U19 Women's Asia Cup 2027 photo- social media
Sports

U19 Women's Asia Cup साठी टीम इंडियाची घोषणा! भाविका अहिरे करणार भारताचे नेतृत्व; पाहा संपूर्ण संघ

U19 Women's Asia Cup 2027 india squad announced: बीसीसीआयने अंडर-१९ महिला आशिया कप २०२७ साठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. विकेटकीपर -फलंदाज भाविका अहिरेला संघाची कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

Priyanka Mundinkeri
  • गतविजेता भारत पुन्हा मैदानात उतरणार

  • अंडर-१९ महिला आशिया कपसाठी संघ जाहीर

  • भाविका अहिरेला मिळाली कर्णधारपदाची संधी

U19 Women's Asia Cup 2027: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एसीसी अंडर-१९ महिला आशिया कप २०२७ साठी (ACC U19 Women's Asia Cup) भारतीय संघाची घोषणा केली आहे. महिला निवड समितीने युएईमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची निवड केली आहे.

विकेटकीपर-फलंदाज भाविका अहिरे हिची संघाची कर्णधार म्हणून, तर अनादी तागडे हिची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. भारत गतविजेता म्हणून या स्पर्धेत उतरेल आणि सलग दुसरे विजेतेपद पटकावण्याचे ध्येय असेल. पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसी अंडर-१९ महिला टी-२० विश्वचषक २०२७ च्या तयारीसाठीही ही स्पर्धा भारतीय संघासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.

१८ वर्षाच्या भाविका अहिरेच्या हाती संघाची कमान

महिला निवड समितीने २०२७ च्या अंडर-१९ महिला आशिया कपसाठी भारतीय संघात अनेक युवा खेळाडूंचा समावेश केला आहे. १८ वर्षीय भाविका अहिरेला कर्णधार, तर अनादी तागडेला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. भाविकाच्या नेतृत्वाखालील संघात इरा जाधव, निधी महतो, उमा काशवी, पूर्वा सिवाच, मेहक नरवासे, मैत्री मणियार, ईश्वरी अवसार आणि दिया यादव या खेळाडूंचा समावेश आहे.

याव्यतिरिक्त, श्रेया एस. चव्हाण, समायरा राघव, कुमारी पलक, अक्षया परमार आणि पलक सिंग यांनाही संधी मिळाली आहे. संघातील अनेक खेळाडू सध्या इंग्लंडच्या १९ वर्षांखालील महिला संघाविरुद्ध पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत खेळत आहेत. भारतीय संघाने या मालिकेत शानदार कामगिरी करत सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून २-० अशी आघाडी घेतली आहे.

भारतीय संघ डिफेन्डींग चॅम्पियन म्हणून मैदानात उतरणार

भारतीय संघ गतविजेता म्हणून १९ वर्षांखालील महिला आशिया कप २०२७ मध्ये सहभागी होईल. २०२४ मध्ये झालेल्या १९ वर्षांखालील महिला आशिया कपच्या पहिल्याच हंगामात, निकी प्रसादच्या नेतृत्वाखाली भारताने उत्कृष्ट कामगिरी केली होती. अंतिम सामन्यात बांग्लादेशला पराभूत करून संघाने विजेतेपद पटकावले होते. आता, भाविका अहिरेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आपले विजेतेपद टिकवण्याचा प्रयत्न करेल. याव्यतिरिक्त, भारताने २०२३ मध्ये आयसीसी १९ वर्षांखालील महिला टी२० विश्वचषक जिंकला होता.

१९ वर्षांखालील महिला आशिया कपसाठी भारतीय संघ

भाविका अहिरे (कर्णधार), इरा जाधव, निधी महातो, पूर्वा सिवाच, मेहक नरवसे, मैत्री मणियार, ईश्वरी अवसरे, दिया यादव, श्रेया एस चव्हाण (विकेटकीपर), समायरा राघव, कुमारी पलक, उमा काशवी, अक्षत परमार, अनादि तागडे, पलक सिंग.

वाशिममध्ये हॉटेल्समध्ये घरगुती गॅसचा वापर; शासकीय नियम धाब्यावर, पुरवठा विभागाच्या कारवाईची प्रतीक्षा

Finance Ministry Report Q3 Economy : भारतीय अर्थव्यवस्थेची गती पुन्हा सुसाट? वित्त मंत्रालयाच्या अहवालात महत्त्वाचे संकेत; बदलाचा पॅटर्न काय?

World News : पृथ्वीवरील AI डेटा सेंटर्सना एलॉन मस्क दाखवणार अवकाशाचा रस्ता, सूर्यप्रकाशातून मिळणार ऊर्जा; तज्ज्ञांनी उपस्थित केले प्रश्न

Local Train Accident : 11 हजार व्होल्टची वायर ट्रेनवर पडली, डब्यात ठिणग्या अन् धूर; दक्षिणेश्वरमधील थरारक घटना

Windshield Fog Clear Tips: हिवाळ्यात कारच्या विंडशील्डवर धुक्याचा थर जमतोय? वापरा 'या' सोप्या ट्रिक्स, सेकंदात होईल व्हिजन क्लिअर