Shai hope score 316 runs 6 days  
Sports

IND vs WI: Shai Hope चा धावांचा धुमाकूळ! ६ दिवसांत ठोकल्या तब्बल 'इतक्या' रन्स; रोहित शर्माला खेळाडूला टाकले मागे

Shai hope score 316 runs 6 days Broke Rohit Sharma Record: वेस्ट इंडिजचा कर्णधार शे होपने भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात होपने शानदार फलंदाजी करत नाबाद १०२ धावा केल्या. या खेळीने त्याने केवळ वेस्ट इंडिजला विजय मिळवून दिला नाही, तर एक विश्वविक्रमही प्रस्थापित केला.

प्रियंका मुंदिनकेरी
  • ६ दिवसांत धावांचा पाऊस
  • शाई होपने केला असा पराक्रम
  • रोहित शर्माही मागे पडला

वेस्ट इंडिजचा कर्णधार शे होपची बॅट भारत दौऱ्यावर धुमाकूळ घालत आहे. होपने गेल्या सहा दिवसांत आपल्या स्फोटक फलंदाजीने इतिहास रचला आहे. भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत २७८ धावांसह शे होप शुभमन गिलनंतर दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. आता त्याने टी-२० मालिकेतही आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवला आहे. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याने एका अर्धशतक आणि एका शतकासह १५४ धावा केल्या आहेत.

याआधी त्याने, भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात १६२ धावांची नाबाद खेळी करून सामना जिंकून दिला होता. त्याने पहिल्या टी-२० सामन्यात ५२ आणि दुसऱ्या सामन्यात नाबाद १०२ धावा केल्या. अशाप्रकारे, गेल्या सहा दिवसांत भारताविरुद्धच्या तीन डावांमध्ये होपने केवळ एकदाच बाद होऊन एकूण ३१६ धावा केल्या आहेत. याशिवाय, होपने एक असा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे, जो यापूर्वी इतर कोणत्याही क्रिकेटपटूने केलेला नाही. (Shai hope score 316 runs 6 days)

शे होपने रचला नवा इतिहास

वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होप आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहा दिवसांच्या आत एकदिवसीय सामन्यात १५० धावा आणि टी-२० सामन्यात १०० किंवा त्याहून अधिक धावा करणारा जगातील पहिली क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम न्यूझीलंडची महिला क्रिकेटपटू अमेलिया केरच्या नावावर होता. केरने सात दिवसांमध्ये एकदिवसीय सामन्यात १५० पेक्षा जास्त धावा आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० सामन्यात शतक ठोकले होते.

भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माने पुरुष क्रिकेटमध्ये यापूर्वीच ही कामगिरी केली आहे, परंतु होपच्या कामगिरीमुळे तो यादीत तिसऱ्या स्थानावर सरकला आहे. रोहितने आपल्या कारकिर्दीत तीन वेळा ही कामगिरी केली आहे. परंतु, त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये १५० आणि टी-२० सामन्यांमध्ये १०० धावा आठ-नऊ दिवसांच्या कालावधीतच पूर्ण केल्या आहेत.

एकदिवसीय सामन्यातील १५० धावा आणि टी२० सामन्यातील शतक यांमधील सर्वात कमी वेळेचे अंतर

  • शे होप - ६ दिवस २०२६ (१६२ विरुद्ध भारत, एकदिवसीय आणि १०२ विरुद्ध भारत, टी२०)
  • अमेलिया केर - ७ दिवस - २०२६ (१०५ विरुद्ध दक्षिण आफ्रिका, टी२० आणि १७९ विरुद्ध दक्षिण आफ्रिका, एकदिवसीय)
  • रोहित शर्मा - ८ दिवस - २०१८ (१६२ विरुद्ध वेस्ट इंडिज, एकदिवसीय आणि १११ विरुद्ध वेस्ट इंडिज, टी२०)
  • रोहित शर्मा - ९ दिवस - २०१५ (१०६ विरुद्ध दक्षिण आफ्रिका, टी२० आणि १५० विरुद्ध दक्षिण आफ्रिका, एकदिवसीय)
  • रोहित शर्मा - ९ दिवस - २०१७ (२०८ विरुद्ध श्रीलंका, एकदिवसीय आणि ११८ विरुद्ध श्रीलंका, टी२०)

Mumbai News: भारतावर अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळाचे संकट! महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थितीची चिन्हे

मिनी महाबळेश्वर गारठलं! तापमान थेट एकेरी अंकात; पर्यटकांचा ओढा वाढला

Kolhapur Drink and Drive: कोल्हापुरात मद्यधुंद कारचालकाने दोघा भावांना चिरडले; गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाला अटक

जुन्या कॅसेटला मिळाली नवी ओळख! 44 वर्षांपूर्वी फ्लॉप झालेलं गाणं GTA 6 मुळे पुन्हा ट्रेंडमध्ये

Bajra Soup: थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात करा बाजरीच्या सूपचा समावेश, पित्ताच्या त्रासापासून मिळेल सुटका