File Photo : MP Supriya Sule 
महाराष्ट्र

'वाल्मिक कराडकडून शेतकऱ्यांची फसवणूक, ईडीने नोटीस बजावली पण कारवाई नाहीच'; सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल

बारामती परिसरातील शेतकऱ्यांना देखील अशाच पद्धतीने सदर व्यक्तीने गंडा घातल्याचे उघड झाले. वाल्मिक कराड हा खंडणी, अवैध संपत्ती, अवैध धंदे, अपहरण यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अपराधी आहे. ईडीनेही त्याला नोटीस पाठवून देखील

कृपादान आवळे

मुंबई : वाल्मिक कराड याने सोलापूर, बारामतीतील शेतकऱ्यांची फसवणूक केली असून, या प्रकरणाची चौकशी करून पीडितांना न्याय द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका शेतकऱ्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची वाल्मिकी कराड याने फसवणूक केल्याचे समोर आले. त्यानंतर मंगळवारी बारामती परिसरातील शेतकऱ्यांना देखील अशाच पद्धतीने सदर व्यक्तीने गंडा घातल्याचे उघड झाले. वाल्मिक कराड हा खंडणी, अवैध संपत्ती, अवैध धंदे, अपहरण यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अपराधी आहे. ईडीनेही त्याला नोटीस पाठवून देखील त्यावर कसलीही कारवाई झालेली नाही.

दरम्यान, देशमुख कुटुंबीय आणि जनतेची तीव्र भावना असूनही शासन सदर व्यक्तीला पाठिशी घालत आहे. हा संपूर्ण प्रकार संतापजनक असून, राज्य शासन सदर व्यक्तीवर अजूनही कठोर कारवाई करताना दिसत नाही. शासन आणि तपास संस्थांनी या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करावी आणि पीडितांना न्याय द्यावा, अशी मागणी सुळे यांनी केली.

बीड, परभणी प्रकरण तापतंय

राज्यामध्ये बीड हत्या प्रकरण व परभणी प्रकरणावरुन वातावरण तापले आहे. विरोधकांनी या प्रकरणावरुन सत्ताधाऱ्यांना घेतले आहे. बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. तर परभणीमध्ये सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलीस स्टेशनमध्ये मृत्यू झाला. यानंतर अनेक राजकारण्यांनी सोमनाथ सुर्यवंशी यांच्या घरी जाऊन त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले. आता शरद पवार गटाच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली आहे.

बीड प्रकरणावर खासदार सुळे म्हणाल्या...

बीड प्रकरणात जो आरोपी फरार आहे त्याला तात्काळ पकडले पाहिजे. धनंजय मुंडे यांनी माणुसकीच्या नात्याने आणि नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा. पोलिसांना वाल्मिक कराड का सापडला नाही? पोलीस काय करत होते? तो स्वत: शरण आला. वाल्मिक कराड कुठून येतो, हे पोलिसांना माहित होत नाही. हे गृह खात्याचे नाही तर सरकारचे अपयश आहे. राज्याने या सरकारला एवढे मोठे बहुमत दिले आहे, त्याचा सरकारने काहीतरी विचार करायला पाहिजे, असेही खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते.

पुणे शहर विद्रूपीकरण पुरस्कारात सत्ताधारी पक्षाचे नेते अव्वल! स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांना ‘साहेब’ किताब

World News : सौदी अरेबियाच्या रास तनुरा तेल रिफायनरीवर हौथींचा हल्ला; आगीचा दावा, चार ड्रोन पाडल्याची माहिती

Big Breaking: क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडणार! एकाच टीममध्ये पुरुष-महिला खेळणार; Zaheer khan च्या 'Equal' ची घोषणा

Pune Court Firing : 'महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे का?' हर्षवर्धन सपकाळ संतापले; फडणवीस सरकारवर गंभीर आरोप!

Sachin Tendulkar Foundation : सारा आणि सानिया तेंडुलकर यांची रांचीतील युवा शाळेला भेट; मुलींसाठी उभारणार नवी शाळा