मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सर्व खासदारांना महत्त्वाचे निर्देश 
राजकारण

Eknath Shinde on Delimitation Bill: मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सर्व खासदारांना महत्त्वाचे निर्देश

Eknath Shinde on Dilimitation Bill: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना खासदारांसोबत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत आगामी मतदारसंघ पुनर्रचना (Delimitation) विधेयकाला पाठिंबा देण्याचे स्पष्ट निर्देश सर्व खासदारांना दिले आहेत.

anuradha sagar
  • शिवसेना खासदारांना पाठिंब्याचे निर्देश

  • विकासकामे आणि लोकशाहीबाबत भूमिका

  • ५०% जागावाढ आणि राज्यांना न्याय

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेना खासदारांसोबत झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व खासदारांना विधेयकाला पाठिंबा देण्याचे निर्देश दिले आहे. त्याचवेळी सोशल मीडियासह आपल्या अधिकृत निवेवदनाच्या माध्यमातूनत्यांनी या निर्णयाला भारतीय लोकशाहीसाठी एक नवीन आणि महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले आहे.

बैठकीनंतर जारी केलेल्या निवेदनात एकनाथ शिंदे म्हणाले की, खरी लोकशाही तळागाळातील शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचली पाहिजे. मतदारसंघांच्या पुनर्रचनेमुळे ते अधिक सुव्यवस्थित होणार आहे. लोकप्रतिनिधी लोकांच्या जवळ येतील आणि विकासकामांचा वेग दुप्पट होईल. सर्व राज्यांमध्ये जागांच्या संख्येत प्रस्तावित ५० टक्के वाढ होणार असल्याने ही सुधारणा कोणत्याही अपवादाशिवाय प्रत्येक राज्यासाठी निष्पक्षता आणि न्याय सुनिश्चित करते.

एकनाथ शिंदे यांची सोशल मीडिया पोस्ट

भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील नवा सुवर्णअध्याय! असं म्हणत त्यांनी आपल्या ट्विटची सुरूवात केली आहे. "भारतीय लोकशाही खऱ्या अर्थाने तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवायची असेल, तर मतदारसंघांची पुनर्रचना ही काळाची गरज आहे. या प्रक्रियेमुळे प्रत्येक राज्यातील जागा ५० टक्क्यांनी वाढणार असल्याने कोणत्याही राज्यावर अन्याय होणार नाही. मतदारसंघांचा आकार सुटसुटीत झाल्यास लोकप्रतिनिधींना शेवटच्या घटकापर्यंत थेट पोहोचणे शक्य होईल आणि विकासकामांचा वेग दुपटीने वाढेल."

"याच ऐतिहासिक प्रक्रियेतून 'नारी शक्ती वंदन कायद्या'अंतर्गत महिलांना ३३ टक्के आरक्षणाची अंमलबजावणी होणार असून, संसदेत महिलांना त्यांचा हक्काचा आवाज मिळणार आहे. आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींच्या खंबीर नेतृत्वात उचललेले हे पाऊल केवळ राजकीय निर्णय नसून, महिला सक्षमीकरण आणि देशाच्या प्रगतीला निर्णायक दिशा देणारी क्रांती आहे. संकुचित राजकारण आणि पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून 'राष्ट्रहित सर्वतोपरी' मानून आपण या ऐतिहासिक निर्णयाला एकमताने साथ देऊया आणि भारतीय लोकशाही अधिक भक्कम करूया! "

Rinku Singh ला लग्नाचे गिफ्ट मिळणार! KKR 'ही' जबाबदारी देणार? इरफान पठाणच्या विधानाने वाढली उत्सुकता

Uttar Pradesh Crime: सून प्रियकरासोबत घरी परतली, सासऱ्यांना आला राग, लोखंडी रॉड घेतला अन्... प्रियकराचा जागीच मृत्यू

कुंडीत कशी करावी लवंग लागवड

Mumbai Local Train Viral Video : गर्दीने भरलेल्या लोकलमध्ये आजींचा भन्नाट जुगाड ! डब्यात खुर्ची ठेवून आरामात बसल्या, व्हिडिओ व्हायरल

Smartphone Storage Chips: नवा स्मार्टफोन घेण्याआधी 'हे' वाचा! चिप्स स्वस्त होऊनही फोनच्या किमती का उतरणार नाहीत?