आता चक्क AI ठरवणार कर्मचाऱ्यांचं अप्रेजल! Meta ने जारी केला अजब गजब नियम, वाचून तुम्हीही व्हाल हैराण  
विज्ञान तंत्रज्ञान

आता चक्क AI ठरवणार कर्मचाऱ्यांचं अप्रेजल! Meta ने जारी केला अजब गजब नियम, वाचून तुम्हीही व्हाल हैराण

Meta AI: आपण आपल्या रोजच्या जीवनात विविध कामांसाठी AI चा वापर करत आहोत. पण तुम्ही कधी विचार केला का, AI चा वापर आता कर्मचाऱ्यांची वेतनवाढ ठरवणार आहे? याबाबत आता मेटाने घोषणा देखील केली आहे.

हर्षदा जाधव
  • मेटाचा AI चा वापर करण्यावर जास्त भर
  • मेटाने घेतलेला निर्णय योग्य असल्याचं अनेकांचं मत
  • अनेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना AI वापर करणं बंधकारक

जगातील अनेक मोठं-मोठ्या कंपन्यांनी प्रोडक्टिविटी वाढवण्यासाठी AI चा वापर करण्यास सुरुवात केली आहे. अनेक कंपन्या त्यांची कामं अधिक वेगाने पूर्ण व्हावीत यासाठी AI चा वापर करण्यावर जास्त भर देत आहेत. मात्र आता टेक जायंट कंपनी मेटाने एक अनोखाा नियम जारी केला आहे. कर्मचाऱ्यांच्या AI वापरावर त्यांची वेतनवाढ ठरवली जाणार आहे. हा नियम खरं तर हैराण करणार आहे. मात्र AI चा वाढता वापर पाहता, मेटाने घेतलेला हा निर्णय योग्य असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.

कर्मचाऱ्यांना AI वापर करणं बंधकारक

मिळालेल्या माहितीनुसार, आता मेटा त्यांचे कर्मचारी AI चा किती वापर करतात, या आधारावर त्यांची वेतनवाढ ठरवली जाणार आहे. जर एखादा कर्मचारी AI चा वापर करत नाही, असे कंपनीला आढळले तर त्यांची वेतनवाढ केली जाणार नाही. याच निर्णयामुळे आता कंपनी त्यांचा इवेल्यूशन प्रोग्राम देखील बदलणार आहे. केवळ मेटाच नाही तर इतर अनेक कंपन्यांनी देखील हा निर्णय आधीच घेतला आहे. त्यामुळे आता अनेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना AI वापर करणं बंधकारक आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

पुढील वर्षी बदलणार नियम

मेटाने सांगितलं आहे की, हा नियम पुढील वर्षी लागू केला जाणार आहे. म्हणजेच कंपनी यावर्षी वेतनवाढीसाठी कर्मचाऱ्यांचा AI वापर पाहणार नाही. मात्र पुढील वर्षीपासून यावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. कंपनी त्यांच्या वर्कप्लेस कल्चरमध्ये AI इंटीग्रेट करण्यासोबतच कर्मचाऱ्यांना AI चा वापर करण्यासाठी प्रोत्साहित देखील करणार आहे. कंपनीची अशी इच्छा आहे की, कर्मचाऱ्यांनी चांगल्या रिझल्टसाठी AI चा जास्तीत जास्त वापर करावा. मेटामधील हेड ऑफ पीपल जेनेल गाले यांनी सांगितलं आहे की, जे कर्मचारी AI चा चांगला आणि जास्तीत जास्त वापर करणार आहेत, त्यांना रिवॉर्ड दिले जाणार आहेत.

कंपनीत अनेक कामांसाठी AI ची मदत

मेटाने हायरिंगपासून इतर अनेक कामांमध्ये आधीपासूनच AI टूल्सचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. आता कोडिंग इंटरव्यू देणारे कँडिडेट देखील AI चा वापर करू शकणार आहेत. याशिवाय मेटा लवकरच नवीन AI परफॉर्मेंस असिस्टेंट देखील घेऊन येणार आहे, जे कर्मचाऱ्यांना रिव्ह्यु आणि फिडबॅकसाठी मदत करणार आहे. त्याच्या मदतीने, कर्मचारी त्यांच्या कामात AI वापरून चांगले परिणाम देऊ शकतात हे सांगू शकतील.

इतर कंपन्यांमध्ये सुरु झाली प्लॅनिंग

मेटासह इतर अनेक कंपन्या AI चा वापर करणाऱ्यावर भर देत आहेत. मेटाप्रमाणेच गूगल, माइक्रोसॉफ्ट आणि अ‍ॅमेझॉन देखील कर्मचाऱ्यांना रोजची काम पूर्ण करण्यासाठी AI चा वापर करण्यास सांगत आहेत.

💡Frequently Asked Questions

Que: Meta मध्ये कोणते अ‍ॅप्स येतात?
Ans: Facebook, Instagram, WhatsApp, Messenger आणि Threads सारखी अ‍ॅप्स

Que: Meta मध्ये Two-Factor Authentication कसे सुरू करायचे?
Ans: Settings → Security → 2FA → SMS / Authentication App द्वारे सक्रिय करता येते.

Que: Meta Verified म्हणजे काय?
Ans: Meta Verified हा पेड सब्स्क्रिप्शन आहे ज्यात व्हेरिफाइड बॅज, अतिरिक्त सुरक्षा फीचर्स आणि प्रायोरिटी सपोर्ट मिळतो.

पुणे शहर विद्रूपीकरण पुरस्कारात सत्ताधारी पक्षाचे नेते अव्वल! स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांना ‘साहेब’ किताब

World News : सौदी अरेबियाच्या रास तनुरा तेल रिफायनरीवर हौथींचा हल्ला; आगीचा दावा, चार ड्रोन पाडल्याची माहिती

Big Breaking: क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडणार! एकाच टीममध्ये पुरुष-महिला खेळणार; Zaheer khan च्या 'Equal' ची घोषणा

Pune Court Firing : 'महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे का?' हर्षवर्धन सपकाळ संतापले; फडणवीस सरकारवर गंभीर आरोप!

Sachin Tendulkar Foundation : सारा आणि सानिया तेंडुलकर यांची रांचीतील युवा शाळेला भेट; मुलींसाठी उभारणार नवी शाळा