राष्ट्रवादीकडून (शरद पवार गट) खासदारांना व्हीप जारी
लोकसभा खासदार अमोल कोल्हे यांनी जारी केला व्हीप
संसदीय अधिवेशनाला सर्व खासदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना
बारामती : मोदी सरकारने ३० डिसेंबर रोजी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांन उधाण आले असून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यावेळी अधिवेशनामध्ये डिलिमिटेशन बिल मंजूर करून घेण्यासाठी सरकारचे प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या विधेयकाला महाराष्ट्रातून कोणकोणत्या पक्षांकडून पाठिंबा मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचसंदर्भात राष्ट्रवादी शरद पवार गटाने त्यांच्या पक्षातील खासदारांना व्हीप जारी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (शरदचंद्र पवार) आपल्या सर्व लोकसभा खासदारांसाठी 'तीन ओळींचा व्हीप' जारी केला आहे. या संदर्भात त्यांनी एक्स सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहेत. तसेच व्हीपचा फोटो देखील शेअर केला आहे. राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाने जारी केलेल्या अधिकृत पत्रानुसार, सोमवार, ३० नोव्हेंबर ते शुक्रवार, ४ डिसेंबर २०२६ या कालावधीत लोकसभेत अत्यंत महत्त्वाचे कामकाज होणार असून, सर्व खासदारांची सभागृहात उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) लोकसभा खासदार आणि मुख्य प्रतोद अमोल कोल्हे यांनी हा तीन ओळींचा व्हीप जारी केला आहे. त्यात लिहिले की, "सोमवार, ३० नोव्हेंबर ते शुक्रवार, ४ डिसेंबर २०२६ या कालावधीत लोकसभेत अत्यंत महत्त्वाचे कामकाज होणार असल्याने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) सर्व सदस्यांची विनंती आहे की, त्यांनी सोमवार, ३० नोव्हेंबर ते शुक्रवार, ४ डिसेंबर २०२६ या काळात लोकसभेत अनिवार्यपणे उपस्थित राहून पक्षाच्या भूमिकेला पाठिंबा द्यावा. हे अत्यंत महत्त्वाचे मानले जावे."
Political News : 'सुप्रिया सुळेंसुद्धा १५० कोटी मिळालेत का?' संजय शिरसाट यांचा संजय राऊतांना टोला
लोकसभा ३० नोव्हेंबरला अन् राज्यसभा २ डिसेंबरला होणार
केंद्र सरकारने लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती यांना तातडीचे शासकीय कामकाज करण्यासाठी सोमवार, ३० नोव्हेंबर, २०२६ रोजी लोकसभेचे आणि बुधवार, २ डिसेंबर, २०२६ रोजी राज्यसभेचे अधिवेशन पुन्हा बोलावण्याची विनंती केली आहे. यावेळी मोदी सरकार या काळात मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणि महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याच्या तयारीत आहे. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या बाबतीत शरद पवार गट मोदी सरकारच्या बाजूने उभा असल्याचे दिसत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी डिलिमिटेशन बिल हे जनतेच्या हिताचे असल्याचे म्हणत पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे मोदी सरकारला महाराष्ट्रातून विरोधातील शरद पवार गटाकडून पाठिंबा मिळणार असल्याच्या चर्चा आहेत.