रेसिंग स्पर्धेमुळे सीवूड्स-नेरुळमधील काही रस्ते बंद 
ठाणे

Navi Mumbai News: नवी मुंबईकरांनो, लक्ष द्या! रेसिंग स्पर्धेमुळे सीवूड्स-नेरुळमधील काही रस्ते बंद; पर्यायी मार्ग कोणते?

Navi Mumbai News: नवी मुंबईतील इंडियन रेसिंग फेस्टिव्हल आणि फॉर्म्युला ४ स्पर्धेमुळे पामबीच रोड व नेरुळ पश्चिम परिसरातील काही मार्ग ७ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.

प्राजक्ता प्रधान
  • नवी मुंबईत ४ ते ६ डिसेंबरदरम्यान इंडियन रेसिंग फेस्टिव्हल आणि फॉर्म्युला ४ इंडियन चॅम्पियनशिपचे आयोजन

  • रेसिंग ट्रॅक उभारणीसाठी २५ नोव्हेंबरपासून वाहतुकीत बदल

  • वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक विभागाने अधिसूचना जारी केली आहे

नवी मुंबईत इंडियन रेसिंग फेस्टिव्हल नाईट स्ट्रीट रेस आणि फॉर्म्युला 4 इंडियन चॅम्पियनशिपच्या आयोजनामुळे पामबीच रोड आणि नेरुळ पश्चिमेकडील अंतर्गत मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. रेसिंग ट्रॅक उभारणी आणि स्पर्धेच्या आयोजनासाठी गणपतशेठ तांडेल मैदान, सीवू परिसरातील काही मार्ग २५ नोव्हेंबरपासून ७ डिसेंबरपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. वाहतूक नियंत्रण विभागाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. सीवू वाहतूक शाखेच्या हद्दीत ४ ते ६ डिसेंबरदरम्यान 'इंडियन रेसिंग फेस्टिव्हल नवी मुंबई नाईट स्ट्रीट रेस' आणि फॉर्म्युला ४ इंडियन चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी रेसिंग ट्रॅक उभारण्याचे काम सुरू असून, आयोजकांनी स्पर्धा संपेपर्यंत काही मार्ग तात्पुरते बंद करण्याची विनंती वाहतूक विभागाकडे केली होती. सार्वजनिक सुरक्षितता, वाहतूक कोंडी टाळणे आणि नागरिकांची गैरसोय कमी करण्यासाठी वाहतूक विभागाने हा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार, गणपतशेठ तांडेल मैदान, सीबू येथून बाशीच्या दिशेने जाणारा मार्ग तसेच बेलापूरकडून गणपतशेठ तांडेल मैदान, सीयू कडे जाणारा मार्ग २५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ७ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णतः बंद राहणार आहे. पोलिस उपआयुक्त (वाहतूक) डॉ. राहुल खाडे यांनी मोटार वाहन कायद्यांतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून ही अधिसूचना जारी केली आहे.

पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

वाहतूक बंद असलेल्या मार्गरिकजी वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सीवूड्सकडून वाशीकडे जाणाऱ्या वाहनांनी अक्षर सिग्नलवा, तर नेरुळ पश्चिमेकडून वाशीकडे जाणाऱ्या वाहनांनी वजाणी स्पोर्ट्स सिग्नलवा वापर करावा. तसेच बेलापूरकडून सीवूड्सकडे जाणाऱ्या वाहनांनी अक्षर सिग्नल आणि बेलापूरकडून नेरुळ पश्चिमेकडे जाणाऱ्या वाहनांनी वज्राणी स्पोर्ट्स सिग्नल येथील पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

येरवडा जेलच्या भिंतीआतून रचला हल्ल्याचा कट?" मंदार किवळेवरील गोळीबारात १९ वर्षांच्या अर्थव मारणेचं कनेक्शन उघड!

JSW मोटर्सची खास घोषणा! डिसेंबरमधील लाँचपूर्वी 500 युनिट्सची लिमिटेड स्पेशल एडिशन सादर

Bigg Boss 20 : स्काउटने लव गिलबद्दल गुल्लूसमोर केला धक्कादायक खुलासा, बिग बॉस २० चा नवा प्रोमो चर्चेत

Share Market Today: आज कोणते शेअर्स चमकणार? टाटा ग्रुपसह या कंपन्यांच्या स्टॉक्सवर ठेवा लक्ष

राज्यातील 7 कोटी फ्लॅटना मिळणार स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड; फ्लॅटवरील बोजे, कायदेशीर अडचणींचीही होणार नोंद