राज्यात थंडीची प्रतीक्षा वाढली (फोटो- ai gemini) उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव झाला कमी
महाराष्ट्र

Winter: आला थंडीचा महिना पण हवेतून गारवा गायब; डिसेंबरमध्ये हुडहुडी की उकाडा? वाचा सविस्तर

बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळांमुळे दक्षिणेकडील वाऱ्यांची दिशा आणि प्रवाह बदलला आहे. हे वारे महाराष्ट्राच्या दिशेने येत असल्याने किमान तापमानात अपेक्षित घट होत नाही.

तेजस भागवत
  • तीन चक्रीवादळांनी बदलले वाऱ्यांचे गणित

  • उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव झाला कमी

  • महाराष्ट्रात किमान तापमानात अपेक्षित घट झालेली नाही

सुनयना सोनवणे / Cold Wave: नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस थंडीचा जोर वाढण्याची अपेक्षा असताना पुणे शहरासह राज्यात अद्यापही कडाक्याची थंडी जाणवत नाही. बंगालच्या उपसागरात सलग आलेल्या तीन चक्रीवादळांमुळे दक्षिण द्वीपकल्पातील वाऱ्यांच्या प्रवाहात बदल झाला आहे. परिणामी, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्याने महाराष्ट्रात किमान तापमानात अपेक्षित घट झालेली नाही.

यंदा तापमानातील सातत्याने होणाऱ्या चढ-उतारांमुळे थंडीच्या लाटेचे शास्त्रीय निकषही पूर्ण होत नसल्याचे हवामान तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. त्यामुळे डिसेंबरमधील थंडीची तीव्रता उत्तर भारतातून येणारे थंड वारे आणि पश्चिमी विक्षोभांच्या स्थितीवर अवलंबून राहणार आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (आयएमडी) वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी सांगितले की, बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळांमुळे दक्षिणेकडील वाऱ्यांची दिशा आणि प्रवाह बदलला आहे. हे वारे महाराष्ट्राच्या दिशेने येत असल्याने किमान तापमानात अपेक्षित घट होत नाही. त्यामुळे या चक्रीवादळांचा महाराष्ट्रातील थंडीवर अप्रत्यक्ष परिणाम झाला आहे.

महाराष्ट्राच्या जलसुरक्षेवर उष्णसंकट! कोकण-गोव्यात उष्ण मान्सून हवामान पट्टा वाढला

पुणे शहर आणि परिसरात बुधवारी (ता. २५) किमान तापमानात किंचित घट झाली असली, तरी कमाल तापमानात वाढ झाल्याने दिवसा उन्हाचा चटका जाणवत आहे. शहरात किमान तापमान १५.७ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. उपनगरातही तापमानात वाढ झाली आहे.

चिंचवड येथे १९.५ अंश सेल्सिअस, तर मगरपात भागात १९.४ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवले गेले. त्यामुळे सकाळी आणि रात्री जाणवणारी थंडी तुलनेने कमी झाली असून, दुपारच्या वेळी उन्हाचा तडाखा वाढला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, गुरुवारी (ता. २६) शहराच्या किमान तापमानात किंचित वाढ होऊन ते १६ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. शुक्रवारपासून (ता. २७) किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता असून, आगामी दिवसांत थंडीचा प्रभाव आणखी कमी होऊन उकाडा वाढण्याची शक्यता आहे.

IMD Weather : मान्सून पुन्हा सक्रिय? पावसाचा हायअलर्ट, गरज असेल तरच बाहेर पडण्याच्या सूचना

डिसेंबरमध्ये उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह, पश्चिमी विक्षोभांची स्थिती, ढगांचे आवरण आणि वाऱ्यांची दिशा यावर थंडीची तीव्रता ठरणार आहे. त्यामुळे पुढील महिन्यात थंडीचा कडाका वाढणार की तापमानातील चढ-उतार कायम राहणार, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस अपेक्षित थंडी का जाणवत नाही?

बंगालच्या उपसागरात सलग आलेल्या तीन चक्रीवादळांमुळे दक्षिण द्वीपकल्पातील वाऱ्यांच्या प्रवाहात बदल झाला आहे.

महाराष्ट्रात डिसेंबर महिन्यात थंडीचा जोर वाढणार का?

डिसेंबरमधील थंडीची तीव्रता उत्तर भारतातून येणारे थंड वारे आणि पश्चिमी विक्षोभांच्या स्थितीवर अवलंबून असणार आहे. त्यामुळे आगामी काळातील हवामानातील बदलांवर थंडीचा जोर ठरणार आहे.

WhatsApp वर आवाजासह Animated Stickers! स्वतःचे मजेदार स्टिकर्स कसे तयार कराल?

26/11 Mumbai Terror Attack : मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना अमेरिकेची श्रद्धांजली; दहशतवादाविरोधात भारतासोबत ठामपणे उभे राहू, अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांची ग्वाही

New Contra Fund Launch : गुंतवणूकदारांना मोठी संधी! अवघ्या 99 रुपयांपासून सुरू करता येणार गुंतवणूक; कसा मिळणार फायदा?

Chandrapur News: ११ वर्षांनंतरही चंद्रपूर मेडिकल कॉलेज नव्या इमारतीत नाहीच; प्रतीक्षा संपणार कधी?

Silver Chain Astrology: गळ्यात चांदीची साखळी घालण्याचे काय आहेत फायदे, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय महत्त्व