मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फोटो- ians) 
महाराष्ट्र

शंभराव्या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी CM Devendra Fadnavis?

CM Devendra Fadnavis: यंदा 100 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यनगरीत होणार आहे. याच्या तारखा देखील जाहीर झाल्या आहेत. जानेवारी महिन्यात हे संमेलन होणार आहे.

तेजस भागवत
  • शंभराव्या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी मुख्यमंत्री फडणवीस?

  •  मुख्यमंत्र्यांच्या प्रतिसादाकडे लागले सर्वांचे लक्ष

  • साहित्य महामंडळाकडून पद स्वीकारण्याबाबत पत्र  

CM Devendra Fadnavis: शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भूषवतील याची शक्यता आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने त्यांना स्वागताध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती करणारे पत्र पाठविले आहे. मुख्यमंत्र्यांकडून या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा संमेलनाच्या आयोजकांना आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची प्रतीक्षा साहित्य वर्तुळात सुरू झाली आहे. यंदा 100 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यनगरीत होणार आहे. याच्या तारखा देखील जाहीर झाल्या आहेत. जानेवारी महिन्यात हे संमेलन होणार आहे.

पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात २७ ते ३१ जानेवारीदरम्यान शतकमहोत्सवी साहित्य संमेलन रंगणार आहे. या ऐतिहासिक संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची मंगळवारी एकमताने निवड करण्यात आली. अध्यक्षपदाची निवड जाहीर झाल्यानंतर आता स्वागताध्यक्ष कोण असणार, याविषयी साहित्यप्रेमींमध्ये उत्सुकता आहे. महामंडळाने थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र पाठविल्याने फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

“जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहे तोवर…”; Akhil Bhartiya Sahitya संमेलनात मुख्यमंत्री स्पष्टच बोलले

दरम्यान, घोले रस्त्यावरील शंभराव्या साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे स्वागताध्यक्षपदाच्या निर्णयासोबतच संमेलनाच्या प्रत्यक्ष तयारीलाही लवकरच गती मिळण्याचे संकेत आहेत.

मागील तीन संमेलनांचे स्वागताध्यक्ष

९९ वे संमेलन (सातारा) – शिवेंद्रराजे भोसले

९८ वे संमेलन (दिल्ली) – शरदचंद्र पवार

९७ वे संमेलन (अमळनेर) – गिरीश महाजन

स्वागताध्यक्षपदाचे महत्त्व

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्षांइतकेच स्वागताध्यक्षपदही महत्त्वाचे मानले जाते. संमेलनाच्या आयोजनाची संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी स्वागताध्यक्षांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. नियोजनापासून विविध स्तरांवर आवश्यक सहकार्य मिळविण्यापर्यंत ते पुढाकार घेतात. त्यामुळे या पदासाठी संयोजक संस्थांकडून उद्योग, साहित्य, सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तीची निवड केली जाते.

Marathi Sahitya Sammelan : “तुमच्या समोर असणारा पाटील हा…”; काय म्हणाले Akhil Bhartiya Sahitya संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वागताध्यक्षपद स्वीकारण्याबाबत पत्र देण्यात आले आहे. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे.

-राजेश पांडे, संयोजक, शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन.

शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष कोण होण्याची शक्यता आहे?

शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भूषवण्याची शक्यता आहे.

देवेंद्र फडणवीस यांना स्वागताध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती कोणी केली आहे?

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शंभराव्या संमेलनाचे स्वागताध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली आहे.

थंडीत बाईकच्या सायलेन्सरमधून पांढरा धूर? सामान्य की धोक्याचा इशारा?

थंडीत बाईक सेल्फने सुरूच होत नाही? या 5 गोष्टी असू शकतात कारणीभूत!

Royal Enfield Himalayan 750 Launched: रॉयल एनफिल्ड हिमालयन 750 भारतात लाँच; किंमत 4.89 लाख रुपयांपासून, 1 डिसेंबरपासून बुकिंग सुरू

Solapur District Bank Election : जिल्हा बँकेचे थकीत पैसे एक-एक रुपया वसूल करणार; जयकुमार गोरे आक्रमक

Electric Kettle Auto Cut-Off – पाणी उकळल्यावर केटल आपोआप बंद कशी होते?