लाइफ स्टाइल

भिंतीवरील काळे डाग घराचा लूक खराब करतायेत? या घरगुती पदार्थांचा वापर करून क्षणार्धात दूर करा हट्टी डाग

पावसाळ्यात भिंतींवर बुरशीच्या समस्या उद्भवू लागतात, यामुळे घरातील भिंतींवर हट्टी डाग राहतात जे घराचा लूक खराब करत असतात. तसेच ही बुरशी अनेक रोग-राईंना आमंत्रण देत असते, त्यामुळे तिला वेळीच दूर करणे फार गरजेचे आहे. ही बुरशी आणि तिचे हट्टी डाग दूर करण्यासाठी तुम्हाला कोणतेही महागड्या गीष्टींची आवश्यकता नाही. तुम्ही घरगुती गोष्टींचा वापर करून अगदी सहज हे डाग घालवू शकता.

नुपूर भगत

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. पावसाळ्यात दमट वातावरण असते. या ऋतूत आरोग्याबरोबरच इतरही समस्या उद्भवत असतात. यातीलच एक समस्या म्हणजे, भिंतींवर वाढणारी बुरशी. .पाऊस आणि आर्द्रतेमुळे बहुतेक लोक त्यांच्या घराच्या भिंतींवर वाढणाऱ्या बुरशीच्या समस्येने त्रस्त असतात. यामुळे आपल्या घराचा एकंदरीत लूक खराब होतो आणि पाहुणे आले की, आपल्यालाही त्यामुळे थोडे अवघडल्यासारखे वाटू लागते. तसेच ही बुरशी तुमच्या त्वचेसाठीही धोकादायक ठरत असते त्यामुळे हिला वेळीच दूर करणे फार गरजेचे असते.

बुरशीच्या संपर्कात आल्याने काहींना ऍलर्जीच्या समस्यांना सामोरे जायला लागू शकते. ज्यामुळे त्वचेची जळजळ, लालसरपणा, खाज सुटणे यासारख्या समस्या वाढू शकतात. यामुळे संसर्गाचा धोकादेखील वाढू शकतो. अशा परिस्थितीत, घराच्या भिंतींमधून बुरशीची साफसफाई करणे खूप महत्वाचे आहे. पण काही घरगुती गोष्टीचा वापर करून तुम्ही या गोष्टी घरातून दूर करू शकता.

बुरशीपासून सुटका कशी मिळवावी

पावसाळ्यात हवेत आर्द्रता असते, त्यामुळे घरात ठेवलेल्या वस्तू ओलसर राहतात. अशा परिस्थितीत तुमच्या घरात ताजी हवा खेळती राहील याची खबरदारी घ्या. यासाठी घरातील खिडक्या या बंद न ठेवता उघड्या करून ठेवत जा, जेणेकरून बाहेरील हवा किंवा ऊन घरात येत राहील. घरातील फर्निचर किंवा बुक शेल्फ भिंतींना चिकटणार नाहीत याची काळजी याची काळजी घ्या. बुरशी प्रथम भिंतीवर येत असते त्यामुळे कोणतीही गोष्ट भिंतीजवळ एकदम चिटकून अशी ठेवू नका. बुरशी जर लागलीच तिला दूर करण्यासाठी तुम्ही ब्लीचचा वापर करू शकता.

लिंबाचा वापर करा

लिंबूमध्ये ब्लीचिंग एजंट असते, जे फंगसची समस्या दूर करण्यासाठी प्रभावी मानले जाते. त्यामुळेच घरातील बुरशी दूर करण्यासाठी तुम्ही लिंबाचा वापर करू शकता. यासाठी प्रथम तुम्हाला कोमट पाण्याने ज्या भागात बुरशीची वाढ होत आहे ती जागा धुवावी लागेल आणि नंतर लिंबाचा रस किंवा लिंबाचा तुकडा घासाल्याने फायदा होईल. यांनतर ब्रश किंवा स्क्रबचा मदतीने बुरशी साफ करा.

व्हिनेगरने करा सफाई

बुरशी किंवा हट्टी डाग दूर कारण्यासाठी व्हाईट व्हिनेगर हा एक नैसर्गिक आणि प्रभावी उपाय आहे. यासाठी, फक्त पांढरे व्हिनेगर थोड्या प्रमाणात पाण्याने मिसळून पातळ करा आणि नंतर थेट बुरशीच्या पृष्ठभागावर याची फवारणी करा. यानंतर ते काही तास तसेच राहू द्या आणि नंतर एका कापडाने स्वच्छ करा. हा उपाय 2 ते 3 वेळा केल्यावर तुम्हाला निश्चितच फरक जाणवेल.

कपूराचा करा वापर

अंधाऱ्या आणि बंद खोल्यांमध्ये बुरशीची वाढ जास्त होते, अशा परिस्थितीत तुम्ही कापूर वापरू शकता. यासाठी कापूर गोळ्या आणि लवंगा कापडात बांधून वॉर्डरोब, शू रॅक किंवा बुक शेल्फमध्ये ठेवा. बुरशी न येण्यासाठी हा उपाय फार प्रभावी मानला जातो. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही इतर ठिकाणीही वापरू शकता जिथे बुरशीच्या समस्या येतात.

Raigad News: ४७ गावं, ३३ आदिवासी वाड्या तहानलेल्या! उमटे धरणाच्या गाळमुक्तीसाठी संघर्ष ग्रुप आक्रमक, १३ कंपन्यांना दिले निवेदन

Supriya Sule CM News : सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार? राऊत म्हणाले, त्यांच्या शपथविधीला मी जाणार! राज्यात पुन्हा होणार राजकीय भूकंप?

Baba Aparajith Retirement: CSK च्या 'या' खेळाडूचा क्रिकेटला रामराम; IPL 2027 ऑक्शनपूर्वी घेतला मोठा निर्णय

जुन्नर तालुक्यात बिबट्याचा भरदिवसा हल्ला; एका महिलेचा मृत्यू तर दुसरी जखमी

शत्रूसोबत पण असं घडायला नको! क्रीजपासून लांब राहून देखील फलंदाज OUT! विचित्र घटनेचा Video Viral