साखरपुडा रद्द केल्यानंतर पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल पुन्हा एकत्र 
Entertainment

साखरपुडा मोडल्यानंतरही आता पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल पुन्हा एकत्र; इन्स्टावर दिली माहिती, म्हटले...

काही लोकांनी आम्हाला माहिती दिल्यानंतर आम्ही साखरपुडा मोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मी माझा मार्ग भरकटलो होते. एक असा निर्णय घेतला जो कदाचित घ्यायला नको होता. आमच्यात किमान संवाद होणे आवश्यक होते, असे पृथ्वीने सांगितले.

कृपादान आवळे
  • 17 सप्टेंबरला केली होती विभक्त होण्याची घोषणा
  • A Personal Clarification नावाची स्टोरी चर्चेत
  • पुन्हा एकत्र येण्याचेही दिले कारण

मुंबई : भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अलीकडेच, पृथ्वीने याचवर्षी मार्चमध्ये अभिनेत्री-इन्फ्लुएन्सर आकृती अग्रवालसोबत साखरपुडा केला होता. मात्र, 17 सप्टेंबर रोजी आकृतीने एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे त्यांच्या विभक्त होण्याची घोषणा केली होती. असे असताना आता त्यांच्या नात्याला एक वेगळे वळण लागले आहे. पृथ्वी शॉने एक नवीन अपडेट देत, ते पुन्हा एकत्र आल्याचे सांगितले आहे.

पृथ्वी आणि आकृतीने त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. याला चांगला प्रतिसादही मिळाला होता. मात्र, नंतर त्यांनी पुढे न जाण्याचा निर्णय घेतला होता. असे जरी असले तरी आता नात्याने जवळ येताना दिसत आहेत. क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल यांनी सोमवारी इन्स्टाग्रामवर A Personal Clarification नावाची एक स्टोरी शेअर केली. त्या स्टोरीमध्ये लिहिले आहे, "जेव्हा मी आमचा साखरपुडा मोडला, तेव्हा मी फक्त माझ्या जवळच्या लोकांचेच ऐकले आणि त्यावरच लक्ष दिले.

तसेच काही लोकांनी आम्हाला माहिती दिल्यानंतर आम्ही साखरपुडा मोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मी माझा मार्ग भरकटलो होते. एक असा निर्णय घेतला जो कदाचित घ्यायला नको होता. आमच्यात किमान संवाद होणे आवश्यक होते, असे पृथ्वीने सांगितले.

...म्हणून पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय

आकृती अग्रवालनेही सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यामध्ये तिने म्हटले की, "मी त्या निर्णयाची आणि त्यामुळे झालेल्या वेदनांची जबाबदारी घेते. तेव्हापासून, आम्ही मोकळेपणाने बोललो आहोत, एकमेकांना समजून घेतले आहे आणि पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही दोघे एकमेकांसाठी पुरेसे आहोत आणि आम्हाला इतर कोणाचीही गरज नाही. या वेळी, मला आमचे भविष्य आमच्या स्वतःच्या समजूतदारपणा, विश्वास आणि प्रेमाने ठरवायचे आहे. आम्ही एक नवीन सुरुवात करत असताना, कृपया आमच्या निर्णयाचा आदर करा", असेही तिने म्हटले आहे.

PCB: पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ! महिला सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये फक्त ८ जणींना संधी, १२ अनुभवी खेळाडूंचा पत्ता कट

Rohit Sharma: आला रे आला, मुंबईचा राजा आला! 'हिटमॅन' पुन्हा Mumbai Indians चा कर्णधार

Maharashtra News : ‘सेवा दूत अभियान’ १ डिसेंबरपासून राज्यभर राबवणार; लोककल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे रवींद्र चव्हाण यांचे आवाहन

Nashik News : नाशिकमध्ये महापालिकेच्या रुग्णालयाची दुराव्यस्था; फाटलेल्या गाद्या अन् वॉर्डात मांजरांच्या मुक्तसंचाराने रुग्ण भयभीत

MSRTC NCMC Card: एसटीच्या एनसीएमसी कार्डसंदर्भात मोठी अपडेट! ५० रुपयांची अट रद्द, आता फक्त ५ रुपयांचे टॉपअप