मटारची आवक वाढली, अन्य भाज्या मात्र कडाडल्या! नवी मुंबई बाजर समितीमध्ये भाव १२० रुपये प्रति किलोवरून ५० रुपयांपर्यंत घसरला  
ठाणे

मटारची आवक वाढली, अन्य भाज्या मात्र कडाडल्या! नवी मुंबई बाजर समितीमध्ये भाव १२० रुपये प्रति किलोवरून ५० रुपयांपर्यंत घसरला

Navi Mumbai: ६ नोव्हेंबर रोजी बाजारात वाटाण्याची आवक १३० क्विंटल होती. त्यावेळी वाटाण्याचा सरासरी घाऊक भाव १२० रुपये प्रति किलो होता. त्यानंतर आवक सातत्याने वाढत गेली.

सुरुची कदम

Navi Mumbai: हिवाळ्याच्या आगमनाने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक बाजारात हिरव्या वाटाण्याची आवक वाढू लागली आहे. हिवाळ्यात वाटाण्याच्या पिकासाठी अनुकूल परिस्थितीमुळे उत्पादक भागातून नवीन वाटाणा बाजारात येत आहे. परिणामी, महिन्याच्या सुरुवातीला १२० रुपये प्रति किलो असलेला वाटाणा सोमवारी (२३ नोव्हेंबर) ५० रुपयांपर्यंत घसरला. दरम्यान, वाटाणा स्वस्त होतानाच भेंडी, फरसबी, गवार आणि गाजर यांचे भाव मात्र वाढले आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दरपत्रकानुसार, ६ नोव्हेंबर रोजी बाजारात वाटाण्याची आवक १३० क्विंटल होती. त्यावेळी वाटाण्याचा सरासरी घाऊक भाव १२० रुपये प्रति किलो होता. त्यानंतर आवक सातत्याने वाढत गेली.(फोटो सौजन्य – istock)

५८ टक्क्यांनी वाटाणा खाली:

९ नोव्हेंबर रोजी वाटाण्याची आवक १,३७९ २ क्विंटल, १४ नोव्हेंबर रोजी १,७७३ क्विंटल आणि २३ नोव्हेंबर रोजी २,५२६ क्विंटलवर पोहोचली. या वाढलेल्या आवकेमुळे वाटाण्याचा सरासरी भाव ५० रुपये प्रति किलोपर्यंत घसरला. महिन्याच्या सुरुवातीच्या तुलनेत वाटाण्याचा भाव ७० रुपये प्रति किलोने, म्हणजेच अंदाजे ५८ टक्क्यांनी घसरला.

उत्तर भारतीय राज्यांमधून होतेय प्रचंड आवक:

उत्तर भारतातील मैदानी प्रदेशात वाटाण्याची पेरणी साधारणपणे ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान केली जाते. वाणानुसार, शेंगा ६५ ते ११० दिवसांत काढणीसाठी तयार होतात. त्यामुळे नोव्हेंबरच्या अखेरीस बाजारात नवीन वाटाण्याची आवक वाढू लागते. नोव्हेंबर आणि डिसेंबर हा मध्य प्रदेशातील मुख्य कापणीचा हंगाम असतो.

काही दिवसांत बाजारात तेजी राहण्याची शक्यता:

66 वाढीव आवक चामुळे येत्या काही दिवसात त्यात काय या मध्य प्रदेशातून नवीन पिकाची आवक आणि त्यानंतर उत्तर भारतातील उत्पादक प्रदेशांमधून होणारी आवक आणि भाव हे उत्पादन, हवामान, वाहतूक आणि बाजारातील मागणी यावर अवलंबून असतील.

Vastu Tips: इतरांकडून चुकूनही उधार घेऊ नका 'या' वस्तू; घराच्या सुख शांतीवर होऊ शकतो परिणाम

Satara News: युती केली नसती तर आमचे सात संचालक निवडून आले असते; जयकुमार गोरे

गुन्हा सिद्ध न होताच 77 टक्के कैदी भोगताहेत कारावास; कैद्यांना अजूनही निकालाची प्रतीक्षाच

Numberlogy: मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मोठी बातमी ! जाणीवपूर्वक हटवली होती राजीव गांधी यांची सुरक्षा; राहुल गांधींचा गंभीर आरोप