फोटो सौजन्य - Social Media  
Entertainment

Bigg Boss Marathi 6 : शेवटच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश झाला Emotional! 19 आठवड्यांचा प्रवास निघाला शेवटाकडे...

Bigg Boss Marathi 6 मधील शेवटचा ‘भाऊचा धक्का’ पार पडला असून शो अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. Riteish Deshmukh या प्रवासाची आठवण काढताना भावुक झाला.

दिवेश चव्हाण
  • Bigg Boss Marathi पर्वातील शेवटचा भाऊचा धक्का पार पडला
  • रितेश स्वतःही Emotional झाला
  • रितेशने भाऊच्या धक्क्यावर उपस्थित सर्व स्पर्धकांविषयी अभिमान व्यक्त केला

बिग बॉस मराठी 6 वळणेदार होता. यात रुसवे, फुगवे, प्रेम, जिव्हाळा! सारं काही भरपूर होतं. Bigg Boss Marathi Season 6 त्याच्या शेवटच्या टप्प्यात येऊन थांबला आहे. पुढचा आठवडा हा यंदाच्या पर्वातील शेवटचा आठवडा आहे. 18 आठवड्यांपूर्वी सुरु झालेला हा प्रवास आता काहीच दिवसांत संपणार आहे. आता घरामध्ये Top 7 सदस्य उरले आहेत. पुढच्या आठवड्यात त्यामधील 6 सदस्य एकेक करत घराबाहेर जातील आणि घराला पर्व सहाव्यातील विजेता मिळेल.

बिग बॉस मराठी पर्व 6 मध्ये विविध रंग पाहायला मिळाले. काही नाती बनली तर काही तुटलीही! बिग बॉस मराठी 6 च्या घरात तीन वेगवगेळे संघ पडले: टोळी, काटा, बाल्कनी! पण हे तिन्ही संघ, जणू त्या घरातील तीन परिवारासारखे होते. त्या तिन्ही संघांमध्ये होणारे वाद, जणू शेजाऱ्यांमध्ये होणारी भांडणं! हळूहळू, या घरात Eviction मुळे सदस्य कमी होऊ लागले. संघ तुटू लागले, विखरू लागले. वाद झाले, पण त्यामुळे हा Game On राहिला. या सगळ्या आठवणींनी Bigg Boss Marathi Season 6 चा होस्ट रितेश देशमुख भावुक झालेला दिसून आला.

आज यंदाच्या Bigg Boss Marathi पर्वातील शेवटचा भाऊचा धक्का पार पडला. याविषयी सांगताना रितेश स्वतःही Emotional झाला आणि इतरांनाही त्याने भावुक केले. याविषयी Bigg Boss ने त्यांच्या ऑफिशिअल इंस्टाग्राम हॅन्डलवर पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये भावुक झालेला रितेश म्हणतो की,"आजचा भाऊचा धक्का, यंदाचा शेवटचा भाऊचा धक्का आहे. हा माझ्यासाठी फार जवळचा विषय आहे कारण हा प्रवास मी तसेच प्रेक्षकांनी अतिशय जवळून पहिला आहे. तुमच्यापैकी बहुतेक जणांनी खेळात खेळ सोडण्याचे अनेकदा स्पष्ट केले पण त्यातून सावरून तुम्ही पुन्हा उभे राहिलात. प्रेक्षकांचं प्रेम आणि तुमच्या जिद्दीमुळे आज तुम्ही 7 जण इथपर्यंत आले आहात." हे म्हणताना रितेशने भाऊच्या धक्क्यावर उपस्थित सर्व स्पर्धकांविषयी अभिमान व्यक्त केला.

राखी सावंत झाली Evict

घरामध्ये तुफान बनून आलेल्या राखीने अनेक वाद-भांडणं केली, तसेच मज्जाही केली. पण राखीचा यंदाच्या पर्वातील हा प्रवास इथेच थांबला आहे. 16 Season करून आलेल्या राखीला या Season मध्येही ट्रॉफीच्या अगदी जवळ येऊन मागे फिरावे लागले आहे. Bigg Boss ने यंदाही Rakhi Sawant ला 'Better Luck Next Time' केले आहे.

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस फेसलिफ्ट भारतात लाँच! किंमत 19.59 लाखांपासून, E85 फ्युलवरही धावणार

कार वळवण्याच्या वादातून तरुणाचा खून; आठ दोषींना न्यायालयाने सुनावली 'ही' मोठी शिक्षा

Health: रोज अंडी खाण्याचे शरीराला होतात हे ७ फायदे; जाणून घ्या अंड्यामधील पोषक घटकांचे महत्त्व!

भारत आणखी तापणार? उन्हाचा चटका वाढणार, मान्सूनही होणार अधिक तीव्र

Suresh Raine BirthDay, त्याचा 'हा' खास विक्रम तुम्हाला ठाऊक आहेत का?