जुन्नर तालुक्यात बिबट्याचा भरदिवसा हल्ला; एका महिलेचा मृत्यू तर दुसरी जखमी जुन्नर तालुक्यात बिबट्याचा भरदिवसा हल्ला; एका महिलेचा मृत्यू तर दुसरी जखमी
पुणे

जुन्नर तालुक्यात बिबट्याचा भरदिवसा हल्ला; एका महिलेचा मृत्यू तर दुसरी जखमी

दिवसाढवळ्या बिबट्याने महिलेवर हल्ला केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून महिला, शेतकरी आणि शेतमजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Krupadan Awale

- जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा येथील भोईरवाडी परिसरात बिबट्याचा भरदिवसा हल्ला.

- गुरुवारी (दि. २६) दुपारी एकच्या सुमारास शेतात काम करणाऱ्या सासू-सुनेवर हल्ला.

- भिमाबाई जिजाबा भोईर (वय ५५) यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू.

नारायणगाव : शेतात काम करणाऱ्या महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात सासू मृत्यूमुखी पडली तर तिची सून जखमी झाली आहे. ही घटना जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा येथे गुरुवारी (दि.26) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या वाढत्या दहशतीने पुन्हा एकदा शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पिंपळगाव जोगा येथील भोईरवाडी परिसरात दिवसा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात भिमाबाई जिजाबा भोईर (वय ५५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दिवसाढवळ्या बिबट्याने महिलेवर हल्ला केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून महिला, शेतकरी आणि शेतमजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जुन्नर तालुक्यात बिबट्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांना शेतात काम करणेही धोकादायक ठरत आहे.

दरम्यान, वनविभागाने या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दिवसा बिबट्यांचे हल्ले होत असतील तर ग्रामीण भागातील नागरिकांनी सुरक्षिततेसाठी नेमके कुणाकडे पाहायचे? असा संतप्त सवाल या घटनेनंतर उपस्थित होत आहे. घटनास्थळी उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस, अमृत शिंदे, वनक्षेत्रपाल चैतन्य कांबळे, प्रदीप चव्हाण वन कर्मचारी व बिबट रेस्क्यू टीम सदस्यांनी भेट दिली.

बिबट्याचा वाढला वावर

जुन्नर तालुक्यात बिबट्यांचा वावर गेल्या काही काळापासून वाढला आहे. शेताच्या परिसरात तसेच मानवी वस्तीजवळ बिबट्यांचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थांमध्ये आधीपासूनच भीतीचे वातावरण आहे. मात्र, आता भरदिवसा शेतात काम करणाऱ्या महिलेवर हल्ला झाल्याने शेतकरी, महिला आणि शेतमजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे.

वन विभागाने परिसरात वाढवावी गस्त

जुन्नर तालुक्यात बिबट्यांचा वाढता वावर लक्षात घेता वन विभागाने परिसरात गस्त वाढविणे, बिबट्याचा माग काढणे आणि नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या हल्ल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

FAQ

हल्ल्यात आणखी कोण जखमी?
भिमाबाई भोईर यांची सून बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाली.

हल्ला दिवसाच्या कोणत्या वेळी झाला?
दिवसा, दुपारी एकच्या सुमारास हा हल्ला झाला.

घटनेनंतर परिसरातील परिस्थिती काय?
बिबट्याच्या भरदिवसा हल्ल्यामुळे ग्रामस्थ, शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Supriya Sule CM News : सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार? राऊत म्हणाले, त्यांच्या शपथविधीला मी जाणार! राज्यात पुन्हा होणार राजकीय भूकंप?

Baba Aparajith Retirement: CSK च्या 'या' खेळाडूचा क्रिकेटला रामराम; IPL 2027 ऑक्शनपूर्वी घेतला मोठा निर्णय

शत्रूसोबत पण असं घडायला नको! क्रीजपासून लांब राहून देखील फलंदाज OUT! विचित्र घटनेचा Video Viral

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस फेसलिफ्ट भारतात लाँच! किंमत 19.59 लाखांपासून, E85 फ्युलवरही धावणार

कार वळवण्याच्या वादातून तरुणाचा खून; आठ दोषींना न्यायालयाने सुनावली 'ही' मोठी शिक्षा