मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कडक इशारा (photo Credit- X) 
महाराष्ट्र

Devendra Fadnavis: "देशात लॉकडाऊन नाही, अफवा पसरवल्यास होणार जेल"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कडक इशारा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, देशात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून लॉकडाऊन लागण्याची कोणतीही शक्यता नाही. केंद्र सरकारने अशा सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत.

नितिन कुऱ्हे
  • "देशात लॉकडाऊन नाही, अफवा पसरवल्यास होणार जेल"
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कडक इशारा
  • जाणून घ्या काय म्हणाले...

Devendra Fadnavis on Lockdown: देशात इंधनाचा तुटवडा असून लवकरच कोरोनाप्रमाणे 'लॉकडाऊन' (Lockdown) लागणार, अशा आशयाचे मेसेज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या अफवांमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली असून अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अत्यंत कडक शब्दांत स्पष्टीकरण देत अफवा पसरवणाऱ्यांना गंभीर इशारा दिला आहे.

"फेक मेसेज फॉरवर्ड करणेही आता ठरेल गुन्हा"

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, देशात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून लॉकडाऊन लागण्याची कोणतीही शक्यता नाही. केंद्र सरकारने अशा सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत. "देशात कोणताही लॉकडाऊन लागणार नाही हे केंद्र सरकारने आधीच जाहीर केले आहे. जे कोणी जाणीवपूर्वक अशा अफवा पसरवतील, त्यांच्यावर कठोर फौजदारी कारवाई केली जाईल," असे त्यांनी नमूद केले. केवळ अफवा तयार करणेच नाही, तर प्राप्त झालेला फेक मेसेज फॉरवर्ड करणेही आता गुन्हा ठरेल, असे मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितले आहे.

उत्पादन शुल्कात 10 रुपयांची कपात

जागतिक संकट काळात इंधन दरवाढीचा भार सर्वसामान्यांवर पडू नये, यासाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) १० रुपयांची घट केली आहे. पेट्रोल उत्पादन शुल्क 13 रुपयांवरून आता केवळ ३ रुपयांवर आणले आहे. तर डिझेलवरील उत्पादन शुल्क १० रुपयांवरून थेट शून्यावर आणले आहे. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींचा वाढीव भार आता तेल कंपन्या सोसणार असून, सामान्य ग्राहकांना अधिक दराने इंधन खरेदी करावे लागणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

पुढील एक महिना पुरेल इतका साठा सुरक्षित

"भारताच्या शेजारील देशांमध्ये बिकट परिस्थिती असली, तरी भारतात इंधन आणि घरगुती गॅसची कोणतीही कमतरता नाही. आपल्याकडे किमान एक महिना पुरेल इतका पेट्रोल-डिझेलचा साठा पूर्णपणे सुरक्षित आहे," असे फडणवीस म्हणाले. त्यामुळे अफवांच्या आधारावर नागरिकांनी पंपांवर गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचे जनतेला आवाहन

या प्रकरणावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "देशात लॉकडाऊन लावण्याचा सरकारचा कोणताही इरादा नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. युद्धासारख्या कठीण काळात संयम बाळगणे महत्त्वाचे असून खोट्या बातम्या पसरवणे हे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी धोक्याचे ठरेल," अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

Mumbai News: भारतावर अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळाचे संकट! महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थितीची चिन्हे

मिनी महाबळेश्वर गारठलं! तापमान थेट एकेरी अंकात; पर्यटकांचा ओढा वाढला

Kolhapur Drink and Drive: कोल्हापुरात मद्यधुंद कारचालकाने दोघा भावांना चिरडले; गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाला अटक

जुन्या कॅसेटला मिळाली नवी ओळख! 44 वर्षांपूर्वी फ्लॉप झालेलं गाणं GTA 6 मुळे पुन्हा ट्रेंडमध्ये

Bajra Soup: थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात करा बाजरीच्या सूपचा समावेश, पित्ताच्या त्रासापासून मिळेल सुटका