Google Map Update: गुगल मॅपमुळे आपण चुकीच्या ठिकाणी कसं पोहोचतो? काय आहेत कारण?  
विज्ञान तंत्रज्ञान

Google Map Update: गुगल मॅपमुळे आपण चुकीच्या ठिकाणी कसं पोहोचतो? काय आहेत कारण?

गेल्या काही दिवसांत गुगल मॅपमुळे अनेक अपघात झाल्याचं समोर आलं आहे. पण हे अपघात नेमके झाले कसे? गुगल मॅपमुळे लोकं रस्ता कसे काय चुकले, यामागील नेमकी कारण काय आहेत? याबद्दल आता आपण जाणून घेऊया.

हर्षदा जाधव

गुगल मॅप हे नेव्हिगेशनचे सर्वात विश्वसनीय अ‍ॅप आहे. गुगल मॅप आपल्याला केवळ मार्गच दाखवत नाही तर रहदारीची माहिती देखील देते. अनेकदा असे घडते की गुगल मॅप आपल्याला चुकीच्या ठिकाणी घेऊन जाते. गेल्या काही दिवसांत गुगल मॅपमुळे झालेल्या अपघातांची संख्या प्रचंड वाढली आहे. अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत, जे अपघात गुगल मॅपमुळे झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी एक अशी घटना समोर आली होती, ज्यामध्ये गुगल मॅपने दाखवलेल्या रस्त्यावर कार जात होती. काही अंतरावर जाताच ती गाडी नदीत कोसळली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला होता. एका अपघातात गुगल मॅपने दाखवलेल्या रस्त्यावरून जाताना दुचाकी खांबाला धडकली होती. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला होता, तर एकजण गंभीर जखमी झाला होता. एका घटनेत गुगल मॅपमुळे एक कुटूंब जंगलात अडकले होते. अशी अनेक प्रकरण आहेत ज्यामध्ये प्रवासी गुगल मॅपमुळे रस्ता चुकले आहेत. (फोटो सौजन्य – pinterest)

पण या सर्व अपघातानंतर असा प्रश्न आता निर्माण होत आहे की, गुगल मॅपमुळे आपण रस्ता नेमका चुकतो तरी कसा? यामागचं कारण नेमकं आहे तरी काय? या सर्वांवरचा उपाय काय आहे? याबद्दल आता जाणून घेऊया.

गुगल मॅपमुळे रस्ता चुकण्याची कारणं

डेटा त्रुटी

गुगल मॅपच्या डेटाचा आधार यूजर्सचा रिपोर्ट आणि सार्वजनिक माहिती आहे. एखाद्या स्थानाचा डेटा चुकीचा किंवा अपूर्ण असल्यास, गुगल मॅप चुकीचे स्थान दर्शवू शकतो.

GPS सिग्नल समस्या

जेव्हा तुमचा फोन कमकुवत GPS सिग्नल पकडतो, तेव्हा लोकेशन अचूक नसते. ही समस्या घनदाट जंगले, डोंगराळ भागात किंवा खराब हवामानात उद्भवते.

मानवी चूक

काहीवेळा लोक मॅन्युअली गुगल मॅपवर चुकीचे स्थान जोडतात, ज्यामुळे गोंधळ निर्माण होतो.

जुने किंवा चुकीचे मार्ग अपडेट

मार्गावर नवीन बांधकाम सुरु असल्यास किंवा रस्ता बंद असल्यास मॅपवर ही माहिती अपडेट करणं गरेजंच आहे. गुगल मॅपवर जुन्या मार्गाची माहिती योग्यरित्या अपडेट न केल्यास रस्ता चुकण्याच्या समस्या निर्माण होतात.

चुकीचा रस्ता टाळण्याचे मार्ग

लोकेशन पुन्हा व्हेरिफाय करा

एखाद्या ठिकाणी जाण्यापूर्वी, त्याचे नाव आणि पत्ता काळजीपूर्वक तपासा.

सॅटेलाइट व्यूचा वापर करा

लोकेशन बरोबर आहे की नाही हे पाहण्यासाठी मॅपला सॅटेलाइट व्यूमध्ये बदला.

ऑफलाइन मॅप डाउनलोड करा

प्रवास करण्यापूर्वी, त्या भागाचा ऑफलाइन मॅप डाउनलोड करा जेणेकरून इंटरनेट नसतानाही तुम्हाला योग्य मार्ग सापडेल.

रिव्यू वाचा

गुगल मॅपवर स्थानाची रिव्यू वाचा. हे चुकीचे स्थान होण्याची शक्यता कमी करते.

लोकल गाइडची मदत घ्या

मार्गाबद्दल काही शंका असल्यास, स्थानिक लोकांना विचारणे चांगले. गुगल मॅप्स हे एक अप्रतिम तंत्रज्ञान आहे, पण त्याचा योग्य वापर करणे महत्त्वाचे आहे. थोडी सावधगिरी बाळगल्यास, आपण चुकीच्या ठिकाणी पोहोचणे टाळू शकता आणि आपला प्रवास सुलभ करू शकता.

Suresh Raine BirthDay, त्याचा 'हा' खास विक्रम तुम्हाला ठाऊक आहेत का?

Saurav Das Oxford Event London: सौरव दास ऑक्सफर्डला जाण्यापासून का रोखले? केंद्र सरकारचे उच्च न्यायालयाला उत्तर

सिम ॲक्टिव ठेवण्यासाठी हे आहेत BSNL चे स्वस्त रिचार्ज प्लॅन्स! किंमत केवळ 99 रुपयांपासून सुरु; वाचा संपूर्ण यादी

महिलांच्या आरोग्यासाठी वरदान वरदान ठरतात 'हे' पदार्थ, रोगप्रतिकारशक्ती निरोगी राहण्यासोबतच हृदयाला होतील फायदे

NSE Global Ranking : सांगता काय? भारतीय शेअर बाजाराचा जागतिक डंका! NSE बनले जगातील तिसरे सर्वात मोठे एक्सचेंज