गोदाघाटची पुरातत्व विभागाच्या पथकाकडून पाहणी
पुरातन शिवलिंग, नंदी आणि लहान मंदिर सापडल्याने केली पाहणी
मूळ नकाशा आणि एका जुन्या छायाचित्रानुसार झाले स्पष्ट
Nashik News : नाशिक : रामकाल पथ प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या विकासकामांदरम्यान गोदाघाटावर आढळलेल्या पुरातन शिवलिंग, नंदी आणि लहान मंदिराची शनिवारी (दि. २८) सकाळी केंद्रीय पुरातत्व विभागाच्या पथकाने पाहणी केली. छत्रपती संभाजीनगर सर्कलचे अधीक्षक पुरातत्त्वज्ञ अरुण मलिक यांनी सकाळी ९:१५ वाजता पथकासह या परिसराची पाहणी केली.
यावेळी या परिसराचे ऐतिहासिक महत्त्व सिद्ध करणारे ठोस पुरावे पथकासमोर मांडण्यात आले. १९१७ मधील सिटी सर्व्हे कार्यालयाचा मूळ नकाशा आणि एका जुन्या छायाचित्रानुसार या जागेलगतच आणखी ५ पुरातन मंदिरे असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. याच पाच मंदिरांच्या समूहावरून गोदावरी नदीपात्रातील १७ पुरातन कुंडांपैकी एका कुंडाला 'पाच देऊळ कुंड (सूर्य कुंड) अस नाव मिळाले आहे. अशा स्वरूपाची ऐतिहासिक नोंद सन १८८३ च्या 'बॉम्बे प्रेसिडेन्सी नाशिक गॅझेटियर' मध्येही आढळते. नाशिकचा हा अनमोल सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा लक्षात घेता, या सर्व पुरातन वास्तू व मंदिरांचे शास्त्रोक्त पद्धतीने जतन आणि संवर्धन करण्यात यावे, तसेच रामकुंड येथील अरुणा नदीचे गौमुख व महर्षी गौतम ऋषीच्या मूर्तीचे संवर्धन तातडीने व्हावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
वास्तू संवर्धनाची मागणी
यावर अरुण मलिक यांनी हे सर्व विषय राज्य पुरातत्व विभाग, नाशिक यांच्याकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती दिली असून, या सर्व पुरातन वास्तूंचे जतन आणि संवर्धन कैले जावे, असे सांगितले. या पाहणीप्रसंगी गोदाप्रेमी सेवा समितीचे अध्यक्ष देवांग जानी, पुरोहित संघाचे सतीश शुक्ल, प्रतीक शुक्ल, विराग गुप्ता यांच्यासह केंद्रीय पुरातत्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
गोदाघाटावर नेमकं काय सापडलं? पुरातन मंदिराचे अवशेष मिळताच खोदकाम थांबवले
रामकुंड परिसरातील पुरातन अवशेषांबाबत नाशिकच्या गोदाप्रेमी सेवा समिती अध्यक्ष देवांग जानी म्हणाले, "रामकुंड परिसरातील पर्यावरणपूरक कार्याला कोणाचाही विरोध असण्याचे कारण नाही, पण नाशिकच्या पुरातन सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करणे, हे नाशिककर या नात्याने आपले प्रथम कर्तव्य आहे."
'रोहित पवारांना PAने वैगरे कुणीतरी हे पत्र लिहून दिलं असेल...', अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया
कुंभमेळ्यानिमित्त गोदाघाटावर सुरू असलेल्या रामकाल पथ प्रकल्पांतर्गत दुतोंड्या मारूती मंदिराच्या मागील बाजुस सुरू असलेल्या खोदकामात पुरातन शिवलिंग, नंदी व मंदिराचे अवशेष सापडल्याच्या घटनेची पुरातत्व खात्याने गंभीर दखल घेतली होती. तसेच याबाबत महापालिकेला पत्र लिहित खोदकाम थांबवण्याची सूचना केली होती. खोदकाम सुरू असताना भुयारी मार्ग दिसला व आत डोकावून काही भाविकांनी पाहिले असता तेथे शिवलिंग, नंदी व मंदिराचे काही अवशेष आढळून आले होते. यानंतर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
नाशिकच्या गोदाघाटावर खोदकामादरम्यान काय आढळले?
रामकाल पथ प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या खोदकामादरम्यान पुरातन शिवलिंग, नंदी आणि लहान मंदिराचे अवशेष आढळले. याशिवाय परिसरात भुयारी मार्गही दिसून आला.
गोदाघाटावरील पुरातन अवशेषांची पाहणी कोणी केली?
केंद्रीय पुरातत्व विभागाच्या छत्रपती संभाजीनगर सर्कलचे अधीक्षक पुरातत्त्वज्ञ अरुण मलिक यांनी पथकासह या परिसराची पाहणी केली.
गोदाघाटावरील पुरातन वास्तूंबाबत कोणती मागणी करण्यात आली आहे?
गोदाघाट परिसरातील सर्व पुरातन वास्तू आणि मंदिरांचे शास्त्रोक्त पद्धतीने जतन व संवर्धन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रामकुंड येथील अरुणा नदीचे गौमुख आणि महर्षी गौतम ऋषी यांच्या मूर्तीचेही तातडीने संवर्धन करण्याची मागणी करण्यात आली आहे.