सतत ओव्हरथिंकिंग केल्यामुळे मानसिक थकवा, चिंता, चिडचिड आणि झोपेच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
मन शांत ठेवण्यासाठी ध्यान, योग, डायरी लिहिणे, आवडते छंद जोपासणे आणि सोशल मीडियापासून काही वेळ दूर राहणे यांसारख्या सवयी अंगीकारा.
सतत विचार करण्याच्या सवयीचा दैनंदिन जीवनावर परिणाम होत असल्यास विश्वासू व्यक्तींशी बोला आणि गरज भासल्यास मानसिक आरोग्यतज्ज्ञांची मदत घ्या.
अनेक व्यक्तींना नैराश्यामुळे झोप येत नाही त्याने सतत विचार करणे वाढते पण त्यामुळे कोणताच उपाय सापडणार नाहीये त्यामुळे सतत विचार करणे हे चुकीच्या मार्गावर घेऊन जाते. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेकांना सतत विचार करण्याची सवय लागली आहे. एखादी छोटीशी गोष्ट घडली तरी त्याबद्दल वारंवार विचार करणे, भविष्यात काय होईल याची चिंता करणे किंवा भूतकाळातील चुका आठवत बसणे याला ओव्हरथिंकिंग (Overthinking) म्हणतात. अनेकदा एखाद्या समस्येवर उपाय शोधण्याऐवजी आपण त्याच गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करत राहतो. यामुळे मानसिक थकवा, अस्वस्थता, चिडचिड आणि झोपेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सतत विचारांच्या चक्रात अडकण्याऐवजी मन शांत ठेवण्यासाठी काही सवयी अंगीकारणे गरजेचे आहे.
रिकाम्या वेळेत अनेकदा नकारात्मक विचार मनात येऊ लागतात. त्यामुळे स्वतःला आवडणाऱ्या छंदांमध्ये वेळ घालवा. पुस्तक वाचणे, चित्र काढणे, संगीत ऐकणे, स्वयंपाक करणे किंवा बागकाम करणे अशा गोष्टींमुळे मन दुसरीकडे वळण्यास मदत होते.त्यासाठी आधी तुम्हाला आवडणारा कोणता छंद आहे तो शोधून काढा.छंद कोणताही असो तुम्ही त्या गोष्टी मध्ये गुंतून राहिल्यावर नकारत्मक विचार येत नाहीत.
मन शांत ठेवण्यासाठी ध्यान आणि योगा उपयुक्त ठरू शकतात.त्यामूळे तुमच्या मनाला शांताता मिळेल आणि मन एकाग्र राहील. दररोज १० ते १५ मिनिटे शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा. दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. नियमित सरावामुळे तणाव हाताळण्यास मदत होऊ शकते.योगा राज केल्यास तुम्हाला रोजच्या जीवनात देखील मनाला शांती लाभेल
ओव्हरीथिंकिंगचा खूप मोठा कारण म्हणजे सतत येणार अपयश आणि दैनंदिन जीवनातील समस्या.ह्यामुले सतत चिंता आणि निराशा हे ओव्हरीथिंकिंगचे मुळ असते.एखादी घटना घडली की त्यामागील वाईट शक्यता शोधण्याऐवजी वास्तववादी दृष्टिकोन ठेवा. स्वतःला विचारा की, मी करत असलेला विचार खरोखर तथ्यांवर आधारित आहे का? प्रत्येक गोष्टीचा वाईट परिणाम होईलच असे नाही, हे स्वतःला समजावून सांगा.
मनात सुरू असलेले विचार कागदावर लिहिल्याने भावना व्यक्त करणे सोपे जाते.तसेच आपले विचार अजूनच स्पष्ट होत जातात.त्यामुळे मनावरचा भार कमी होण्यास मदत होईल. कोणत्या गोष्टीची चिंता वाटते, त्यावर काय उपाय करता येईल आणि कोणत्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत, हे लिहून ठेवा. यामुळे विचार अधिक स्पष्ट होण्यास मदत मिळते.
सतत सोशल मीडिया पाहणे, इतरांशी स्वतःची तुलना करणे आणि नकारात्मक बातम्या वाचणे यामुळे मानसिक अस्वस्थता वाढू शकते. त्यामुळे दिवसातील काही वेळ मोबाईलपासून दूर राहा. त्याऐवजी कुटुंबीयांसोबत वेळ घालवा.सोशल मीडिया च्या सतत वापर हा देखील मोठा मुद्दा आहे कारण जास्त सोशल मीडिया वरती ऍक्टिव्ह असल्यामुळे त्याच गोष्टी बद्दल विचार करत राहणे अयोग्य आहे. त्यामुळे तुमच्या कुटुंबीयांची संवाद साधण्याचा प्रयत्न करा.
सतत फोने वर राहिल्यामुळे झोप न येण्याचे प्रमाण देखील वाढत जात आहे. त्या मोबाइल वापरण्याची एक मर्यादित वेळ ठेवा.झोपेच्या कमतरतेमुळे चिडचिड, अस्वस्थता आणि एकाग्रतेच्या समस्या जाणवू शकतात. त्यामुळे दररोज पुरेशी झोप घ्या. तसेच संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि योग्य दिनचर्या पाळण्याचा प्रयत्न करा.
मनात सतत विचार सुरू असतील तर ते स्वतःपुरते मर्यादित ठेवू नका. विश्वासू मित्र, कुटुंबीय किंवा जवळच्या व्यक्तींशी संवाद साधा. ओव्हरथिंकिंगमुळे दैनंदिन जीवन, झोप किंवा नात्यांवर परिणाम होत असल्यास समुपदेशक किंवा मानसिक आरोग्यतज्ज्ञांची मदत घ्या.
लक्षात ठेवा: प्रत्येक विचारावर नियंत्रण ठेवणे शक्य नसते; मात्र त्या विचारांना कसा प्रतिसाद द्यायचा हे शिकता येते. स्वतःला दोष न देता छोट्या-छोट्या बदलांपासून सुरुवात करा.