आयसीसीची यशस्वी जयस्वालवर कारवाई (फोटो- ट्विटर) 
Sports

IND Vs SL: आपलीच लाल करण्याच्या नादात पैसे गेले! ICC ची 'त्या' प्रकरणात जयस्वाल अन् फर्नांडोवर कारवाई

IND Vs SL कोलंबो येथे भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. पहिल्या दिवशी भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज असिथा फर्नांडो यांच्यात मोठा वाद झाला.

तेजस भागवत
  • आयसीसीची यशस्वी जयस्वालवर मोठी कारवाई
  • असिथा फर्नांडोसोबत यशस्वी जयस्वालचा झालेला वाद 
  • कसोटीचा दुसऱ्या दिवशीचा खेळ पावसामुळे थांबला 

India Vs Sri Lanka 2nd Test Match Live Updates: सध्या भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. आज सामन्याचा दुसरा दिवस आहे. भारताने 8 विकेट्स गमावून 475 रन्स केल्या आहे. पावसामुळे खेळ थांबवण्यात आला आहे. पहिल्या दिवशी भारताचा फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि असिथा फर्नांडो यांच्यात वाद झाला होता, आता या प्रकरणात आयसीसीने मोठी कारवाई केली आहे.

कोलंबो येथे भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. पहिल्या दिवशी भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज असिथा फर्नांडो यांच्यात मोठा वाद झाला. याचा व्हिडिओ देखील समोर आला होता. आता या प्रकरणावर आयसीसीने दोन्ही खेळाडूंवर मोठी कारवाई केली आहे.

सामना सुरू झाल्यावर यशस्वी जयस्वाल 45 रन्स करून आउट झाला. त्यावेळेस असिथा फर्नांडो गोलंदाजी करत होता. जयस्वाल आउट झाल्यावर असिथा फर्नांडोने त्याला आक्रमक शैलीत निरोप दिला. त्यामुळे यशस्वीने देखील त्याला चोख प्रत्युत्तर दिले. दोघांमध्ये शाब्दिक चकमक वाढली. मैदानावरील इतर खेळाडू आणि अंपायर यांनी त्या दोघांना आवरले. या प्रकरणाची आयसीसीने गंभीर दखल घेतली आहे.

आयसीसीने दोन्ही खेळाडू दोषी आढळले असल्याचे सांगितले. यशस्वी जयस्वाल आणि असिथा फर्नांडो या दोन खेळाडूंच्या मॅच फी वर आयसीसीने 25 टक्के दंड आकारला आहे. तसेच दोघांच्या खात्यांमध्ये 1-1 डिमेरिट पॉईंट्स देखील दिला आहे. तसेच आयसीसी नियम 2 .12 चे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई केली गेली आहे. दोन्ही खेळाडूंवर गेल्या वर्षभरात शिस्तभंगाचा कोणताही आरोप किंवा तक्रार किंवा तसे वर्तन नव्हे. त्यामुळे दोघांवरी पुढील सामने खेळण्यासाठी बंदी घालण्यात आलेली नाहीये.

टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी जैस्वाल उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता. केएल राहुल बाद झाल्यानंतरही जयस्वाल मोठे फटके खेळत राहिला. यानंतर, १७ व्या षटकात असिथा फर्नांडोच्या गोलंदाजीवर जैस्वाल क्लीन बोल्ड झाला. ५३ चेंडूंमध्ये ४५ धावा करून जयस्वाल बाद झाला.

Mumbai News: भारतावर अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळाचे संकट! महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थितीची चिन्हे

मिनी महाबळेश्वर गारठलं! तापमान थेट एकेरी अंकात; पर्यटकांचा ओढा वाढला

Kolhapur Drink and Drive: कोल्हापुरात मद्यधुंद कारचालकाने दोघा भावांना चिरडले; गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाला अटक

जुन्या कॅसेटला मिळाली नवी ओळख! 44 वर्षांपूर्वी फ्लॉप झालेलं गाणं GTA 6 मुळे पुन्हा ट्रेंडमध्ये

Bajra Soup: थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात करा बाजरीच्या सूपचा समावेश, पित्ताच्या त्रासापासून मिळेल सुटका