थंडीत आरोग्याची काळजी घ्यायचीय?
रोजच्या आहारात या फळे-भाज्यांचा करा समावेश
रोगप्रतिकारशक्तीपासून पचनापर्यंत मिळतील फायदे
Winter Health Tips: हिवाळ्यात आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे या ऋतुमध्ये आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. थंडीच्या दिवसात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, निरोगी शरीर राखण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी आणि आजार टाळण्यासाठी आरोग्यदायी आहार घेणे आवश्यक आहे. त्यामुळे, अनेक लोकांना प्रश्न पडतो की हिवाळ्यात कोणती फळे आणि भाज्या खाल्ल्या पाहिजेत.
हिवाळ्यात बाजारात अनेक हंगामी फळे आणि भाज्या उपलब्ध असतात. ज्या जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतात. परंतु, हिवाळ्यात कोणती फळे आणि भाज्या खाव्यात, तसेच त्यांचे शरीराला कोणते होतात, जाणून घेऊयात.
संत्री
संत्री हे व्हिटॅमिन सीने समृद्ध आहे. संत्रीचे सेवन केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. हिवाळ्यात तुम्ही संत्रीचा आहारात समावेश करू शकता.
पेरू
पेरूमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर जास्त प्रमाणात आढळतात. पेरु पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते आणि शरीराला आवश्यक पोषक तत्व पुरवते.
सफरचंद
सफरचंदात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स सारखे पोषक तत्व आढळतात. दररोज सफरचंद खाल्ल्याने पचनक्रिया सुरळी होते. तसेच आरोग्याला अनेक फायदे होतात.
आवळा
आवळा व्हिटॅमिन सीचा एक उत्कृष्ट स्रोत आहे. त्यातील अँटिऑक्सिडंट्स शरीराला ऑक्सिडेटिव्ह ताणापासून वाचवण्यास मदत करतात.याशिवाय, आवळा त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर ठरते.
पपई
पपईमध्ये व्हिटॅमिन सी सोबत फायबर आणि व्हिटॅमिन ए असते. पपईचा दररोजच्या आहारात समावेश केल्यास पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होऊ शकते.
गाजर
गाजरामध्ये बीटा-कॅरोटीन असते. ज्याचे शरीर व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतर करते. हे पोषक तत्व डोळ्यांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.
पालक
पालकामध्ये आयरन , फोलेट, व्हिटॅमिन के आणि फायबर असते. ते शरीराला आवश्यक पोषण पुरवण्यास मदत करते.
मेथी
मेथीच्या पानांमध्ये फायबर, आयरन आणि इतर अनेक पोषक तत्वे असतात. हिवाळ्यात मेथीची भाजीचे तुम्ही पराठे किंवा भाजी बनवू शकता.
मुळा
मुळ्यामध्ये भरपूर पाणी आणि फायबर असते. यामुळे थंडीच्या दिवसात शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.
वाटाणे
हिरव्या मटारमध्ये प्रथिने, फायबर आणि जीवनसत्त्वे असतात. त्यामुळे तुम्ही मटारचा आहारात समावेश करु शकता. मटारचा सॅलड किंवा पराठ्यांमध्ये वापर केला जाऊ शकतो.