रांची तिकीटांची काळाबाजारी (फोटो- सोशल मीडिया) 
Sports

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील 'त्या' VIDEO ने खळबळ

IND Vs WI: समोर आलेल्या माहितीनुसार, या स्टेडियम भारत वेस्ट इंडिज सामन्याचे तिकीट 2000 रुपये आहे, ते तिकीट काळाबाजारी करून जवळपास 16 हजार म्हणजे तब्बल 8 पट जास्त किंमतीने विकले जात असल्याचे म्हटले जात आहे.

तेजस भागवत
  • आज भारत अन् वेस्ट इंडिजमध्ये पहिला टी 20 सामना 
  • वैभव सूर्यवंशीला संघात स्थान मिळण्याची शक्यता 
  • रांची स्टेडियमवर तिकीटांच्या काळाबाजारीचा व्हिडिओ व्हायरल 

IND Vs WI T20 Series: सध्या वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात होत असून मालिकेतील पहिला सामना लखनऊ येथे खेळवला जाणार आहे. तर दुसरा सामना 9 ऑक्टोबर रोजी रांची येथे होणार आहे. मात्र तिथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी तिकीटाची काळाबाजारी सुरू असल्याचे म्हटले जात आहे. त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. मात्र यामागचे सत्य नक्की काय आहे ते समजू शकलेले नाही.

स्टेडियमबाहेर खुलेआम तिकिटांची विक्री

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, जो रांची येथील 'झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशन' स्टेडियमबाहेरचा असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक उघडपणे आणि बिनधास्तपणे सामन्याची तिकिटे काळ्या बाजारात महागड्या दराने विकताना दिसत आहेत. थेट स्टेडियमच्या बाहेरच असा प्रकार सुरू असल्याने क्रिकेट चाहत्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सामन्याची तिकिटे अधिकृत खिडकीवर आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध नसताना, काळ्या बाजारात विक्री करणाऱ्यांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर तिकिटे आली कुठून? असा थेट सवाल आता उपस्थित केला जात आहे. उघड्यावर सुरू असलेल्या या तिकिटांच्या काळ्या बाजारामुळे स्थानिक पोलीस प्रशासन आणि झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या सुरक्षेवर तसेच व्यवस्थापनावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच या व्हिडिओमागचे सत्य नेमके काय आहे याचा तपास केला जावा अशी मागणी केली जात आहे. तपास झाल्यावरच या व्हिडिओचे सत्य सर्वांसमोर येण्यास मदत होऊ शकते.

समोर आलेल्या माहितीनुसार, या स्टेडियम भारत वेस्ट इंडिज सामन्याचे तिकीट 2000 रुपये आहे, ते तिकीट काळाबाजारी करून जवळपास 16 हजार म्हणजे तब्बल 8 पट जास्त किंमतीने विकले जात असल्याचे म्हटले जात आहे. या व्हिडिओमध्ये जे आहे त्याचा दावा 'नवराष्ट्र' करत नाही. मात्र असंख्य लोक अधिकृतपणे तिकीट काढण्यासाठी प्रतीक्षा करत असताना असा काळाबाजार होत असल्यास यावर कारवाई केली जाणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.

Mumbai News: भारतावर अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळाचे संकट! महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थितीची चिन्हे

मिनी महाबळेश्वर गारठलं! तापमान थेट एकेरी अंकात; पर्यटकांचा ओढा वाढला

Kolhapur Drink and Drive: कोल्हापुरात मद्यधुंद कारचालकाने दोघा भावांना चिरडले; गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाला अटक

जुन्या कॅसेटला मिळाली नवी ओळख! 44 वर्षांपूर्वी फ्लॉप झालेलं गाणं GTA 6 मुळे पुन्हा ट्रेंडमध्ये

Bajra Soup: थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात करा बाजरीच्या सूपचा समावेश, पित्ताच्या त्रासापासून मिळेल सुटका