‘अभिषेक ठाकुर करंडक‌’ (फोटो- सोशल मिडिया) 
Sports

Cricket News: मैदानावर जय बिस्ताचा धुमाकूळ; 77 रन्स अन्...; 'या' संघाचा दणदणीत पराभव

येवलेवाडी येथील ब्रिलीयंट्स स्पोर्ट्‌स ॲकॅडमीच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत जय बिस्ता याने केलेल्या ७७ धावांच्या जोरावर मुंडे स्पोर्ट्‌स संघाने अंकित बावणे क्रिकेट ॲकॅडमीचा सात गडी राखून पराभव केला.

तेजस भागवत

Cricket News: पुणे क्रिकेट ॲकॅडमी आणि सागर कांबळे यांच्यावतीने आयोजित कै. अभिषेक ठाकुर यांच्या स्मरणार्थ आठव्या ‘अभिषेक ठाकुर करंडक‌’ आंतरक्लब खुल्या गटाच्या टेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत मुंबईच्या मुंडे स्पोर्ट्‌स संघाने आपल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून सलग दोन विजयांची कामगिरी केली. येवलेवाडी (Pune) येथील ब्रिलीयंट्स स्पोर्ट्‌स ॲकॅडमीच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत जय बिस्ता याने केलेल्या ७७ धावांच्या जोरावर मुंडे स्पोर्ट्‌स संघाने अंकित बावणे क्रिकेट ॲकॅडमीचा सात गडी राखून पराभव केला. 

पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या अंकित बावणे संघाने २० षटकात १६९ धावांचे लक्ष्य उभे केले. चंद्रकांत सरोज (४६ धावा) आणि आकाश पांडेकर (४५ धावा) यांनी संघाचा डाव बांधला. हे लक्ष्य मुंडे स्पोर्ट्‌सने १३ षटकात पूर्ण केले. जय बिस्ता (७७ धावा) आणि श्रेयश कुमार (नाबाद ५२ धावा) यांनी संघाचा विजय सोपा केला. दुसऱ्या सामन्यात श्रेयश कुमार याने केलेल्या नाबाद १०६ धावांच्या जोरावर मुंडे स्पोर्ट्‌सने प्लॅटीनयम क्रिकेट ॲकॅडमीचा ४९ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळणाऱ्या मुंडे स्पोर्ट्‌स संघाने २० षटकात २३४ धावांचा डोंगर उभा केला. 

पुण्याच्या क्रिकेट मैदानात MES क्लबचा दबदबा! अभिषेक ठाकुर करंडक स्पर्धेत विजयांची हॅट्ट्रिक

श्रेयश कुमार याने ५७ चेंडूत १० चौकार आणि ८ षटकारांसह नाबाद १०६ धावांची खेळी केली. मोईन खान याने ५० धावांचे आणि जय बिस्ता याने ४६ धावांचे योगदान दिले. या लक्षाचा पाठलाग करताना प्लॅटीनयम क्रिकेट ॲकॅडमीचा डाव १८५ धावांवर मर्यादित राहीला. आदित्य वानखेडे (६१ धावा), मानव पांडे (३४ धावा) आणि देवांश झा (३२ धावा) करून प्रतिकार केला.

गटसाखळी फेरीनुसार स्पर्धेचा सविस्तर निकाल'

अंकित बावणे क्रिकेट ॲकॅडमीः २० षटकात ९ गडी बाद १६९ धावा (चंद्रकांत सरोज ४६, आकाश पांडेकर ४५, अनुराग मिश्रा ३-२९, सय्यद मोहम्मद २-३९) पराभूत वि. मुंडे स्पोर्ट्‌स-मुंबईः १३ षटकात ३ गडी बाद १७३ धावा (जय बिस्ता ७७ (३०, ७ चौकार, ७ षटकार), श्रेयश कुमार नाबाद ५२ (२०, ४ चौकार, ५ षटकार), मयुर गिड्डे २५)

Cricket News: राज गादियाचे शतक, योगेश पवारची फटकेबाजी! डीव्हीसीएचा १७१ धावांनी दणदणीत विजय

सामनावीरः जय बिस्ता

मुंडे स्पोर्ट्‌स-मुंबईः २० षटकात ३ गडी बाद २३४ धावा (श्रेयश कुमार नाबाद १०६ (५७, १० चौकार, ८ षटकार), मोईन खान ५० (१७, ३ चौकार, ५ षटकार), जय बिस्ता ४६) वि.वि. प्लॅटीनयम क्रिकेट ॲकॅडमीः २० षटकात ९ गडी बाद १८५ धावा (आदित्य वानखेडे ६१ (३८, ६ चौकार, २ षटकार), मानव पांडे ३४, देवांश झा ३२, जईश पाटील २७, सय्यद मोहम्मद ४-१८);

सामनावीरः श्रेयश कुमार.

अभिषेक ठाकुर करंडक क्रिकेट स्पर्धेत कोणत्या संघाने सलग दोन विजय मिळवले?

आठव्या अभिषेक ठाकुर करंडक आंतरक्लब टी-२० क्रिकेट स्पर्धेत मुंबईच्या मुंडे स्पोर्ट्स संघाने सलग दोन विजय मिळवण्याची कामगिरी केली.

मुंडे स्पोर्ट्स संघाच्या विजयात जय बिस्ताने किती धावा केल्या?

अंकित बावणे क्रिकेट ॲकॅडमीविरुद्धच्या सामन्यात जय बिस्ताने ७७ धावांची शानदार खेळी केली.

Dombivli Kidnapping Case : डोंबिवली अपहरण-खंडणी प्रकरणात नवा ट्विस्ट; आरोपींच्या अटकेसाठी उच्च न्यायालयात धाव

आधार लिंक नाही, ई-केवायसी अपूर्ण; मावळमधील शेकडो शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत

Jawa Yezdi BSA Nomads Community : पिढ्यान्‌पिढ्या टिकलेली बाईकची क्रेझ! जावा, येझदी आणि BSA नोमॅड्स कम्युनिटीने गाठला 3 लाखांचा टप्पा

IND vs NZ: किवींच्या मैदानावर टीम इंडियाची अग्निपरीक्षा! हॅगली ओव्हलची खेळपट्टी कोणाला देणार साथ? पाहा Pitch Report

Sinhagad Medical College: कोट्यावधींचे शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांचे काय? हायकोर्टाचा संताप!