लाइफ स्टाइल

विकत आणायची गरज नाही, या टिप्स फॉलो करून घरीच तयार करा घट्ट दही

दही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. दही तुमचे पोट निरोगी ठेवते. अनेकजण आपल्या आहारात दहीचे सेवन करत असतात. मात्र दररोज दहीचे सेवन चांगले नसते. अशात बाजारातील दाही आणण्याऐवजी तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने घट्ट दही तयार करू शकता. मुख्य म्हणजे यासाठी तुम्हाला कोणतीही विशेष मेहनत घेण्याची गरज नाही. फक्त काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही घरातच घट्ट दही तयार करू शकता.

नुपूर भगत

भारतीय स्वयंपाकघरात दही मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. अनेकदा जेवल्यानंतर किंवा जेवणातच वापर केला जातो. अनेक भाज्यांची चव वाढवण्यासाठी किंवा टेस्टी ग्रेव्ही बनवताना ही दही फार मदतीची ठरत असते. मात्र दररोज दहीचे सेवन आरोग्यासाठी चांगले नाही. अशा परिस्थितीत तुम्ही घरीच बाजारात विकत मिळते अशी घट्ट दही तयार करू शकता. विकतच्या पदार्थांमध्ये अधिकतर रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो अशात जितक्या जास्त गोष्टी तुम्ही घरी बनवाल तितके तुमच्या आरोग्यासाठी उत्तम राहील.

दही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. निरोगी ठेवण्यास दहाची मदत होत असते. त्वचेची चमक वाढवण्यासही दही फायद्याची ठरत असते. आता अनेकांना दही घरी कसे बनवावे ते माहिती नसते. तसेच बऱ्याच जणांची दही घरी हवी तशी घट्ट होत नाही. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी दही बनवण्यसाठीच्या काही टिप्स घेऊन आलो आहोत. या टिप्स फॉलो करून तुम्ही घरच्या घरी बाजारासारखी घट्ट दही तयार करू शकता.

दही कसे बनवावे

दही बनवण्यासाठी तुम्ही मिरचीचा वापर करू शकता. यासाठी तुम्हाला 3-4 हिरव्या मिरच्या लागतील. . फक्त त्याच्या मदतीने तुम्ही तुमचे परिपूर्ण दही सेट करू शकता. दही बनवण्यासाठी दूध उकळवून कोमट होईपर्यंत थांबा. आता ज्या भांड्यात दही बनवायचे आहे त्या भांड्यात दूध टाका आणि मग यात 3-4 हिरव्या मिरच्या घेऊन त्यावरील देठ तोडून दुधात टाका. यानंतर रात्रभर खोलीच्या तापमानावर हे भांडे बाजूला ठेवून द्या. सकाळी तुम्हाला यात बाजारासारखे दही गोठल्याचे दिसून येईल. यानंतर फ्रिजमध्ये ठेवून तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही या दहाचा वापर करू शकता.

घट्ट दही बनवण्याच्या टिप्स

  • एका मोठ्या भांड्यात दूध मध्यम आचेवर गरम करा. मोठे भांडे वापरल्याने दूध उकळताना गळती थांबते
  • दही बनवण्यासाठी 10 ते 15 मिनिटे दूध मंद आचेवर उकळू द्या, यामुळे दही घट्ट होण्यास मदत होईल
  • यानंतर दूध खोलीच्या तापमानावर येऊ द्या
  • लक्षात ठेवा की दूध कोमट आणि पूर्णपणे थंड नसावे
  • यानंतर दुधाला फेस येईपर्यंत याला नीट फेटा
  • फ्रॉथ केलेले दूध दही घट्ट होण्यास मदत करते
  • आता दुधात दोन चमचे दही घाला आणि चांगले मिसळा
  • मग हे मिश्रण रात्रभर सेट होण्यासाठी झाकून ठेवा
  • सकाळी तुम्हाला यात घट्ट दही तयार झाल्याचे दिसून येईल

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस फेसलिफ्ट भारतात लाँच! किंमत 19.59 लाखांपासून, E85 फ्युलवरही धावणार

कार वळवण्याच्या वादातून तरुणाचा खून; आठ दोषींना न्यायालयाने सुनावली 'ही' मोठी शिक्षा

Health: रोज अंडी खाण्याचे शरीराला होतात हे ७ फायदे; जाणून घ्या अंड्यामधील पोषक घटकांचे महत्त्व!

भारत आणखी तापणार? उन्हाचा चटका वाढणार, मान्सूनही होणार अधिक तीव्र

Suresh Raine BirthDay, त्याचा 'हा' खास विक्रम तुम्हाला ठाऊक आहेत का?