लाइफ स्टाइल

Tiramisu: घरीच बनवा इटालियन तिरामिसू, कॉफी आणि क्रीमच्या स्वादिष्ट डेझर्टची सोपी रेसिपी!

Tiramisu: कॉफीचा सुगंध, मऊसर बिस्किटे, क्रीमी टेक्स्चर आणि कोको पावडरची हलकी कडवट चव यांचा मिलाफ असलेला तिरामिसू हा इटलीतील लोकप्रिय डेझर्ट आहे. गोड पदार्थ आणि कॉफी आवडणाऱ्यांसाठी ही रेसिपी खास आहे. विशेष म्हणजे, ओव्हनचा वापर न करता मस्करपोने चीज, व्हिपिंग क्रीम, कॉफी आणि सॅव्होयार्डी बिस्किटांच्या मदतीने घरच्या घरी स्वादिष्ट तिरामिसू तयार करता येतो. जाणून घ्या ही सोपी नो-बेक तिरामिसू रेसिपी आणि तो बनवताना घ्यायची काळजी.

siddhi

गोड पदार्थ खायला आवडणाऱ्यांसाठी तिरामिसू हा एक उत्तम डेझर्ट पर्याय आहे. इटलीमधील प्रसिद्ध असलेला हा पदार्थ आता जगभर लोकप्रिय झाला आहे.भारतात ही विधविध ठिकाणी पाहायला मिळतो. कॉफीचा सुगंध, मऊसर बिस्किटे, क्रीमी टेक्स्चर आणि वरून भुरभुरलेली कोको पावडर यामुळे तिरामिसूची चव अधिक खास लागते. गोड ,कडू अशी चव एकाच वेळी लागल्यामुळे खाताना अजून छान वाटते. कॉफी प्रेमींना हा पदार्थ नक्कीच आवडेल. विशेष म्हणजे हा पदार्थ बनवण्यासाठी ओव्हनची गरज नसते. काही मोजक्या साहित्यांचा वापर करून तुम्ही घरच्या घरी रेस्टॉरंटसारखा तिरामिसू तयार करू शकता. वाढदिवस, पार्टी किंवा पाहुण्यांसाठी हा एक आकर्षक डेझर्ट ठरू शकतो.

१. तिरामिसू बनवण्यासाठी साहित्य लागणारे साहित्य जाणून घेऊया.

तिरामिसू तयार करण्यासाठी २०० ग्रॅम सॅव्होयार्डी बिस्किटे, एक कप कॉफी, २०० ग्रॅम मस्करपोने चीज, अर्धा कप व्हिपिंग क्रीम, चार ते पाच चमचे साखर आणि दोन चमचे कोको पावडर घ्यावी. मस्करपोने चीज उपलब्ध नसल्यास क्रीम चीज वापरू शकता. मात्र त्यामुळे मूळ चवीत थोडा फरक पडू शकतो.

२. कॉफीचे मिश्रण तयार करा

सर्वप्रथम एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यामध्ये इन्स्टंट कॉफी पावडर मिसळा. कॉफी व्यवस्थित एकजीव करून थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. कॉफी पूर्ण थंड झाल्यानंतरच बिस्किटे त्यात बुडवा. यामुळे बिस्किटांचा आकार टिकून राहण्यास मदत होते.

३. क्रीमी मिश्रण बनवा.

एका भांड्यात मस्करपोने चीज आणि साखर एकत्र करून हलक्या हाताने फेटून घ्या. दुसऱ्या भांड्यात व्हिपिंग क्रीम घट्ट होईपर्यंत फेटा. त्यानंतर दोन्ही मिश्रणे एकत्र करून मऊसर क्रीम तयार करा. हे मिश्रण तिरामिसूला खास चव आणि मऊसर पोत देते.

४. बिस्किटांचे थर लावा.

आता सॅव्होयार्डी बिस्किटे थंड कॉफीमध्ये एक ते दोन सेकंद बुडवून बाहेर काढा. एका काचेच्या भांड्यात बिस्किटांचा पहिला थर लावा. त्यावर तयार केलेले क्रीम मिश्रण पसरवा. त्यानंतर पुन्हा बिस्किटांचा आणि क्रीमचा दुसरा थर तयार करा.

५. कोको पावडरचा वापर करा.

सर्वांत शेवटी क्रीमच्या थरावर चाळणीच्या मदतीने कोको पावडर भुरभुरवा. यामुळे तिरामिसूला सुंदर लुक मिळतो. आवडीनुसार वरून थोडे चॉकलेट किसूनही घालू शकता.

६. फ्रिजमध्ये थंड करा.

तयार तिरामिसू किमान सहा ते आठ तास फ्रिजमध्ये ठेवा. शक्य असल्यास रात्रभर थंड होऊ द्या. त्यामुळे बिस्किटे, कॉफी आणि क्रीमचे थर व्यवस्थित एकत्र येतात. थंड झाल्यानंतर त्याचे चौकोनी तुकडे करून सर्व्ह करा.

७.Tiramisu बनवताना कोणती काळजी घ्यावी?

बिस्किटे कॉफीमध्ये जास्त वेळ बुडवू नयेत, अन्यथा ती जास्त मऊ होऊन तुटू शकतात. क्रीमचे मिश्रणही अतिप्रमाणात फेटू नये. लहान मुलांसाठी तिरामिसू बनवत असल्यास कॅफीनमुक्त कॉफीचा वापर करू शकता.जास्त कॉफीचा वापर टाळा,त्याने या पदार्थाला कडवटपणा येऊ शकतो.

अशा प्रकारे घरच्या घरी कोणत्याही बेकिंगशिवाय स्वादिष्ट तिरामिसू तयार करता येतो. कॉफी आणि क्रीमची अनोखी चव असलेला हा डेझर्ट तुमच्या कुटुंबातील प्रत्येकाला नक्कीच आवडेल.

Rohit Sharma: आला रे आला, मुंबईचा राजा आला! 'हिटमॅन' पुन्हा Mumbai Indians चा कर्णधार

Maharashtra News : ‘सेवा दूत अभियान’ १ डिसेंबरपासून राज्यभर राबवणार; लोककल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे रवींद्र चव्हाण यांचे आवाहन

Nashik News : नाशिकमध्ये महापालिकेच्या रुग्णालयाची दुराव्यस्था; फाटलेल्या गाद्या अन् वॉर्डात मांजरांच्या मुक्तसंचाराने रुग्ण भयभीत

MSRTC NCMC Card: एसटीच्या एनसीएमसी कार्डसंदर्भात मोठी अपडेट! ५० रुपयांची अट रद्द, आता फक्त ५ रुपयांचे टॉपअप

Kia India Spinny Partnership: किया इंडियाची स्पिनीसोबत भागीदारी! नवीन किया कारमध्ये अपग्रेड करणे झाले अधिक सोपे