मोहम्मद शामी (फोटो- सोशल मिडिया) 
Sports

Mohammed Shami: 'मी आता विचार...'; टीम इंडिया अन् वर्ल्डकपबाबत शामीने धक्कादायक विधान

Mohammed Shami: मोहम्मद शामीने 2027 चा आगामी वर्ल्डकप किंवा 2028 मधील टी 20 वर्ल्डकपचा विचार करत नसल्याचे म्हटल्याचे समोर येत आहे.

तेजस भागवत
  • टीम इंडियातील पुनरागमनावर शामीचे महत्वाचे विधान

  • बऱ्याच कालावधीपासून शामीला टीम इंडियात एन्ट्री मिळेना

  • देशांतर्गत क्रिकेटमध्ये शामीने केले शानदार प्रदर्शन

Mohammed Shami: मोहम्मद शामी हा भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज आहे. 2023 मध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्डकपमध्ये शामीने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते. त्यानंतर मात्र त्याला टीम इंडियात पुनरागमन करण्याची संधी प्राप्त झाली आहे. नुकतेच मोहम्मद शामीने वर्ल्ड कप आणि टीम इंडियात खेळण्याच्या बाबतीत महत्वाचे विधान केले आहे.

वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीने आपल्या भविष्यबबत विधान केले आहे. टीम इंडियात पुनरागमन आणि आगामी वर्ल्डकपमध्ये खेळण्याबाबत त्याने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नुकतीच शामीने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सध्या शामीने आपण क्रिकेट खेळण्याचा आनंद घेत असून फिटनेसवर लक्ष देत असल्याचे म्हटल्याचे समोर आले आहे.

Mohammed Shami: ‘अल्लाह मालिक है…’, क्रिकेट संघात परतण्यावर मोहम्मद शमीचे विधान व्हायरल, अजूनही सकारात्मक

मोहम्मद शामीने 2027 चा आगामी वर्ल्डकप किंवा 2028 मधील टी 20 वर्ल्डकपचा विचार करत नसल्याचे म्हटल्याचे समोर येत आहे. सध्या त्याचे संपूर्ण लक्ष फिटनेस, देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये खेळण्यावर असल्याचे शामीने सांगितले. भारतीय संघातील स्थान किंवा पुनरागमन याबाबत केवळ प्रतीक्षा न करता मैदानावर सक्रिय राहण्याचे शामीच्या विधानातून दिसून येत आहे.

मोहम्मद शामी नेमके काय म्हणाला?

टीम इंडियामध्ये निवड होण्याबाबत निवड समिती जो निर्णय घेईल तो योग्यच असेल, असे भावूक विधान शामीने केले आहे. मुख्य संघात संधी मिळविणे किंवा पुनरागमन करणे याचा विचार करणे मी थांबवले आहे. आता मी केवळ माझी गोलंदाजी आणि स्वतःची कामगिरी अजून कशी चांगली होईल याच्यावर भर देत आहे.

कोणत्याही स्तरावर खेळत असताना ज्येष्ठ खेळाडूंनी आपला अनुभव युवा खेळाडूंसोबत जरूर शेअर केला पाहिजे, असे मत अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीने व्यक्त केले आहे. देशांतर्गत स्पर्धेत खेळण्याचा आणि आपल्या कसोटी क्रिकेटमधून घेतलेल्या निवृत्तीचा कोणताही संबंध नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. कोणत्याही खेळामध्ये अनुभव हा महत्वाचे असल्यांचे शामीने म्हटले. फिटनेस टिकवून ठेवण्यासाठी आपण रेड बॉल क्रिकेट देखील खेळण्यास तयार असल्याचे शामीने म्हटले आहे. गेले 15 ते 20 वर्षे याचे पालन मी नियमित करत असल्याचे त्याने म्हटले आहे.

क्रिकेटविश्वात मोठी खळबळ! 'प्रत्येक संघर्ष, प्रत्येक दुखापत...'; Mohammed Shami ने जाहीर केला मोठा निर्णय

मोहम्मद शामीने 2023 च्या वनडे वर्ल्डकपमध्ये कशी कामगिरी केली होती?

मोहम्मद शामीने 2023 च्या वनडे वर्ल्डकपमध्ये शानदार गोलंदाजी केली होती. त्याने स्पर्धेत सर्वाधिक 24 विकेट्स घेत भारतीय संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

मोहम्मद शामीने टीम इंडियात पुनरागमन केले आहे का?

मोहम्मद शामीला दुखापती आणि फिटनेसच्या समस्यांमुळे भारतीय संघाबाहेर राहावे लागले होते. मात्र, त्याने पुन्हा टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

उपवासाच्या वेळी शेंगदाणे का खावेत? जाणून घ्या फायदे

Fluffy pancakes recipe: सोशल मीडियावर गाजतायत जपानी फ्लफी पॅनकेक्स, घरीच बनवा मऊ, स्पंजी आणि जाडसर पॅनकेक्स!

Satwai Puja: बाळाच्या जन्मानंतर सहाव्या दिवशी स्वस्तिकावर का झोपवतात नवजात बालकाला? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Political News : 'सुप्रिया सुळेंसुद्धा १५० कोटी मिळालेत का?' संजय शिरसाट यांचा संजय राऊतांना टोला

IND vs NZ: मैदानात उतरताच यशस्वी जैस्वालने केला 'हा' अनोखा विश्वविक्रम! सचिन तेंडुलकरलाही टाकले मागे