IND vs NZ 2nd Test India Probable Playing 11 IND vs NZ 2nd Test India Probable Playing 11
Sports

IND vs NZ: दुसऱ्या कसोटीत कर्णधार गिलचा मोठा गेमप्लॅन! सिराजचं कमबॅक, प्रसिद्ध कृष्णाचा पत्ता कट? कशी असेल भारताची संभाव्य Playing 11

IND vs NZ 2nd Test India Probable Playing 11: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना लवकरच सुरु होणार आहे. या सामन्यात कोणाला मिळणार संधी आणि कशी असेल भारताची संभाव्य प्लेइंग ११, जाणून घेऊयात.

Priya M
  • दुसऱ्या कसोटीत कोणाला मिळणार संधी?

  • सिराज, जडेजाच्या पुनरागमनाची चर्चा

  • न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाची नवी रणनीती

IND vs NZ 2nd Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना आणि अंतिम सामना २७ नोव्हेंबरपासून खेळवला जाणार आहे. हा सामना क्राइस्टचर्च येथे खेळला जाईल. पहिल्या सामन्यात पहिल्या भारतीय संघाने फलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केली, परंतु न्यूझीलंडच्या फलंदाजांनी शेवटच्या दिवशी जोरदार झुंज देत सामना ड्रॉ करण्यास भाग पाडले.

या सामन्यात भारतीय गोलंदाजी फारसा प्रभाव पाडू शकली नाही. यामुळे, दुसऱ्या कसोटीपूर्वी अंतिम ११ खेळाडूंमध्ये काही बदल होऊ शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कर्णधार शुभमन गिल दुसऱ्या सामन्यात तीन बदल करू शकतो. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज संघात कमबॅक करु शकतो, तर प्रसिद्ध कृष्णाला वगळले जाऊ शकते.

न्यूझीलंडविरुद्ध भारताची संभाव्य प्लेइंग ११

पहिल्या कसोटीत भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्यामुळे फलंदाजीच्या क्रमात मोठे बदल होण्याची शक्यता कमी आहे. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल डावाची सुरुवात करण्याची शक्यता आहे. त्यानंतर देवदत्त पडिक्कल आणि कर्णधार शुभमन गिल फलंदाजीची जबाबदारी सांभाळतील. ऋषभ पंतला विकेटकीपर म्हणून संघात स्थान मिळणे जवळपास निश्चित आहे.

पहिल्या कसोटीत अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर गोलंदाजीत अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे, त्याच्या जागी अनुभवी रवींद्र जडेजाला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान दिले जाऊ शकते. जडेजा आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीने संघाला मजबूत करू शकतो.

प्रसिद्ध कृष्णा OUT मोहम्मद सिराज IN

वेगवान गोलंदाजी विभागातही बदल होऊ शकतात. प्रसिद्ध कृष्णा पहिल्या कसोटीत प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला होता. त्यामुळे, त्याच्या जागी मोहम्मद सिराजला संधी मिळू शकते.सिराजच्या पुनरागमनामुळे जसप्रीत बुमराहसोबत भारतीय वेगवान गोलंदाजी आक्रमण अधिक मजबूत होईल. दुसऱ्या कसोटीत गुरनूर ब्रारलाही संधी मिळू शकते. पहिल्या सामन्यात खेळलेल्या अंशुल कंबोज आणि आकाश दीप यांना संघाबाहेर बसावे लागू शकते. मात्र, अंतिम निर्णय संघ व्यवस्थापनाची रणनीती आणि खेळपट्टीच्या परिस्थितीवर अवलंबून असेल.

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ११

यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, अंशुल कंबोज/आकाश दीप, जसप्रीत बुमराह, गुरनूर ब्रार, मोहम्मद सिराज.

प्रदूषणाने पावसालाही रोखले? ढगांच्या निर्मिती प्रक्रियेत थेट...; समोर आला धक्कादायक खुलासा

हृदयविकार अन् रक्तदाबाच्या गोळ्यांमध्येही घटकांची मोठी कपात! जेजुरी एमआयडीसीतील औषध कंपनीचे काळे कारनामे उघड...

Maruti Suzuki Cars Price Hike: मारुती सुझुकीच्या कार पुन्हा महागल्या! 2026 मधील चौथी दरवाढ, जाणून घ्या नव्या किंमती

Cute Viral Video : केस कापायला नकार, डोळ्यात पाणी अन् चेहऱ्यावर राग; चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Dharashiv Dance Competition : पुण्यात धाराशिवच्या कलाकारांचा डंका! 'रस रंग' ग्रुपची गरब्यात बाजी