दुचाकीच्या अपघातात सख्ख्या भाऊ-बहिणीचा मृत्यू (संग्रहित फोटो) 
ताज्या बातम्या

Accident News : हेल्मेट हँडलला अन् काळाचा घाला; अपघातात २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

राज्यात अपघाताच्या घटना वाढल्या असून, अशातच आता आता औराद पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक ७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री झालेल्या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे.

ज्ञानेश्वर मोरे
  • हेल्मेट हँडलला अन् काळाचा घाला
  • अपघातात २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू
  • औराद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

लातूर : हेल्मेट जवळ होते; मात्र ते डोक्यावर परिधान न करता मोटारसायकलच्या हँडलला अडकवून प्रवास करणे २१ वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतले आहे. औराद पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक ७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री झालेल्या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हेल्मेट केवळ सोबत असणे नव्हे, तर प्रत्येक प्रवासात ते डोक्यावर व्यवस्थित परिधान करणे किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

प्रफुल सुनील काळे (वय २१, रा. माळेगाव कल्याणी, ता. निलंगा) हे मोटारसायकल क्रमांक एमएच २४ सीएच ४०४२ वरून औरादकडून निलंग्याकडे जात होते. दरम्यान, मोघे म्हसोबावाडी पाटीजवळ रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास पुढे जाणाऱ्या एमएच १२ जीएस १९३० क्रमांकाच्या मोटारसायकलच्या चालकाने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे प्रफुल काळे यांच्या मोटारसायकलची पुढील वाहनाला धडक झाली. धडकेनंतर प्रफुल काळे मोटारसायकलवरून उडून सिमेंटच्या रस्त्यावर पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालय, निलंगा येथे नेण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

हेल्मेट होते; पण डोक्यावर नव्हते!

या अपघातातील महत्त्वाची बाब म्हणजे प्रफुल काळे यांच्याकडे हेल्मेट होते. मात्र त्यांनी ते डोक्यावर परिधान केले नव्हते. हेल्मेट मोटारसायकलच्या हँडलला अडकवून ते प्रवास करत होते. अपघाताच्या वेळी डोक्यावर हेल्मेट नसल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. हेल्मेट मोटारसायकलला अडकवून नेणे, हातात घेणे किंवा केवळ सोबत ठेवणे यामुळे डोक्याचे संरक्षण होत नाही. अपघाताच्या क्षणी हेल्मेट डोक्यावर योग्य पद्धतीने परिधान केलेले असणे आवश्यक आहे. त्यामुळे 'हेल्मेट आहे' यापेक्षा 'हेल्मेट डोक्यावर आहे' हे अधिक महत्त्वाचे आहे. काही सेकंदांचा निष्काळजीपणा ठरू शकतो जीवघेणा याचे उदाहरण पहायला मिळाले.

Mumbai News: भारतावर अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळाचे संकट! महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थितीची चिन्हे

मिनी महाबळेश्वर गारठलं! तापमान थेट एकेरी अंकात; पर्यटकांचा ओढा वाढला

Kolhapur Drink and Drive: कोल्हापुरात मद्यधुंद कारचालकाने दोघा भावांना चिरडले; गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाला अटक

जुन्या कॅसेटला मिळाली नवी ओळख! 44 वर्षांपूर्वी फ्लॉप झालेलं गाणं GTA 6 मुळे पुन्हा ट्रेंडमध्ये

Bajra Soup: थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात करा बाजरीच्या सूपचा समावेश, पित्ताच्या त्रासापासून मिळेल सुटका