कोल्हापुरात मद्यधुंद कारचालकाने दोघा भावांना चिरडले; गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाला अटक  Kolhapur Drink and Drive Accident, Padmasinh Ranjitsinh Patil Arrested Kolhapur,
महाराष्ट्र

Kolhapur Drink and Drive: कोल्हापुरात मद्यधुंद कारचालकाने दोघा भावांना चिरडले; गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाला अटक

राजारामपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 नोव्हेंबरच्या रात्री सुमारे 11:45 वाजण्याच्या सुमारास उमेश पाथरूट आणि गणेश पाथरूट हे सख्खे चुलत भाऊ शिवाजी विद्यापीठ परिसरात जेवणासाठी गेले होते.

anuradha sagar
  • कोल्हापुरात मद्यधुंद कारचालकाने दोघांना उडवले

  • दोन सख्ख्या चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू

  • रणजितसिंह पाटील यांचा मुलगा पद्मसिंह पाटीलला अटक

Kolhapur Drink and Drive: कोल्हापुरात ड्रंक अँड ड्राईव्हचा प्रकार उघडकीस आला आहे. शिवाजी विद्यापीठ ते शाहु टोला नाका रस्त्यावर मध्यरात्री मद्यधुंद अवस्थेत बेभान वेगाने कार चालवत दोन दुचाकीस्वारांना उडवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या भीषण अपघातात दोन सख्ख्ये चुलत भाऊ उमेश विलास पाथरूट (वय 32) आणि गणेश सुनील पाथरूट (वय 34) यांचा अतिरक्तस्त्रावाने मृत्यू झाला. उमेश आणि गणेश यांच्या मृत्यूमुळे पाथरुट कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी 'गोकुळ' दुध संघाचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील यांचा मुलगा पद्मसिंह पाटील (वय 36) याला अटक केली आहे.

NCP Sharad Pawar : रोहित पवारांच्या नागपूर मोर्चाला शरद पवार गटाचा ब्रेक? पक्षातील पदाधिकाऱ्यांना थेट सूचना!

मध्यरात्री घडला ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार

राजारामपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 नोव्हेंबरच्या रात्री सुमारे 11:45 वाजण्याच्या सुमारास उमेश पाथरूट आणि गणेश पाथरूट हे सख्खे चुलत भाऊ शिवाजी विद्यापीठ परिसरात जेवणासाठी गेले होते. जेवण करुन परतत असताना कारचालक पद्मसिंह रणजितसिंह पाटील आपली विनफास्ट कंपनीची इलेक्ट्रिक कार घेऊन शाहू टोलनाक्याच्या दिशेने बेभान वेगाने जात होता.

कार चालवताना पद्मसिंह पाटील मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्याच्या भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दोन्ही तरुण सुमारे 15 फूट हवेत फेकले गेले आणि जमिनीवर कोसळले. पण त्याचवेळी कारचालक मात्र घटनास्थळावरुन फरार झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि राजारामपुरी पोलिसांनी जखमींना सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. अतिरक्तस्त्रावामुळे दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

IND Vs UAE: आता इज्जतीचा सवाल! सेमीफायनलसाठी भारताला विजय गरजेचाच; UAE विरुद्ध कधी भिडणार?

अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेले उमेश आणि गणेश हे दोघेही दगडी मूर्ती घडवण्याचा पारंपरिक व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत कष्टाने संसाराचा गाडा ओढणाऱ्या या दोन्ही कर्त्या पुरुषांचा अचानक मृत्यू झाल्याने पाथरूट कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोघांच्याही पश्चात लहान मुले आणि वृद्ध आई-वडील असा परिवार आहे. घरातील दोन्ही कमावत्या व्यक्ती गमावल्याने कुटुंबाचा आधारच हरपला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे कोल्हापूर शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

संशयित आरोपी पद्मसिंह पाटील पोलिसांच्या ताब्यात

या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी पद्मसिंह पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले आहे. वैद्यकीय तपासणीच्या प्राथमिक अहवालानुसार, त्याने मद्यप्राशन केल्याचे नमूद करण्यात आले आहे. राजारामपुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष डोके आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. संशयित आरोपीला न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कोल्हापुरातील या भीषण अपघातात कोणाचा मृत्यू झाला आहे?

कोल्हापुरातील या भीषण अपघातात कोणाचा मृत्यू झाला आहे?

या अपघात प्रकरणी पोलिसांनी कोणाला अटक केली आहे?

राजारामपुरी पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेत कार चालवून अपघात घडवणाऱ्या पद्मसिंह रणजितसिंह पाटील (वय ३६, 'गोकुळ' दूध संघाचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील यांचा मुलगा) याला अटक केली आहे.

हा अपघात नेमका कधी आणि कसा घडला?

२२ नोव्हेंबरच्या रात्री ११:४५ वाजण्याच्या सुमारास पाथरूट बंधू शिवाजी विद्यापीठ परिसरातून जेवण करून परतत असताना, शाहू टोलनाक्याच्या दिशेने बेभान वेगाने येणाऱ्या मद्यधुंद इलेक्ट्रिक कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

Mumbai News: भारतावर अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळाचे संकट! महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थितीची चिन्हे

मिनी महाबळेश्वर गारठलं! तापमान थेट एकेरी अंकात; पर्यटकांचा ओढा वाढला

जुन्या कॅसेटला मिळाली नवी ओळख! 44 वर्षांपूर्वी फ्लॉप झालेलं गाणं GTA 6 मुळे पुन्हा ट्रेंडमध्ये

Bajra Soup: थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात करा बाजरीच्या सूपचा समावेश, पित्ताच्या त्रासापासून मिळेल सुटका

भाजप आमदाराच्या ताफ्यातील वाहनांना भरधाव स्कॉर्पिओची धडक; गाडी झाली पलटी