Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ! लिस्ट-ए क्रिकेटमध्ये रचला नवा इतिहास, डिव्हिलियर्स, बटलर टाकले मागे (फोटो सौजन्य : एक्स) Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ! लिस्ट-ए क्रिकेटमध्ये रचला नवा इतिहास, डिव्हिलियर्स, बटलर टाकले मागे (फोटो सौजन्य : एक्स)
Sports

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ! लिस्ट-ए क्रिकेटमध्ये रचला नवा इतिहास, डिव्हिलियर्स, बटलर टाकले मागे

वैभव सूर्यवंशीने भारत-अ विरुद्ध यूएई सामन्यात 53 चेंडूंत 204 धावांची ऐतिहासिक खेळी केली. 28 चेंडूंत शतक, 52 चेंडूंत द्विशतक आणि 28 षटकारांसह त्याने लिस्ट-ए क्रिकेटमध्ये विक्रमांची मालिका रचली.

Rakesh Khedekar
  • 28 चेंडूंत शतक; डिव्हिलियर्सचा विक्रम मोडला

  • एका षटकात ठोकल्या 30 धावा

  • एका षटकात ठोकल्या 30 धावा

Vaibhav Suryavanshi : अवघ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने आपल्या वादळी फलंदाजीने क्रिकेटविश्वाला थक्क केले आहे. भारत ए संघाकडून खेळताना वैभवने संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. त्याने अवघ्या 52 चेंडूंत द्विशतक झळकावत लिस्ट-ए क्रिकेटमधील सर्वात वेगवान द्विशतकाचा विक्रम आपल्या नावावर केला.

विशेष म्हणजे, 28 चेंडूंत शतक आणि 40 चेंडूंत दीडशतक पूर्ण करत त्याने विक्रमांची मालिकाच रचली. त्याच्या या तुफानी खेळीच्या जोरावर भारत-अने यूएईवर 7 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला.

28 चेंडूंत शतक; डिव्हिलियर्सचा विक्रम मोडला

यूएईने प्रथम फलंदाजी करताना हरप्रीत सिंग भाटियाच्या 130 धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर 8 बाद 249 धावा केल्या. भारताकडून अर्शद खानने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात वैभवने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली. त्याने अवघ्या 28 चेंडूंत शतक पूर्ण केले. यासह लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावणारा फलंदाज होण्याचा मान त्याने मिळवला.

यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या जेक फ्रेझर-मॅकगर्कने 2023 मध्ये तस्मानियाविरुद्ध 29 चेंडूंत शतक झळकावले होते. तर एबी डिव्हिलियर्सने 2015 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 31 चेंडूंत शतक पूर्ण केले होते. वैभवने या दोघांनाही मागे टाकले.

एका षटकात ठोकल्या 30 धावा

वैभवच्या फलंदाजीचा आक्रमकपणा इतका होता की, त्याने डावाच्या सातव्या षटकातील सर्व सहा चेंडूंवर चौकार-षटकारांची आतषबाजी केली. 6, 4, 4, 6, 6, 4 अशा फटक्यांसह त्याने या षटकात तब्बल 30 धावा वसूल केल्या.

त्यानंतर अवघ्या 40 चेंडूंत दीडशतक पूर्ण केले. यापूर्वी त्याने 2025 मध्ये बिहारकडून खेळताना अरुणाचल प्रदेशविरुद्ध 59 चेंडूंत दीडशतक झळकावले होते. आता स्वतःचाच विक्रम मोडत त्याने नवा इतिहास रचला.

52 चेंडूंत द्विशतक; 28 षटकारांची आतषबाजी

वैभवने 52 चेंडूंत द्विशतक पूर्ण करत लिस्ट-ए क्रिकेटमधील सर्वात वेगवान द्विशतकाचा विक्रम केला. यापूर्वी न्यूझीलंडच्या चॅड बोवेसने 2024 मध्ये कँटरबरीकडून खेळताना ओटागोविरुद्ध 103 चेंडूंत द्विशतक झळकावले होते.

वैभवने या सामन्यात 53 चेंडूंत 7 चौकार आणि तब्बल 28 षटकारांच्या मदतीने 204 धावा केल्या. लिस्ट-ए क्रिकेटमधील एका डावात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रमही त्याने आपल्या नावावर केला. यापूर्वी डार्सी शॉर्टच्या नावावर 23 षटकारांचा विक्रम होता.

वैभवच्या या ऐतिहासिक खेळीमुळे भारत-अने अवघ्या 14.2 षटकांत 3 विकेट्स गमावत 253 धावा करून विजय मिळवला.

Ultraviolette X-47 व्हेनमच्या डिलिव्हरी सुरू! एका चार्जमध्ये 343km रेंज, किंमत 2.65 लाखांपासून सुरु

Hema Malini: 'माझं दुःख अजूनही कमी झालेलं नाही...' धर्मेंद्र यांच्या आठवणीत हेमा मालिनींचं काळीज हेलावणारं वक्तव्य

Yellanki Polytechnic College Viral Video: WhatsApp चॅटचे स्क्रीनशॉट पाहताच विद्यार्थ्यांचा संताप अनावर; प्राध्यापकाला बेदम मारहाण

Kashi Kartik Purnima : काशीमध्ये कार्तिक पौर्णिमेला श्रद्धेचा महापूर! 'हर हर महादेव'च्या जयघोषाने गंगाघाट दुमदुमले

Best Touring Bikes Under 5 lakhs: भारतातील 5 लाख रुपयांखालील सगळ्यात भारी टुरिंग बाईक्स! आत्ताच पाहा