Samruddhi Expressway Mehkar Bus Accident Samruddhi Expressway Mehkar Bus Accident
महाराष्ट्र

Samruddhi Expressway Accident: समृद्धी महामार्गावर काळाचा घाला! ओव्हरटेकच्या नादात ट्रॅव्हल्स दुभाजकावर आदळली; एकाचा मृत्यू, ४ जखमी

Samruddhi Expressway Mehkar Bus Accident: नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसचा समृद्धी महामार्गावरील शिवणी पिसे परिसरात ओव्हरटेकच्या प्रयत्नात भीषण अपघात झाला.

Priyanka Mundinkeri
  • वेगाचा थरार ठरला जीवघेणा

  • समृद्धीवर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात

  • ट्रॅव्हल्सची दुभाजकाला धडक, एकाचा जागीच मृत्यू

मेहकर: नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात होऊन एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. बुधवारच्या मध्यरात्री मुंबई कॉरिडॉरवरील शिवणी पिसे परिसरात ही दुर्घटना घडली. ओव्हरटेक करून पुढे जाण्याच्या प्रयत्नात बसने समोरील वाहनाला धडक दिली. त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस लोखंडी दुभाजकावर आदळली. या अपघातामुळे महामार्गावरील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.

माहितीनुसार, एमएच ०९ / जीजे ७३१५ क्रमांकाची ट्रॅव्हल्स बस नागपूरहून मुंबईच्या दिशेने जात होती. दरम्यान, शिवणी पिसे परिसरात चालकाने समोरील वाहनाला ओव्हरटेक करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी बसची समोरील वाहनाला जोरदार धडक बसली. धडकेनंतर बस अनियंत्रित होऊन महामार्गावरील लोखंडी दुभाजकावर जाऊन आदळली.

या भीषण धडकेत बसमधील प्रवाशांना जबर मार लागला. या अपघातात गौरव शरदचंद्र पांडे (२९, रा. तुमसर, जि. भंडारा) यांचा जागीच मृत्यू झाला. धडकेच्या तीव्रतेमुळे ते बसच्या डाव्या बाजूने बाहेर फेकले गेले. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने तुमसर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अपघातांचा प्रश्न पुन्हा आला ऐरणीवर

अपघातानंतर बसमधील इतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. महामार्ग पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत उर्वरित प्रवाशांना मेहकरजवळील फरदापूर टोल नाक्यावर सुरक्षितपणे पोहोचविण्याची व्यवस्था केली. त्यामुळे प्रवाशांना पुढील प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली. समृद्धी महामार्गावर वेग आणि ओव्हरटेकच्या प्रयत्नांमुळे होणाऱ्या अपघातांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एका प्रवाशाचा मृत्यू आणि चारजण जखमी झाल्याने या दुर्घटनेचे गांभीर्य वाढले.

४ प्रवासी जखमी; ग्रामीण रुग्णालयात उपचार

अपघातात ओमप्रकाश यादव (५८, रा. नागपूर), इब्राहिम अहमद खान (३६, रा. नवी मुंबई), शशिका रामदास कावलकर (३६, रा. नागपूर) आणि मीनाक्षी राजगुरू (६२, रा. नागपूर) है चार प्रवासी जखमी झाले, अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी जखमी प्रवाशांना मदतकार्य करीत उपचारासाठी मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले.

Terracotta Jewellery: टेराकोटा ज्वेलरीचा वाढतोय ट्रेंड, मातीच्या दागिन्यांनी महिलांना घातली भुरळ!

Eknath Shinde : गडकोटांचे पावित्र्य जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी; शिवरायांकडून तरुणांनी प्रेरणा घ्यावी, एकनाथ शिंदे यांचे आवाहन

गोदाघाटावर नेमकं काय सापडलं? पुरातन मंदिराचे अवशेष मिळताच खोदकाम थांबवले

Avada Group Maharashtra: शेतात सौरऊर्जेचा प्रकाश, तरुणांसाठी रोजगाराची संधी! ‘कोण होणार करोडपती’मध्ये उलगडला आवाडाचा प्रवास

Wipro च्या कॅम्पसबाहेर उमेदवारांची प्रचंड रांग! हैदराबादच्या व्हायरल व्हिडिओने मांडले आयटी क्षेत्रातील वास्तव