बारामतीत कऱ्हामाई नदी परिक्रमा आणि भव्य महाआरती; ५०० हून अधिक नागरिकांचा सहभाग Baramati News, Karha River, Maha Aarti,
महाराष्ट्र

Baramati News: बारामतीत कऱ्हामाई नदी परिक्रमा आणि भव्य महाआरती; ५०० हून अधिक नागरिकांचा सहभाग

Baramati News: नदी संवर्धनाचा संदेश आणि कऱ्हा नदीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी डेक्कन पठार वन्यजीव संरक्षण ट्रस्ट व बारामतीकरांच्या पुढाकारातून कऱ्हामाई नदी परिक्रमा व महाआरती झाली; ५०० हून अधिक नागरिक आणि ५० हून अधिक जोडप्यांनी सहभाग घेतला.

anuradha sagar
  • कऱ्हामाई परिक्रमा व भव्य महाआरती

  • पवार कुटुंबीयांकडून शुभेच्छा

  • धार्मिक व ऐतिहासिक वारशाची माहिती

Baramati News: बारामती शहरातून वाहणाऱ्या कऱ्हा नदीचे धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करण्यासोबतच नदी संवर्धनाचा संदेश देण्यासाठी डेक्कन पठार वन्यजीव संरक्षण ट्रस्टच्या पुढाकारातून आणि समस्त बारामतीकरांच्या वतीने कऱ्हामाई नदी परिक्रमा व भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कऱ्हामाईची विधिवत पूजा करून मंत्रोच्चारांच्या वातावरणात भव्य महाआरती करण्यात आली. या महाआरतीत ५० पेक्षा जास्त जोडपी आणि सुमारे ५०० पेक्षा जास्त नागरिकांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला, तर हा भक्तिमय सोहळा पाहण्यासाठी अनेक बारामतीकरांनी मोठी गर्दी केली होती.

दिवंगत अजितदादांच्या स्मृतींना वंदन करून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार, खासदार पार्थदादा पवार आणि युवा नेते जय पवार यांनी शुभेच्छा दिल्या होत्या.

यावेळी कऱ्हा नदीचे महात्म्य, नदीच्या तीरावर वसलेली काशीविश्वेश्वर, सिद्धेश्वर आणि पांढरीचा महादेव ही मंदिरे तसेच त्यांचा धार्मिक व ऐतिहासिक वारसा याविषयी माहिती देण्यात आली. याच कऱ्हा नदीच्या तीरावर ऐतिहासिक श्रीमंत बाबूजी नाईक यांचा भव्य वाडाही उभा आहे. मंदिरांचा आध्यात्मिक वारसा आणि नाईक वाड्यासारख्या ऐतिहासिक वास्तूंचे नदीशी असलेले नाते यामुळे कऱ्हा नदीचे बारामतीच्या इतिहासातील महत्त्व अधोरेखित झाले.

बारामतीच्या विकासात अजितदादांचे कऱ्हा नदीसाठीचे योगदानही महत्त्वपूर्ण राहिले आहे. नदीकाठचा विकास, स्वच्छता, सुशोभीकरण आणि परिसराच्या जतनासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला. त्यांच्या दूरदृष्टीतून नदी आणि शहराच्या विकासाचा परस्पर संबंध अधोरेखित झाला.

या प्रसंगी बारामती नगरीचे नगराध्यक्ष सचिन शेठ सातव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष किरण इंगळे, सर्व नगरसेवक व नगरसेविका, डेक्कन पठार वन्यजीव संरक्षण ट्रस्टचे विराज फरांदे व ट्रस्टचे सर्व सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नदी ही केवळ पाण्याचा स्रोत नसून ती आपल्या शहराचा इतिहास, संस्कृती आणि जीवनवाहिनी आहे. तिचे संवर्धन ही प्रत्येक बारामतीकराची सामूहिक जबाबदारी आहे, हा महत्त्वपूर्ण संदेश या उपक्रमातून देण्यात आला. भक्ती, परंपरा, इतिहास आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम घडवणारा हा आगळावेगळा उपक्रम बारामतीकरांसाठी एक वेगळा अनुभव ठरला.

पुण्यात Taekwondo चा ‘सुवर्ण’ झंझावात; इंटरनॅशनल तायक्वांदोत भारताने राखले वर्चस्व

Girish Mahajan: सांगली-साताऱ्याचे पाणी मुंबईला देणार नाही! कोयना प्रकल्पावर गिरीश महाजनांचे मोठे विधान, कोयना पाणी योजनेवरून राजकीय चर्चा

पुण्यातील हल्ला प्रकरणावर पालकमंत्री सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'गंभीर...'

AI in Polytechnic: तंत्रशिक्षण मंडळाचे विद्यार्थ्यांसाठी मोठे पाऊल! अभ्यासक्रमात केले 'हे' नवीन बदल

Honda Alpha electric SUV: होंडा अल्फा इलेक्ट्रिक SUV च्या डिझाइनचा खुलासा; 2 डिसेंबरला होणार जागतिक पदार्पण!