शरद पवार एनडीए सरकारमध्ये सामील होणार असल्याचा बच्चू कडूंचा दावा (फोटो - सोशल मीडिया)  
राजकारण

Sharad Pawar in NDA : '१५ डिसेंबरनंतर शरद पवार NDA मध्ये सहभागी होतील...'; बच्चू कडू यांचा मोठा गौप्यस्फोट

शिंदे गटाचे नेते बच्चू कडू यांनी १५ डिसेंबर २०२६ नंतर शरद पवार राज्याच्या सत्तेत दिसतील, असा दावा केला आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण न होताही ते सत्तेत सहभागी होऊ शकतात, असे त्यांनी म्हटले आहे.

प्रीति माने
  • शरद पवार हे डिसेंबरमध्ये महायुतीमध्ये सहभागी होणार

  • बच्चू कडू यांचा मोठा दावा

  • दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण नाही तरी दोन्ही सत्तेत असणार

Sharad Pawar In NDA : बारामती : डिलिमिटेशनवरून राज्यात आणि केंद्रात राजकारण रंगले आहे. या विधेयकाला राष्ट्रवादी शरद पवार गटाने पाठिंबा दिल्याने आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यामुळे शरद पवार आणि त्यांचे आठ खासदार हे फक्त महाराष्ट्रात नाहीतर देशात चर्चेत आले आहेत. हे खासदार कोणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान डिसेंबर महिन्यात शरद पवार हे एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याचा मोठा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.

शिंदे गटाचे नेते बच्चू कडू यांनी १५ डिसेंबर २०२६ नंतर शरद पवार राज्याच्या सत्तेत दिसतील, असा दावा केला आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण न होताही हा राजकीय घडामोडींचा भाग घडू शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे. कडू यांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

बच्चू कडू यांनी नेमका काय दावा केला?

बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राजकीय स्थितीवर भाष्य करताना कडू म्हणाले, "राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यामध्ये काय संवाद झाला हे मला माहीत नाही. पण माझ्या अंदाजानुसार तरी, येत्या डिसेंबर महिन्यात राष्ट्रवादी शरद पवार गट हा राज्यातील सरकारमध्ये सामील होईल. दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण होणार नाही, पण शरद पवार यांचा गटही सत्तेमध्ये सामील होणार आहे. दोन्ही राष्ट्रवादी सत्तेत असतील."

'रोहित पवारांना PAने वैगरे कुणीतरी हे पत्र लिहून दिलं असेल...', अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया

बच्चू कडू हे शिंदे गटाचे नेते असून सध्या महायुतीमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे त्यांनी शरद पवार गटाबाबत केलेल्या वक्तव्याने चर्चांना उधाण आले आहे. तसेच हे संभाव्य राजकीय बदल दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाशी संबंधित नसल्याचेही त्यांनी सूचित केले आहे. मात्र, आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांनी कोणतेही सविस्तर राजकीय समीकरण किंवा संभाव्य युतीची रूपरेषा जाहीर केलेली नाही. त्यामुळे सध्या हे त्यांचे राजकीय विधान मानले जात आहे.

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये विलिनीकरण होण्याची चर्चा

दरम्यान, महाराष्ट्रात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि दिवंगत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही गटांमध्ये जवळीक निर्माण होण्याबाबत गेल्या काही काळापासून चर्चा सुरू आहेत. मात्र त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीतील नेत्यांनी विलिनीकरणाच्या सध्या कोणत्याही चर्चा नसल्याचे सांगितले होते.

Rohit Pawar Letter : 'या निर्णयामुळे शरद पवारांच्या आयुष्यभराच्या तपाचा भंग...' रोहित पवारांचे खासदार सुप्रिया सुळेंना पत्र

भाजप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला विलीनीकरणाऐवजी स्वतंत्र सहकारी पक्ष म्हणून एनडीए आणि महायुतीमध्ये सहभागी करून घेण्याच्या पर्यायावर विचार करू शकते, अशीही चर्चा होती. मात्र, सुप्रिया सुळे यांनी यावर प्रतिक्रिया देताना, कोणताही प्रस्तावच नसताना पक्षात सहभागी होण्याबाबत भाष्य कसे करता येईल, असा सवाल केला होता.

दुसरीकडे, राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी २४ नोव्हेंबर रोजी प्रतिक्रिया देताना शरद पवार एनडीएमध्ये सहभागी होतील, असे आपल्याला वाटत नसल्याचे म्हटले होते. मात्र, एखाद्या विशिष्ट मुद्द्यावर ते सरकारला पाठिंबा देऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले होते. याबाबतचा अंतिम निर्णय शरद पवार यांचाच असेल, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले होते.

बच्चू कडू यांनी शरद पवार यांच्याबाबत काय दावा केला आहे?

१५ डिसेंबर २०२६ नंतर शरद पवार राज्याच्या सत्तेत दिसतील, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण होणार आहे का?

बच्चू कडू यांच्या दाव्यानुसार, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांचे विलीनीकरण न होताही शरद पवार सत्तेत सहभागी होऊ शकतात.

बच्चू कडू यांच्या दाव्यानुसार, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांचे विलीनीकरण न होताही शरद पवार सत्तेत सहभागी होऊ शकतात.

२८ सप्टेंबर रोजी शरद पवार यांनी आपला पक्ष अन्य कोणत्याही राजकीय पक्षात विलीन होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच, ज्यांना आपल्यासोबत यायचे आहे, त्यांचे स्वागत असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

Satara News : वाईत चेलाराम बेल एअर हॉस्पिटलच्या मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; हृदयरोग, मधुमेहाच्या तपासण्या

Koregaon Nagar Panchayat Election : राजाभाऊ बर्गे यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव नगरपंचायतीवर भगवा फडकविणार; शंभूराज देसाईंचा निर्धार

Satara News : साताऱ्यातील ऐतिहासिक तलावात प्लास्टिकचा खच; दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त, रोगराईचा धोका

USA News : पिझ्झा हटचे सह-संस्थापक डॅन कार्नी यांचे निधन; वयाच्या ९५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Wai: चिखलीच्या आंबेडकर नगरला पाणीप्रश्नातून दिलासा; दहा लाखांच्या कामांचे भूमिपूजन, रोहित वाडकरांच्या प्रयत्नांना यश