फोटो सौजन्य - Social Media 
Entertainment

Mira Jagannath : पावसाने अभिनेत्रीही त्रस्त! चक्क घरातच शिरलं पावसाचं पाणी, करावी लागली तारेवरची कसरत

मुंबईतील मुसळधार पावसाचा फटका अभिनेत्री मीरा जगन्नाथलाही बसला आहे. नव्या घरात पाणी शिरल्याने ती स्वतः हातात मॉप घेऊन घरातील साचलेलं पाणी काढताना दिसली. हा त्रासदायक अनुभव तिने सोशल मीडियावर व्हिडीओद्वारे शेअर करत, "नक्की हे पाऊसच आहे की कुणाची वाईट नजर?" असा प्रश्न उपस्थित केला.

दिवेश चव्हाण
  • मीराने अचानक तिची तारेवरची कसरत शेअर केली.
  • मीरा घरामध्ये साचलेलं पाणी काढताना दिसत होती.
  • "नक्की हे पाऊसच आहे की कुणाची वाईट नजर?"

महाराष्ट्रभरात गेल्या काही दिवसांपासून जसे पावसाच्या चर्चा आहेत त्याचप्रमाणे मराठी सिनेप्रेमींच्या चर्चेत मीरा जगन्नाथ हे नाव गेल्या काही काळापासून आहे. अगदी आठ्वड्याभरापूर्वी मीराच्या मुंबईतील नव्या घरी पूजा पार पडली आणि गेला आठवडा पावसाने मुंबईत हजेरी लावली. तेव्हापासून पावसाने काही विश्रांती घेतली नाही. अशामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून आनंदाची बातमी देणाऱ्या मीराने अचानक तिची तारेवरची कसरत शेअर केल्याने तिच्या चाहत्यांनी तिच्यासाठी सहानभूती दाखवली आहे.

मीरा जगन्नाथने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये मीरा घरामध्ये साचलेलं पाणी काढताना दिसत होती. पोस्टच्या अगोदर कॅनडाचा एक भलामोठा धबधब्याचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे त्यापुढे तिने तिच्या घराची स्थिती दाखवली आहे. एकंदरीत, कॅनडाचा तो धबधबा पाहण्यासाठी इतके पैसे घालवून इतक्या दूर जाण्यापेक्षा तसाच अनुभव मला माझ्या घरी येत असल्याचे तिचे म्हणणे आहे. हातात मॉप घेऊन ती घरात साचलेलं पाणी काढत आहे.

या सगळ्यामध्ये अभिनेत्रीने एक महत्वाची गोष्ट तिने नमूद केले आहे की, "मिसिंग लिंकसुद्धा एका रात्रीत चालू झाला, पण माझ्या घरात साचलेलं हे पाणी काही संपण्याचा नाव घेत नाहीये. दिवसभर कामे करून घरी येते आणि अशी साफसफाई करत बसते. गेल्या तीन दिवसांपासून माझं हेच सुरु आहे. मी थकून गेलीये. मला समजेनासं झालंय की 'नक्की हे पाऊसच आहे की कुणाची वाईट नजर?'"

अभिनेत्रीचे होणारे हाल पाहून तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर तिचे सांत्वन केले आहे. अभिनेत्रीला दुःखी पाहून मीरावर जीव ओवाळून टाकणाऱ्या चाहत्यांनी कमेंट्समध्ये स्वतःचे दुःखही मांडले आहेत आणि या अडचणीतून मीराला लवकरच मार्ग मिळो अशी इच्छा असल्याचे सांगितलेय आहे.

मीरा जगन्नाथ ही मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि मॉडेल आहे. मराठी मालिकांमधील दमदार भूमिका तसेच विविध रिअॅलिटी शोमधील सहभागामुळे तिने प्रेक्षकांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. मीराने आजपर्यंत विविध मालिकांमध्ये काम केले आहे. तिने 'माझ्या नवऱ्याची बायको' या सुप्रसिद्ध मालिकेत साकारलेले पात्र आजही मालिका प्रेमींच्या मनावर राज्य करते.

Mumbai News: भारतावर अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळाचे संकट! महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थितीची चिन्हे

मिनी महाबळेश्वर गारठलं! तापमान थेट एकेरी अंकात; पर्यटकांचा ओढा वाढला

Kolhapur Drink and Drive: कोल्हापुरात मद्यधुंद कारचालकाने दोघा भावांना चिरडले; गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाला अटक

जुन्या कॅसेटला मिळाली नवी ओळख! 44 वर्षांपूर्वी फ्लॉप झालेलं गाणं GTA 6 मुळे पुन्हा ट्रेंडमध्ये

Bajra Soup: थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात करा बाजरीच्या सूपचा समावेश, पित्ताच्या त्रासापासून मिळेल सुटका