Washim drought  
वाशिम

Washim: केंद्रीय पथकाकडून दुष्काळग्रस्त भागाची पाहणी; वाशिम जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा घेतला आढावा

Washim drought Central government inspection: केंद्र सरकारच्या आंतर मंत्रालयीन पथकाने शुक्रवारी वाशिम जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून पिकांचे नुकसान आणि दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला.

प्रियंका मुंदिनकेरी
  • केंद्राचे ११ सदस्यीय पथक वाशिममध्ये दाखल
  • नुकसानग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पाहणी
  • शेतकऱ्यांच्या समस्या घेतल्या जाणून

वाशिम: केंद्र सरकारच्या आंतर मंत्रालयीन केंद्रीय पथकाने शुक्रवारी वाशिम जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. जिल्ह्यांतील दुष्काळी परिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीचा बैठकीद्वारे आढावा घेतला. त्यानंतर पथकाने वाशिम जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. केंद्रीय पथकात वरिष्ठ अधिकारी अर्जेशकुमार मधोक, महेश कुमार, सीमा रानी, संजय मीना आणि अभय भारत यांचा सहभाग आहे. पथकातील सदस्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली.

वाशिमचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना, अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर, बुलढाण्याचे जिल्हाधिकारी प्रवीणकुमार देवरे, अकोल्याच्या जिल्हाधिकारी वर्षा मीना, वाशिमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान आणि कृषी सहसंचालक गणेश घोरपडे आदी उपस्थित होते. केंद्र शासनातर्फे राज्यातील दुष्काळ पाहणीसाठी ११ सदस्यांचे पथक नियुक्त करण्यात आले असून, त्यात कृषी, जलसंपदा, ग्रामीण विकास, पाणीपुरवठा, अन्न व सार्वजनिक वितरण, पशुसंवर्धन, अर्थ विभाग, नीती आयोग यांसह संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या बैठकीत अमरावती विभागातील जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीबाबत सादरीकरण करण्यात आले.

पीक नुकसान, पाणी उपलब्धता व टैंकर्सची संभाव्य गरज, शेतीवर अवलंबून असलेले शेतमजूर व जमीनधारकांचे प्रश्न, मजुरांची स्थलांतराची शक्यता या बाबींकडे जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्रीय पथकाचे लक्ष वेधले. यावेळी बैठकीदरम्यान कृषी - सहसंचालक घोरपडे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा यांनी संचालन केले, दुपारी १ वाजता दौऱ्याच्या पुढील टप्प्यात पथकाने मानोरा तालुक्यातील कुपटा येथे मोहम्मद सादिक मोहम्मद शफी यांच्या तसेच कारंजा तालुक्यातील काळीकारंजा येथे त्र्यंबक फकिरा गुल्हाने व पानविहीर येथे रमेश भाऊराव थेर यांच्या शेताला भेट देऊन पीक नुकसानाची प्रत्यक्ष पाहणीसह शेतकऱ्यांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या.

जिल्ह्यातील विविध गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी

बैठकीनंतर केंद्रीय पथकाने जिल्ह्यात विविध गावांना भेटी देऊन दुष्काळी परिस्थिती, पिकांचे नुकसान आणि पाणीटंचाईची प्रत्यक्ष पाहणी केली. पथकाकडून दुष्काळग्रस्त भागातील पिकांचे नुकसान, पाणीटंचाई आणि प्रत्यक्ष परिस्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन होणार आहे. त्यानुसार दुष्काळाची वस्तुस्थिती, शेतीपिकांचे नुकसान, पाणीटंचाई आणि आवश्यक उपाययोजनांची माहिती केंद्र सरकारसमोर मांडली जाणार आहे. केंद्रीय पथकाने वाशिम जिल्हा दौऱ्यात विविध गावांना भेटी देऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली व शेतक-यांशी संवाद साधून त्यांची व्यथा जाणून घेतली. वाशीम तालुक्यातील सुपखेला येथे दयाराम विठ्ठल राऊत यांच्या शेतीला भेट देऊन नुकसान पाहणी करण्यात आली. त्यानंतर मंगरूळपीर तालुक्यातील स्वासिन येथील लघु पाटबंधारे प्रकल्पाची पाहणी करून परिसरातील पाणीटंचाईचा आढावा पथकाने घेतला.

Mumbai News: भारतावर अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळाचे संकट! महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थितीची चिन्हे

मिनी महाबळेश्वर गारठलं! तापमान थेट एकेरी अंकात; पर्यटकांचा ओढा वाढला

Kolhapur Drink and Drive: कोल्हापुरात मद्यधुंद कारचालकाने दोघा भावांना चिरडले; गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाला अटक

जुन्या कॅसेटला मिळाली नवी ओळख! 44 वर्षांपूर्वी फ्लॉप झालेलं गाणं GTA 6 मुळे पुन्हा ट्रेंडमध्ये

Bajra Soup: थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात करा बाजरीच्या सूपचा समावेश, पित्ताच्या त्रासापासून मिळेल सुटका