Photo Credit- Social Media 
India

भाजपने डाव टाकला; माजी मुख्यमंत्री गळाला लागला, 'या' दिवशी होणार प्रवेश

चंपाई सोरेन यांनी सोमवारी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्व सरमा हेदेखील उपस्थित होते. झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि आपल्या देशातील प्रख्यात आदिवासी नेते चंपाई सोरेन यांनी दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती

anuradha sagar

झारखंड: झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती. पण त्यांनी अखेर आपले राजकीय भवितव्य ठरवले आहे. चंपाई सोरेन भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. मा  चंपाई सोरेन गेल्या अनेक दिवसांपासून हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चाविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत. आगामी झारखंड विधानसभा निवडणुकीपूर्वी चंपाई सोरेनसोबत एकत्र आल्याने भाजपला मोठा फायदा होऊ शकतो.

या तारखेला होणार भाजपमध्ये प्रवेश

चंपाई सोरेन यांनी सोमवारी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्व सरमा हेदेखील उपस्थित होते. झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि आपल्या देशातील प्रख्यात आदिवासी नेते चंपाई सोरेन यांनी दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती सीएम हेमंता बिस्व सरमा यांनी दिली आहे. रांचीमध्ये 30 ऑगस्ट रोजी चंपाई अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.

राजकारण न सोडण्याची घोषणा केली होती

चंपाई सोरेन यांनी अलीकडेच राजकारणातून संन्यास घेणार नसल्याचे सांगितले होते. अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी आपण राजकारणात राहणे आवश्यक आहे. आपल्या राजकीय भवितव्याबाबत आठवडाभरात निर्णय घेणार असल्याचे चंपाई सोरेन यांनी सांगितले होते. चंपाई सोरेन यांनी दोन पर्याय निवडले होते. यातील पहिला म्हणजे, स्वतंत्र संघटना स्थापन करणे आणि दुसरा आम्हाला जोडीदार मिळाला तर आम्ही त्याच्यासोबत प्रवास सुरू करू असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

राज्यातील राजकीय घडामोडी कशा बदलल्या?

हेमंत सोरेन यांना जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. हेमंत यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर चंपाई सोरेन यांना झारखंडचे नवे मुख्यमंत्री करण्यात आले. झारखंड उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर हेमंत सोरेन यांची पुन्हा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. यानंतर चंपाई सोरेन यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर हेमंत सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर काही दिवसांनी चंपाई सोरेन यांनी  उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली.

Raigad News: ४७ गावं, ३३ आदिवासी वाड्या तहानलेल्या! उमटे धरणाच्या गाळमुक्तीसाठी संघर्ष ग्रुप आक्रमक, १३ कंपन्यांना दिले निवेदन

Supriya Sule CM News : सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार? राऊत म्हणाले, त्यांच्या शपथविधीला मी जाणार! राज्यात पुन्हा होणार राजकीय भूकंप?

Baba Aparajith Retirement: CSK च्या 'या' खेळाडूचा क्रिकेटला रामराम; IPL 2027 ऑक्शनपूर्वी घेतला मोठा निर्णय

जुन्नर तालुक्यात बिबट्याचा भरदिवसा हल्ला; एका महिलेचा मृत्यू तर दुसरी जखमी

शत्रूसोबत पण असं घडायला नको! क्रीजपासून लांब राहून देखील फलंदाज OUT! विचित्र घटनेचा Video Viral