pune nagpur hording war फोटो सौजन्य सोशल मीडिया
नागपूर

Nagpur News : पुणेरी बाकरवडीचा नागपुरी फ्लेक्सला ठसका; मजेशीर जुगलबंदी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कौतुकानंतर पुणे आणि नागपूर महापालिकांमध्ये सोशल मीडियावर मिश्किल संवाद रंगला. बाकरवडी आणि स्वागताच्या फ्लेक्सचा संदर्भ देत दोन्ही प्रशासनांनी अवैध बॅनरबाजीविरोधात अनोख्या पद्धतीने संदेश दिला.

Chaitanya Pisal
  • मुख्यमंत्र्यांच्या कौतुकानंतर पुणे मनपाचा नागपूरला टोला

  • बाकरवडी आणू, पण स्वागतासाठी फ्लेक्स नको

  • नागपूर मनपाचे निमंत्रण; सोशल मीडियावर संवादाची चर्चा

Nagpur News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवैध होर्डिंग्ज आणि अतिक्रमणांविरोधातील कारवाईवरून पुणे महानगरपालिकेचे कौतुक केले. त्याचवेळी नागपूर प्रशासनालाही सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. यानंतर पुणे आणि नागपूर महानगरपालिकांमध्ये सोशल मीडियावर चांगलीच मिश्किल जुगलबंदी रंगली आहे. बॅनरबाजीला विरोध करताना दोन्ही महापालिकांनी विनोदाच्या माध्यमातून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या कौतुकानंतर पुणे मनपाचा नागपूरला टोला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महापालिकेच्या अवैध होर्डिंग्जविरोधातील मोहिमेचे कौतुक केले. तसेच नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला अशा प्रकारच्या अनधिकृत बॅनरबाजीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले.

यावर पुणे महापालिकेने सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना, मुख्यमंत्र्यांच्या कौतुकानंतर अभिनंदनाचा बॅनर लावण्याचा मोह झाला होता; मात्र स्वतःवर नियंत्रण ठेवल्याचे मिश्किलपणे सांगितले. नागपूर महापालिकेलाही अधिवेशनासाठी शुभेच्छा दिल्या.


बाकरवडी आणू, पण स्वागतासाठी फ्लेक्स नको

पुणे महापालिकेने नागपूरच्या निमंत्रणाला उत्तर देताना आणखी एक मजेशीर पोस्ट केली. 'पुणेकर पाहुणे कुठेही गेले की दोन गोष्टी सोबत आणतात, बाकरवडी आणि सूचना!' असे म्हणत स्वागतासाठी कोणताही फ्लेक्स लावू नका, अशी सूचना दिली. बाकरवडी मात्र नक्की आणू, असा पुणेरी टोला लगावला. या पोस्टमुळे सोशल मीडियावर हास्याची लाट पसरली.

नागपूर मनपाचे निमंत्रण; सोशल मीडियावर संवादाची चर्चा


पुणे महापालिकेच्या पोस्टला नागपूर महानगरपालिकेनेही तितक्याच खेळकर शैलीत उत्तर दिले. तुम्ही फ्लेक्स लावण्याचा मोह आवरला, हे चांगले झाले. मात्र, ७ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनाच्या प्रारंभी नागपुरात नक्की या. नागपूरकर तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत, असे निमंत्रण देण्यात आले.

सामान्यतः सरकारी यंत्रणांच्या सोशल मीडिया पोस्ट औपचारिक असतात. मात्र, पुणे आणि नागपूर महापालिकांनी विनोदाची जोड देत गंभीर विषयावर जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. या अनोख्या जुगलबंदीचे सोशल मीडियावर कौतुक होत असून, अवैध बॅनर आणि फ्लेक्सबाजीला आळा घालण्याचा संदेशही यातून दिला जात आहे.

Tech News: यार की शादी है? लग्नसराईत नवदाम्पत्यांसाठी खास बजेट Tech Gadgets

Drought Students Relief: दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! ५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ

Delimitation Bill: डिलिमिटेशन म्हणजे नेमकं काय? लोकसभा-विधानसभेच्या जागा कशा वाढणार, कोणत्या राज्याला किती फायदा होणार?

Ayushmann Khurrana: मुलाच्या अभिनयाने आई भारावली! ‘ये प्रेम मोल लिया’ पाहून आयुष्मान खुरानाच्या आईची भावुक प्रतिक्रिया

Amravati News: रब्बी हंगामात मका पिकाला शेतकऱ्यांची पसंती! पाणी, खर्चाच्या गणिताने बदलली पीक निवड