रोहित आणि विराट (फोटो- सोशल मिडिया) Rohit Sharma And Virat Kohli
Sports

'जहाँ मैटर बड़े होते हैं, वहाँ...'; Rohit & Virat चा पत्ता कट? गिल अन् BCCI ने दिले 'हे' स्पष्ट संकेत

न्यूझीलंडविरुद्ध सिरीजमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या बॅटमधून जास्त रन्स निघाल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या वर्ल्डकप 2027 खेळण्यावरून चर्चा सुरू झाल्या आहेत.

तेजस भागवत
  • रोहित-विराटचा पत्ता बीसीसीआय कट करण्याची शक्यता

  • न्यूझीलंड सिरीजमध्ये दोघे फलंदाजीत अपयशी

  • बीसीसीआयने स्पष्ट केली भूमिका

Rohit-Virat: नुकतीच भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 5 सामन्यांची वनडे सिरीज पार पडली. ही सिरीज 3-1 ने भारताने जिंकली आहे. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. मात्र या सिरीजमध्ये सर्वात जास्त लक्ष होते ते विराट कोहली आणि रोहित शर्माच्या कामगिरीकडे. मात्र या सिरीजमध्ये दोघांनी चाहत्यांची निराशा केली. पूर्ण सिरीजमध्ये दोघांची फलंदाजीत काहीशी सामान्य असल्याचे दिसून आले. त्यावरून आता हे दोघे वर्ल्डकप खेळणार की नाही अशी चर्चा सुरू झाली आहे.

न्यूझीलंडविरुद्ध सिरीजमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या बॅटमधून जास्त रन्स निघाल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या वर्ल्डकप 2027 खेळण्यावरून चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच बीसीसीआयने देखील याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र बीसीसीआयच्या भूमिकेमुळे 'रो-को' च्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.

दोन वाघ मैदानात पुन्हा कधी दिसणार? Rohit & Virat ‘या’ सिरीजमध्ये खेळताना दिसणार; मोठी अपडेट समोर

न्यूझीलंडविरुद्धच्या सिरीजमध्ये रोहित अन् विराटला अपेक्षित यश प्राप्त झाले नाही. त्यामुळे त्यांच्या 2027 च्या वर्ल्डकपमध्ये खेळण्याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. हे दोन्ही वर्ल्डकप खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र बीसीसीआयने भूमिका स्पष्ट करताच थोडासा दिलासा मिळाला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, एका वनडे सिरीजवरून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंचे भविष्य ठरणार नाही, मगिरीवरून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंचे भवितव्य ठरवले जाणार नाही. मोठ्या स्पर्धांमधील त्यांचा अनुभव, दडपणाखाली खेळण्याची क्षमता आणि ड्रेसिंग रूममधील त्यांचे स्थान संघासाठी अत्यंत मोलाचे असल्याची भूमिका बीसीसीआयने मंडळींचे समोर आले आहे.

भारतीय क्रिकेटचे दोन दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भविष्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता नवे वळण मिळाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार बीसीसीआयनंतर कर्णधार शुभमन गिलने देखील याबाबत मोठे संकेत दिल्याचे म्हटले जात आहे.

IND vs NZ : होय; वचपा काढला, भारतानं सांघिक कामगिरीनं मालिका जिंकली! 200 धावा ही न्यूझीलंडला करू दिल्या नाहीत

बीसीसीआय अधिकाऱ्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कधीपर्यंत खेळायचे, याचा अंतिम निर्णय पूर्णपणे या दोन्ही खेळाडूंवरच अवलंबून असेल. "जहाँ मैटर बड़े होते हैं, वहाँ लेजेंड्स खड़े होते हैं" असे शुभमन गिलने म्हटले आहे. 13 डिसेंबरपासून भारत अन् श्रीलंकेमध्ये वनडे सिरीज होणार आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिका कोणी जिंकली?

भारताने न्यूझीलंडविरुद्धची पाच सामन्यांची वनडे मालिका 3-1 अशा फरकाने जिंकली.

विराट कोहली आणि रोहित शर्मा 2027 चा वनडे वर्ल्डकप खेळणार का?

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील दोघांच्या कामगिरीनंतर त्यांच्या वर्ल्डकपमधील सहभागाबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र, त्यांच्या निवडीबाबत बीसीसीआय किंवा निवड समितीकडून अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही.

Japanese Couple Viral Video : घटस्फोटानंतर चार वर्षांनी पुन्हा प्रेम जुळले! जपानी जोडप्याने लखनौमध्ये हिंदू रितीरिवाजानुसार केले लग्न

Tarali Project Controversy: तारळी प्रकल्पाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; सयाजी शिंदेंनी उघडला कायदेशीर लढ्याचा मोर्चा!

FSSAI Action Against Bisleri: बापरे...! बिस्लेरीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत घटक; कंपनीवर गुन्हा दाखल

Lions Viral Video : आजूबाजूला सिंहच सिंह, तरीही बाईकस्वार बिनधास्त पुढे; झांबियातील थरारक व्हिडिओ व्हायरल

PM Modi Balen Shah Meet: नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांना पीएम मोदींची मोठी भेट! IIT कॅपसबाबत घेतला 'हा' मोठा ऐतिहासिक निर्णय