आणि कियारा आल्या. विशेष म्हणजे, "मी शेवटची बॅट कॉलेजमध्ये तीही फक्त फोटोसाठी धरली होती," असं म्हणणाऱ्या बेबी आत्या आणि कधीच क्रिकेट न खेळलेल्या वत्सला फक्त छवीला जिंकवण्यासाठी मैदानात उतरल्या. ‘मी जिंकून घेईन सारं', दररोज, संध्या. 7 वा. कलर्स मराठीवर. कलर्स मराठीवरील तुमच्या आवडत्या मालिका पहा @JioHotstar वर, कधीही आणि कुठेही!

अंगणात रंगलेल्या या मॅचमध्ये एकीकडे बाई आजी कडक अंपायरच्या भूमिकेत होत्या, तर दुसरीकडे बेबी आत्यांचे टप्पे खात जाणारे बॉल अनिकेतने फाटकापलीकडे भिरकावून देत मोरू काकांना गुलाबाच्या कुंड्यांमध्ये बॉल शोधायला लावलं. वत्सलाने कमरेला पदर खोचून टाकलेल्या भेदक गोलंदाजीने अनिकेतलाही चकवलं, आणि मॅचच्या मध्यावर ललितची एन्ट्री झाल्याने छवीच्या टीमला मोठं बळ मिळालं.

ललितने अनिकेतला क्लीन बोल्ड केल्यावर अनिकेतने गल्ली क्रिकेटप्रमाणे 'नो बॉल'चा केलेला अट्टाहास, छवी-ललितची जोडी पाहून लक्ष विचलित झाल्यामुळे अनिकेतच्या डोक्यावर आदळलेला कॅच आणि बेबी आत्यांची 'ओह माय गॉड!' म्हणत केलेली चीअरिंग यामुळे सामन्यात कमालीची रंगत आली. शेवटच्या बॉलवर छवी सहज दोन धावा काढून मॅच जिंकू शकत होती, पण 'जिंकले तर दिवसभर अनिकेतची हाक ऐकायला मिळणार नाही' नक्की छवी काय करेल ? बघूया मालिकेत. तेव्हा नक्की बघा मी जिंकून घेईन सारं कलर्स मराठीवर.

याबद्दल बोलताना जान्हवी तांबट म्हणाली, "मी लहानपणी जवळपास क्रिकेट खेळलेच नाही. लहान असताना आजोळी गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर आम्ही भावंडं खेळायचो, पण तेव्हा फक्त समोरून आलेला बॉल बॅटने उडवायचा एवढंच माहीत होतं. मला बॅट कशी पकडायची हे माहीत नव्हतं. आमच्या सेटवर मला सगळ्यांनी बॅट पकडण्यापासून ते खेळण्यापर्यंत बेसिक गोष्टी शिकवल्या."

पुढे ती म्हणाली , "सेटिंग आणि स्पॉट दादांनी खऱ्या मॅचसारखा उत्सवी माहोल तयार केला होता. गंमत म्हणजे, 'कावळा बसायला आणि फांदी तुटायला' या म्हणीप्रमाणे सीनदरम्यान माझे रँडम तुक्के लागून प्रॉपर फोर आणि सिक्स जात होते. पण बॉल बॅटला लागून बाउंड्रीपार गेल्याच्या आनंदात मी इतकी हरवून जायचे की रन काढण्यासाठी धावायचं असतं हेच विसरून जायचे. उन्हात दगदग होत असताना स्पॉट दादा आम्हाला सतत लिंबू सरबत आणि इनर्झाल देत होते. बाई आजीही आमच्यासोबत असल्याने संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन सण साजरा करत असल्यासारखं वाटत होतं. या दोन दिवसांच्या शूटिंगनंतर मला इतका हुरूप आलाय की आता मी नक्कीच क्रिकेट शिकणार आहे!"

अमित रेखी म्हणजेच साकेत म्हणाला,

"मी जिंकून घेईन सारं’ मालिकेसाठी आम्ही घराच्या अंगणात स्टम्प्स आणि प्रॉपर पिच बनवून राजगुरू कुटुंबाचा एक धमाल क्रिकेट सीन शूट केला. हा सीन शूट करताना आमच्या शाळा-कॉलेजमध्ये ग्राउंडवर खेळलेल्या क्रिकेटच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. सेटवर इतकी मजा येत होती की प्रत्येकजण शॉट्सच्या मध्येही बॅट-बॉल घेऊन खेळत राहायचा, ज्यामुळे डिरेक्टर सरांना अक्षरशः ओरडून म्हणावं लागायचं की, 'अरे जरा थांबा, आता शूटिंग करूया!'

संचित चौधरी म्हणजेच अनिकेत म्हणाला,

"मालिकांमध्ये सहसा सण-समारंभ, लग्न आणि कौटुंबिक नाट्य शूट होत असतं, पण क्रिकेटसारखे सिक्वेन्स फार क्वचितच पाहायला मिळतात. त्यामुळे हा सीन शूट करताना आम्ही खूपच उत्साही होतो. कोणत्याही मोठ्या मैदानावर न खेळता आम्ही गल्ली क्रिकेटसारखा माहोल तयार केला होता, ज्यामुळे लहानपणीच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. शूटिंग सुरू होण्याआधी आम्ही सेटवरच्या सगळ्या मुलींना बॅट कशी पकडायची आणि बॉलिंग कशी करायची हे शिकवत होतो. खूप वर्षांनी अशा प्रकारे क्रिकेट खेळायला मिळाल्याने सेटवर खूपच धमाल आली."

पैशांच्या वादातून थरार! पहाटे अडीच वाजता पुण्यातील तरुणाचे अपहरण; स्कॉर्पिओत बसवले अन्...

World Sustainable Transport Day: आज आहे 'जागतिक शाश्वत वाहतूक दिन'; जाणून घ्या का काळाची गरज बनला आहे हरित प्रवास आणि त्याचे फायदे

travel: हिवाळ्यात फिरायला जाताय? मग नक्की करून पाहा 'या' ७ भन्नाट ट्रॅव्हलिंग अ‍ॅक्टिव्हिटीज!

IND vs NZ 2nd Test: क्राईस्टचर्चमध्ये भारताचा कसोटी रेकॉर्ड, एकही विजय नाही; Shubman आणि संघाला बदलावा लागेल इतिहास

RBI Gold Reserve : RBI ची मोठी कामगिरी! तब्बल 60 टन सोनं भारतात परतलं; देशात साठ्याचे प्रमाण किती?