लाइफ स्टाइल

Skincare: कच्च्या दुधापासून बनवलेले हे 5 फेस पॅक चेहरा चमकदार बनवतात, योग्य पद्धत जाणून घ्या

चेहऱ्याच्या समस्या दूर करण्यासाठी आणि सौंदर्य वाढवण्यासाठी नैसर्गिक फेसपॅक कधीही फायद्याचे ठरतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही तुमच्या चेहऱ्याच्या सौंदर्यवाढीसाठी कच्च्या दुधाचा वापर करू शकता. यातील पोषक घटक चेहऱ्यासाठी फार फायद्याचे ठरतात. कच्च्या दुधापासून तयार होणारे काही सोपे फेसपॅक जाणून घ्या.

नुपूर भगत

आपण सुंदर दिसावे असे कोणाला वाटतं नाही. आपले सौंदर्य वाढवण्यासाठी लोक बाजारातील नवनवीन प्रोडक्टसचा वापर करत असतात. मात्र या प्रोडक्टसमध्ये बहुतांश रासायनिक पदार्थांचा समावेश असतो जो आपल्या चेहऱ्यासाठी घातक ठरू शकतो. त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी आणि चेहरा उजळण्यासाठी तुम्ही नैसर्गिक गोष्टींचा वापर करू शकता. चेहऱ्यासाठी नैसर्गिक गोष्टींचा वापर उत्तम मानले जाते. यात कोणतेही हानिकारक घटक नसल्याकारणाने यांचा आपल्या चेहऱ्यावर कोणताही वाईट परिणाम होत नाही.

चेहऱ्यावर चमक आणायची असेल तर कच्चे दूध y यासाठी फायद्याचे ठरते. याच्या मदतीने तुम्ही विविध प्रकारचे फेस पॅक घरीच तयार करू शकता. जीवनसत्त्वे, प्रथिने आणि लॅक्टिक ॲसिडने समृद्ध असलेले कच्चे दूध त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. अगदी सोप्या पद्धतीने आणि अजिबात अधिक वेळ न घालवता तुम्ही सहज हे फेसपॅक घरबसल्या तयार करू शकता.

ओट्स आणि कच्च्या दुधाचा फेसपॅक

हा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला 2 टेबलस्पून कच्चे दूध आणि 1 टेबलस्पून बारीक ओट्स आवश्यक आहे. या फेस पॅकचा वापर त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यासाठी केला जातो. तर कच्चे दूध त्वचेला मॉइश्चरायझ करते. यासाठी ओट्स मिक्सरमध्ये बारीक करून याची पेस्ट तयार करा आणि कच्च्या दुधात मिसळून याचा पॅक तयार करा. गुळगुळीत आणि चमकदार त्वचेसाठी आठवड्यातून दोनदा हा पॅक वापरा.

काकडी आणि कच्च्या दुधाचा फेसपॅक

यासाठी 2 चमचे कच्चे दूध आणि 2 चमचे काकडीचा रस घ्या आणि यांना एकत्र चांगले मिसळा. हा पॅक त्वचेला शांत करण्यासाठी आणि जळजळ कमी करण्यासाठी चांगला आहे. काकडीतील गुणधर्म तुमचा चेहरा फ्रेश ठेवण्यास मदत करतील. ताज्या आणि चमकदार त्वचेसाठी आठवड्यातून दोनदा ते लावा.या पॅकचा वापर करत जा.

पपई आणि कच्च्या दुधाचा फेसपॅक

हा फेस पॅक बनवण्यासाठी 2 चमचे कच्चे दूध घ्या आणि त्यात 2 चमचे पपईचा पल्प घालून नीट मिक्स करा. पपई त्वचा चमकदार बनवण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. आंघोळीच्या काही वेळापूर्वी हा पॅक चेहरा आणि मानेवर पूर्णपणे लावा आणि मग धुवून काढा. आठवड्यातून दोनदा या पॅकचा वापर करत जा.

चंदन आणि कच्च्या दुधाचा फेसपॅक

हा पॅक तयार करण्यासाठी प्रथम 2 चमचे कच्चे दूध आणि 1 चमचे चंदन पावडर एकत्र मिसळा. नंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. चेहऱ्यावर लावल्यानंतर किमान 10 मिनिटे ही पेस्ट राहू द्या आणि मग पाण्याने चेहरा स्वछ करा. त्वचेवरील घाण दूर करण्यासाठी आणि चेहरा उजळवण्यासाठी चंदन फायद्याचे मानले जाते.

कोरफड आणि कच्च्या दुधाचा फेसपॅक

यासाठी कच्चे दूध आणि ताजे एलोवेरा जेल मिक्स करून फेस पॅक बनवा. हा फेस पॅक अगदी स्किन टोन वाढवण्यासाठी उत्तम आहे. चेहऱ्यावर लावा आणि किमान 15 ते 20 मिनिटे राहू द्या. त्वचेवरील जळजळ कमी करण्यासाठी हा फेस पॅक उत्तम आहे.

Raigad News: ४७ गावं, ३३ आदिवासी वाड्या तहानलेल्या! उमटे धरणाच्या गाळमुक्तीसाठी संघर्ष ग्रुप आक्रमक, १३ कंपन्यांना दिले निवेदन

Supriya Sule CM News : सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार? राऊत म्हणाले, त्यांच्या शपथविधीला मी जाणार! राज्यात पुन्हा होणार राजकीय भूकंप?

Baba Aparajith Retirement: CSK च्या 'या' खेळाडूचा क्रिकेटला रामराम; IPL 2027 ऑक्शनपूर्वी घेतला मोठा निर्णय

जुन्नर तालुक्यात बिबट्याचा भरदिवसा हल्ला; एका महिलेचा मृत्यू तर दुसरी जखमी

शत्रूसोबत पण असं घडायला नको! क्रीजपासून लांब राहून देखील फलंदाज OUT! विचित्र घटनेचा Video Viral