थंडीच्या दिवसांमध्ये शरीर हायड्रेट ठेवणे का आवश्यक आहे?
शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी काय करावे?
शरीरातील पाण्याची पातळी कमी होण्याची करणे?
राज्यासह संपूर्ण देशभरात हिवाळा ऋतूला सुरुवात झाली आहे. थंडीच्या दिवसांमध्ये वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे तहान कमी होऊन जाते आणि पाणी पिण्याची जास्त इच्छा होत नाही. उन्हाळ्यातील घामाचा त्रास होत नसल्यामुळे आणि थंडाव्यामुळे जास्त पाणी प्यायले जात नाही. पण तहान कमी झाल्यामुळे पाणी कमी पिणे शरीरासाठी धोक्याचे ठरू शकते. कमी पाण्याच्या सेवनामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते आणि आरोग्य बिघडते. थंडीत पचनक्रिया सुरळीत चालू ठेवण्यासाठी आणि त्वचा कोरडी पडू नये म्हणून भरपूर पाणी प्यावे.
शरीराला आवश्यक असलेल्या प्रमाणात पाणी प्यायल्यामुळे थंडीत शरीर ताजेतवाने आणि हायड्रेटेड राहण्यास मदत होते. पण कमी पाण्याच्या सेवनामुळे अपचनाच्या समस्या, घसा कोरडा पडणे, लघवी करताना जळजळ किंवा वेदना होणे इत्यादी समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश करावा. या पदार्थांच्या सेवनामुळे पाण्याची पातळी संतुलित राहते आणि शरीर हायड्रेट राहते.(फोटो सौजन्य – istock)
फळे, भाज्यांचे सेवन:
वातावरणात सतत काहींना काही बदल होत असतात. हे बदल लक्षात घेऊन आहारात बदल करणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. थंडीच्या दिवसांमध्ये काकडी, मुळा, टोमॅटो, पालक आणि कोबी यांसारख्या भाज्या खाव्यात. कारण या भाज्यांमध्ये आवश्यक प्रमाणात पाणी असते. तर फळांमध्ये संत्री, मोसंबी, पेरू, सफरचंद किंवा डाळिंब यांसारखी फळे खाणे हिवाळ्यात लाभदायक ठरते. फळे आणि भाज्यांमधून शरीराला आवश्यक प्रमाणात पाणी मिळते. याशिवाय शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. त्यामुळे थंडीत जळलेले जड आणि तिखट पदार्थ खाण्याऐवजी पचनास हलके असलेले पदार्थ खावेत.
सूप, ताक:
हिवाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक घरात आवर्जून मिक्स भाज्यांचे किंवा चिकनचे सूप बनवले जाते. सूप प्यायल्यामुळे शरीरात उबदारपणा कायम टिकून राहतो. भाज्यांचे सूप, डाळीचे सूप किंवा चिकन सूप प्यायल्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी सुधारते. याशिवाय दुपारच्या जेवणानंतर नियमित एक ग्लास ताक प्यावे. ताक प्यायल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासोबतच शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. चहा-कॉफीचे प्रमाण खूप वाढवण्याऐवजी सूप, ताक किंवा कोमट पदार्थांचे सेवन करावे.
सुका मेवा, बिया:
केवळ पाण्यावर अवलंबून न राहता सुका मेवा, बियांचा आहारात समावेश करावा. भिजवलेले बदाम, अक्रोड, भोपळ्याच्या बिया किंवा तीळ, गूळ यांसारखे पदार्थ थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला आवश्यक पोषण देतात. दिवसभरात थोडे-थोडे करत कोमट पाणी पिण्याची सवय लावावी. अतिखूप मीठ, अतिखारट किंवा अतिप्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्यामुळे आरोग्य बिघडून जाते आणि शरीराला हानी पोहचते.