Latur DCC Bank 
लातूर

लातूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी धीरज देशमुख यांची बिनविरोध निवड; अविनाश जाधव उपाध्यक्षपदी

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांची बुधवारी (दि. २५ नोव्हेंबर) सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी अविनाश बाळासाहेब जाधव यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.

Dnyaneshwar more
  • धीरज देशमुख सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी

  • अविनाश जाधव यांची उपाध्यक्षपदी निवड

  • दोन्ही निवडी बिनविरोध जाहीर

लातूर : लातूर जिल्ह्याच्या सहकार आणि राजकारणाचे सत्ताकेंद्र मानल्या जाणाऱ्या 'दि लातूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड' अर्थात लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांची बुधवारी (दि. २५ नोव्हेंबर) सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी अविनाश बाळासाहेब जाधव यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत धिरज देशमुख यांच्या नेतृत्वाखालील 'सहकार पॅनल' ने विरोधकांच्या 'परिवर्तन पॅनल'चा पराभव करून बहुमत मिळविले होते. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी बुधवारी विशेष सभा घेण्यात आली. या वेळी अध्यक्षपदासाठी धिरज देशमुख, तर उपाध्यक्षपदासाठी अविनाश जाधव यांच्याशिवाय अन्य कोणाचाही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर केली.

निवड जाहीर होताच बँक परिसरात सहकार पॅनलच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी फटाके फोडून, गुलालाची उधळण करत जल्लोष केला. डिसेंबर २०२१ मध्ये धिरज देशमुख यांची प्रथमच बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती. त्यावेळी महाराष्ट्रातील सर्वांत तरुण जिल्हा बँक अध्यक्ष म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता. गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी बँकेचा कारभार पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख ठेवण्यावर भर दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागातील ग्राहकांना आधुनिक बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच शेतकऱ्यांना पीकविमा परताव्याचे वेळेत वितरण, ज्येष्ठ नागरिक व लाभार्थ्यांचे निवृत्तिवेतन थेट खात्यात जमा करणे, ग्रामीण भागात २४ तास एटीएम सुविधा आणि 'मोबाईल एटीएम व्हॅन' अर्थात फिरती बँक शाखा सुरू करण्यात आली. दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर धीरज देशमुख यांनी संचालक मंडळ, मतदार आणि लातूर जिल्ह्यातील जनतेचे आभार मानले. सहकार क्षेत्र हे शेतकऱ्यांच्या प्रगतीचा कणा असून आगामी काळात सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी आणि तरुण उद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून बँकेच्या माध्यमातून नवनवीन योजना राबविण्यात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर यावेळी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, चेअरमन धिरज देशमुख, व्हा. चेअरमन अविनाश जाधव, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभय सांळुखे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचे अभिनंदन केले. "सहकार क्षेत्र हे केवळ आर्थिक व्यवहारांचे केंद्र नसून शेतकऱ्यांच्या विश्वासाचे प्रतीक आहे. स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी लावलेले हे सहकाराचे रोपटे आज वटवृक्ष झाले आहे. धिरज आणि अविनाश यांच्या रूपाने तरुण व अभ्यासू नेतृत्व बँकेला मिळाले आहे. सर्व संचालकांनी एकजुटीने काम करत शेतकरी आणि सभासदांच्या हिताला नेहमीच प्राधान्य द्यावे आणि बँकेची ही गौरवशाली परंपरा पुढे न्यावी."

- दिलीपराव देशमुख, माजी सहकार मंत्री.

या निवडीबद्दल आणि सहकार पॅनलच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत सहकार मंत्री बाबा पाटील यांनी हा विजय सहकार क्षेत्राला बळ देणारा आहे, असे सांगितले. लातुरच्या सहकार क्षेत्रात आम्ही अनेक वर्षांपासून एकत्रितपणे काम करत आहोत. सर्वसामान्य शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन आम्ही हा निर्णय घेतला आणि मतदारांनी आमच्यावर पुन्हा विश्वास दाखवला. आगामी काळात राज्याच्या नवीन सहकार धोरणाच्या माध्यमातून तरुणांना संधी देत लातूर जिल्हा बँकेचा कारभार अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.

- बाबासाहेब पाटील, सहकार मंत्री.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली?

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली?

बँकेच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड झाली?

अविनाश बाळासाहेब जाधव यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.

सहकार पॅनलने संचालक मंडळाच्या निवडणुकीत कोणाचा पराभव केला?

धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलने विरोधकांच्या परिवर्तन पॅनलचा पराभव करून बहुमत मिळवले.

'बाबा ऐकत नाहीत…', शरद पवारांना अॅडमिट केल्यानंतर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

Viral Money Saving Trick: नोट खिशात ठेवण्याची 'ही' ट्रिक पाहिलीय का? पैसे पडणारच नाहीत, VIDEO व्हायरल

Raigad News: ४७ गावं, ३३ आदिवासी वाड्या तहानलेल्या! उमटे धरणाच्या गाळमुक्तीसाठी संघर्ष ग्रुप आक्रमक, १३ कंपन्यांना दिले निवेदन

Supriya Sule CM News : सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार? राऊत म्हणाले, त्यांच्या शपथविधीला मी जाणार! राज्यात पुन्हा होणार राजकीय भूकंप?

Baba Aparajith Retirement: CSK च्या 'या' खेळाडूचा क्रिकेटला रामराम; IPL 2027 ऑक्शनपूर्वी घेतला मोठा निर्णय