फोटो सौजन्य - Social Media 
Entertainment

Asha Bhosle Died : अपूर्ण राहिली एक इच्छा! 'आशाताई आणि ते Guitar...', Tabu ची 'ती' पोस्ट येतेय चर्चेत

Asha Bhosle यांच्या निधनानंतर Tabu यांनी काही दिवसांपूर्वीची त्यांच्यासोबतची पोस्ट चर्चेत आली आहे. कॅप्शनमध्ये Tabu यांनी आशाताईंप्रती प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे.

दिवेश चव्हाण
  • सुप्रसिद्ध अभिनेत्री Tabu ने अगदी काहीच दिवसांपूर्वी केलेली पोस्ट चर्चेत
  • पोस्टमध्ये Tabu आणि Asha Bhosle दिसत आहेत
  • देशभरातील अनेक दिग्गजांनी आशा भोसले यांनी आदरांजली वाहिली

सुप्रसिद्ध भारतीय जेष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे आज निधन झाले. छातीत संसर्ग होऊन थकवा झाल्याने त्यांना मुंबईच्या Breach Candy रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारदरम्यान आशा भोसले यांनी प्राण सोडले. दरम्यान, त्यांच्या निधनाने बॉलिवूड तसेच संपूर्ण कला विश्वात शोककळा पसरली आहार. देशभरातील अनेक दिग्गजांनी आशा भोसले यांनी आदरांजली वाहिली आहे. विविध क्षेत्रातून आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. दरम्यान, सुप्रसिद्ध अभिनेत्री Tabu ने अगदी काहीच दिवसांपूर्वी केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

Tabu ने केलेल्या या पोस्टमध्ये Tabu आणि Asha Bhosle दिसत आहेत. त्या दोघांच्या हातात एक Guitar आहे. या पोस्टखाली Tabu ने सुंदर असे कॅप्शन दिले आहे. कॅप्शनमध्ये नमूद केले आहे की, "मला माझा सगळ्यात खास दिवस विचारा... मला माझे अविस्मरणीय क्षण विचारा... मला विचारा की 'माझ्या मनाला सगळ्यात जास्त स्पर्श करणारे काय आहे?' आणि त्याच एकच उत्तर 'आशाताईंनी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी दिलेली सुंदर भेट 'Guitar'! आशाताई, तुमच्यावरचं प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. तुमच्या गाण्यांतून आम्ही प्रेम, ओढ… वेदना आणि आवेग अनुभवला आहे आणि नक्कीच एकेदिवशी मी तुम्ही भेट केलेल्या या Guitar वर तुमचंच एखादं गाणं तुमच्यासमोर सादर करेल."

अशा सुंदर कॅप्शनमध्ये Tabu ने व्यक्त केलेली आशाजींसमोर त्यांचंच एखादं गाणं सादर करण्याची इच्छा अपूर्ण राहिली. पोस्टखाली कॅप्शनमध्ये दोन्ही कलाकारांच्या असंख्य चाहत्यांनी 'दोघांना एकत्र गाताना पाहायला आवडेल' अशी इच्छा सांगितली. आशा भोसले यांचे रविवारी निधन झाले. शनिवारी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अवघ्या काही क्षणात आशा भोसले यांच्या नातीने आशा भोसले यांना होणाऱ्या त्रासाबद्दल स्पष्ट केले. आशा भोसले यांच्या पार्थिवाची अंतिम क्रिया सोमवारी त्यांच्या राहत्या घरी होईल असे सांगण्यात आले आहे.

लातूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी धीरज देशमुख यांची बिनविरोध निवड; अविनाश जाधव उपाध्यक्षपदी

'बाबा ऐकत नाहीत…', शरद पवारांना अॅडमिट केल्यानंतर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

Viral Money Saving Trick: नोट खिशात ठेवण्याची 'ही' ट्रिक पाहिलीय का? पैसे पडणारच नाहीत, VIDEO व्हायरल

Raigad News: ४७ गावं, ३३ आदिवासी वाड्या तहानलेल्या! उमटे धरणाच्या गाळमुक्तीसाठी संघर्ष ग्रुप आक्रमक, १३ कंपन्यांना दिले निवेदन

Supriya Sule CM News : सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार? राऊत म्हणाले, त्यांच्या शपथविधीला मी जाणार! राज्यात पुन्हा होणार राजकीय भूकंप?