महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपावरून चौघे अटकेत 
India

CJP Protest : आंदोलनात हिंदू रक्षा दलाच्या कार्यकर्त्यांची विद्यार्थिनींना मारहाण, व्हायरल व्हिडिओनंतर दिल्ली पोलिसांना आली जाग

CJP Protest : दिल्लीतील डीडीयू मार्गावर 10 ऑक्टोबर रोजी CJP आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना मारहाण आणि महिलांशी धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. याप्रकरणी हिंदू रक्षा दलाशी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.

Vivek
  • डीडीयू मार्गावरील कथित मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
  • चौघांची ओळख पटली; दिल्ली पोलिसांची कारवाई
  • सोशल मीडिया व्हिडिओनंतर तपासाला वेग

CJP Protest : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत जोरदार आंदोलन पार पडले. कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थी संघटनांच्या तर्फे काल पार पडलेल्या या आंदोलनाची देशभर चर्चा सुरु आहे. CJP चे संस्थापक अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तसेच विरोधी पक्षातील नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याने मोठी खळबळ निर्माण झाली होती. अश्यातच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून यात 'हिंदू रक्षा दल' चे काही कार्यकर्ते आंदोलक विद्यार्थिनींना मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, दिल्ली पोलिसांच्या उपस्थितीत ते गुंड विद्यार्थिनींना मारहाण करत असल्याचे दिसत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत असून पोलीस व्यवस्था आणि महिला सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

समाजमाध्यमांवर व्यक्त होत असलेल्या प्रचंड रोषानंतर आता व्हिडिओत दिसणाऱ्या हिंदू रक्षा दलाच्या गुंडाना पोलिसांनी अटक केले असल्याची माहिती मिळत आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीसुद्धा हा व्हिडीओ ट्विट करत केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांवर निशाणा साधला. त्यानंतर हे प्रकरण ज्वलंत होत असता दिल्ली पोलिसांना त्या गुंडाना अटक करण्याची उपरती झाली.

नेमकं प्रकरण काय?

डीडीयू मार्गावरील कमला मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही जण तरुण विद्यार्थ्यांना मारहाण करताना आणि महिलांशी धक्काबुक्की करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, ही घटना घडत असताना घटनास्थळी एक पोलीस कर्मचारीही उपस्थित असल्याचं फुटेजमध्ये दिसत आहे.

या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावं रमण सैनी (50), विवेकानंद ऊर्फ विवेक (32), कपिल कुमार (27) आणि रविंदर सिंग ऊर्फ गोविंद हिंदू (35) अशी आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.

दिल्ली पोलिसांची कारवाई

या घटनेबाबत कोणतीही अधिकृत तक्रार पोलिसांकडे दाखल झाली नव्हती. मात्र, सोशल मीडियावर व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्वतःहून या प्रकरणाची दखल घेतली. संबंधित व्यक्ती दिल्ली-एनसीआर परिसर सोडून जाण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाल्यानंतर तपासाला वेग देण्यात आला.

सुरुवातीला व्हिडिओ नेमका कुठे चित्रित झाला, हे स्पष्ट नव्हतं. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी तपास करून घटनास्थळ शोधून काढलं आणि संबंधित चार जणांना अटक केली.

SIR आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घटना

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावृत्ती (SIR) प्रक्रियेविरोधात दिल्लीमध्ये आंदोलन सुरू होतं. 10 ऑक्टोबर रोजी शहरातील विविध भागांत निदर्शकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

या आंदोलनादरम्यान घडलेल्या मारहाणीच्या घटनेमुळे आता सुरक्षाव्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणात पुढे काय कारवाई होते, याकडे लक्ष लागलं आहे.

फक्त 6 रुपयांत बेड गरम? Heated Blanket चा वीज वापर जाणून घ्या!

नाशिकमध्ये दुष्कळाची तीव्रता वाढली; २०१ गाव-वाड्यांना ६० टँकरने पाणीपुरवठा

Laxman Hake: 'पवार कुटुंबाचं राजकारण संपेल!' सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर लक्ष्मण हाके स्पष्टच बोलले

रुग्णालयातही मौल्यवान दागिने सुरक्षित नाहीत? कल्याणच्या वैष्णवी हॉस्पिटलमध्ये मंगळसूत्र चोरीला

Nagpur News : सीताबर्डी उड्डाणपूल बंद होताच नागपूरची वाहतूक कोलमडली; पर्यायी मार्गांअभावी नागरिक तासनतास कोंडीत