Dombivli News: डोंबिवलीच्या रस्त्यांवर धावपटूंचा जल्लोष! फ्रेंडशिप रनमध्ये हजारो नागरिकांचा सहभाग, तिसरे पर्व उत्साहात संपन्न  
ठाणे

Dombivli News: डोंबिवलीच्या रस्त्यांवर धावपटूंचा जल्लोष! फ्रेंडशिप रनमध्ये हजारो नागरिकांचा सहभाग, तिसरे पर्व उत्साहात संपन्न

डोंबिवलीच्या रस्त्यांवर पहाटेपासूनच धावपटूंचा उत्साह पाहायला मिळाला. आयोजित करण्यात आलेल्या ‘डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन २०२६’ स्पर्धेत लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला होता.

हर्षदा जाधव
  • ‘डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन २०२६’ चे तिसरे पर्व उत्साहान संपन्न

  • तब्बल ८ हजार स्पर्धकांनी ‘डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन २०२६’ मध्ये सहभाग नोंदवला

  • क्रीडा सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सामान्य डोंबिवलीकरांनीही पहाटेपासूनच रस्त्यांच्या दुतर्फा मोठी गर्दी केली

डोंबिवली: डोंबिवलीच्या क्रीडाप्रेमी संस्कृतीचा आणि शहराच्या एकजुटीचा भव्य उत्सव असलेल्या ‘डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन २०२६’ चे तिसरे पर्व रविवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी अत्यंत उत्साहात पार पडले. डोंबिवली जिमखाना येथून पहाटे सुरू झालेल्या या उपक्रमात तब्बल ८ हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवत डोंबिवलीकरांचा क्रीडा उत्साह पुन्हा एकदा सिद्ध केला.

कल्याण-डोंबिवली रनर्स, ‘डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार’ आणि आमदार व भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ६,५०० धावपटूंनी पूर्वनोंदणी केली होती, तर १,५०० जणांनी उत्स्फूर्तपणे 'ऑन-स्पॉट' नोंदणी करून या रनिंग उत्सवात सहभाग घेतला. विशेष म्हणजे, आमदार रविंद्र चव्हाण यांनी स्वतः या रनमध्ये धावून स्पर्धकांचा उत्साह द्विगुणित केला. तसेच या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी सामान्य डोंबिवलीकरांनी देखील गर्दी केली होती.

लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा सहभाग

या स्पर्धेत महिला, पुरुष, युवक-युवती आणि लहान मुलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. स्पर्धेत तब्बल ८ हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. तसेच, धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि या क्रीडा सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सामान्य डोंबिवलीकरांनीही पहाटेपासूनच रस्त्यांच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती.

स्पर्धेचे वेळापत्रक आणि गट:

डोंबिवली जिमखाना येथून विविध गटांसाठी खालीलप्रमाणे धावण्याची सुरुवात झाली:

  • २१ किमी (हाफ मॅरेथॉन): पहाटे ५:०० वाजता

  • १० किमी रन: सकाळी ६:१५ वाजता

  • ५ किमी फन रन: सकाळी ७:१५ वाजता

मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण

स्पर्धेनंतर सकाळी ९:०० वाजता मान्यवरांच्या हस्ते शानदार बक्षीस वितरण समारंभ पार पडला. याप्रसंगी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिनव गोयल, पोलीस उपायुक्त (डीसीपी) अतुल झेंडे, भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, नगरसेवक शशिकांत कांबळे, विशू पेडणेकर, नंदू म्हात्रे, विनोद काळण, मोरेश्वर भोईर, मितेश पेणकर, ज्योती पाटील, पवन पाटील, प्रिया जोशी, पप्पू भोईर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देणारा आणि डोंबिवलीकरांना एकत्र आणणारा हा उपक्रम अतिशय नियोजनबद्ध आणि यशस्वीरीत्या संपन्न झाला.

Upcoming IPO Next Week : गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! 6 कंपन्यांचे इश्यू येणार; कोणता IPO देणार बंपर रिटर्न?

Donald Trump : ट्रम्प यांचा मोठा निर्णय! अमेरिकेतील 3 लाख कायदेशीर स्थलांतरितांचा आरोग्य विमा बंद होणार; 2027 पासून नियम लागू

Western Railway Coaching Depot: रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! दादरमधून नव्या एक्स्प्रेस गाड्यांचा मार्ग मोकळा

Anupam Kher : महिला आरक्षण विधेयकावर अनुपम खेर यांचे स्पष्ट मत! मदुराईतील दीपप्रज्वलनावरही व्यक्त केला आनंद

Aundh ITI Crisis: इमारत कोसळल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का? औंध आयटीआयच्या दुरवस्थेवर विद्यार्थ्यांचा संताप