दूध दान कसे केले जाते (फोटो सौजन्य - iStock) 
लाइफ स्टाइल

World Breastfeeding Week: कुठे दान केले जाते Breast Milk, कोणत्या संस्था करतात काम?

नवजात मुलांसाठी आईचे दूध अमूल्य असते. जेव्हा आई दूध देण्यास असमर्थ असते, तेव्हा दान केलेले आईचे दूध बाळांचे जीवन वाचवू शकते. दूध दान कुठे आणि कसे केले जाते ते जाणून घ्या.

दिपाली नाफडे

अनेकदा नवजात आईला पहिल्या दिवसापासूनच दूध येत नाही. मग अशावेळी पावडरचे दूध देण्याशिवाय पर्याय नसतो. अनेकदा आई खूप प्रयत्न करते पण बाळाला तिला दूध पाजता येत नाही आणि कधी कधी तर नवजात आईचे दूध ३-४ दिवसात आटूनही जाते. यासाठी अनेकदा शतावरी, आळशी अशा पदार्थांचे सेवनही केले जाते. पण अनेकदा काही नवजात आईंना दूध येतच नाही. मग बाळाला सहा महिने कसे दूध देणार हा प्रश्न पडतो. 

दरम्यान काही संस्था अशा आहेत, ज्या आईचे दूध दान करतात. आता म्हणजे नक्की काय आणि अशा कोणत्या संस्था आहेत जे असे कार्य करतात हे आपण जागतिक स्तनपान सप्ताहाच्या निमित्ताने जाणून घेऊया (फोटो सौजन्य - iStock) 

भारतात आईचे दूध कुठे दान केले जाते?

सायन हॉस्पिटल (मुंबई)

१९८९ मध्ये स्थापन झालेली ही भारतातील पहिली मानवी दूध बँक आहे. तिला "सुधा साळवी मानवी दूध बँक" असेही म्हणतात. तुम्ही येथून आईचे दूध दान मिळवू शकता आणि आपल्या बाळाला देऊ शकता. 

फोर्टिस ला फेमे हॉस्पिटल (दिल्ली)

येथे दूध संकलन आणि सुरक्षित साठवणुकीची प्रक्रिया अत्याधुनिक तंत्रज्ञानाने केली जाते. ते नवजात शिशु अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) दाखल असलेल्या मुलांना हे दूध पुरवते. अनेकदा मुलांंसाठी इथून दुधाचा पुरवठा केला जातो. 

अमराह मिल्क बँक (हैदराबाद)

ही एक आघाडीची खाजगी मिल्क बँक आहे जी देणगी आणि वितरण दोन्ही करते, विशेषतः अकाली जन्मलेल्या किंवा आजारी बाळांसाठी.

रोटरी क्लब मिल्क बँक

भारतातील अनेक रोटरी क्लब विशेषतः ग्रामीण आणि गरजू भागात मानवी दूध बँकांना मदत करत आहेत.

दूध कोण दान करू शकते?

  • दूध देणाऱ्या आईने शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असणे महत्वाचे आहे
  • तिला कोणताही संसर्गजन्य आजार नसावा
  • तिने कोणतेही औषध किंवा मादक पदार्थ घेत नसावेत
  • डॉक्टरांच्या तपासणीनंतरच दूध स्वीकारले जाते

दूधदानाचे फायदे

  • अकाली जन्मलेल्या बाळांचे प्राण वाचतात
  • रोगांशी लढण्यासाठी आईचे दूध सर्वात प्रभावी आहे
  • फॉर्म्युला दुधावरील अवलंबित्व कमी होते
  • सामाजिक जबाबदारी पूर्ण होते

स्तन दूध दान हे एक पाऊल आहे जे लहान मुलांच्या आयुष्यात प्रकाश आणू शकते. ते केवळ औषधाचाच एक भाग नाही तर भावनिक बंधन देखील आहे. आईच्या प्रेमाचा विस्तार जर तुम्ही किंवा तुमच्या आजूबाजूची कोणतीही आई दूध दान करू शकत असाल तर ही माहिती शेअर करा.

Mumbai News: भारतावर अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळाचे संकट! महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थितीची चिन्हे

मिनी महाबळेश्वर गारठलं! तापमान थेट एकेरी अंकात; पर्यटकांचा ओढा वाढला

Kolhapur Drink and Drive: कोल्हापुरात मद्यधुंद कारचालकाने दोघा भावांना चिरडले; गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाला अटक

जुन्या कॅसेटला मिळाली नवी ओळख! 44 वर्षांपूर्वी फ्लॉप झालेलं गाणं GTA 6 मुळे पुन्हा ट्रेंडमध्ये

Bajra Soup: थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात करा बाजरीच्या सूपचा समावेश, पित्ताच्या त्रासापासून मिळेल सुटका