व्हिडिओ गॅलरी

Ahilyanagar: गरीब शेतकरी कुटुंबाची आर्थिक पिळवणूक, आधार हॉस्पिटलवर गंभीर आरोप, आरोग्य यंत्रणा हादरली

पुणे जिल्ह्यातील शिंगवे पारगाव येथील 'आधार मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल' आणि निमगाव सावा येथील एका डॉक्टरांवर आयुष्मान भारत योजनेच्या नावाखाली रुग्णाची आर्थिक पिळवणूक केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

वैष्णवी कामडी

पुणे जिल्ह्यातील शिंगवे पारगाव येथील 'आधार मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल' आणि निमगाव सावा येथील एका डॉक्टरांवर आयुष्मान भारत योजनेच्या नावाखाली रुग्णाची आर्थिक पिळवणूक केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अपघातात जखमी झालेल्या एका शेतकरी कुटुंबातील रुग्णाकडून मोफत उपचार योजनेचे कार्ड असतानाही रोख रक्कम घेतल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तसेच अतिरिक्त पैशांची मागणी करत रुग्णाला तब्बल 24 तास हॉस्पिटलमध्ये रोखून ठेवल्याचा, पावती देण्यास टाळाटाळ केल्याचा आणि तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचाही दावा करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे आयुष्मान भारत योजनेच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, संबंधित हॉस्पिटल प्रशासनाने आरोपांवर सविस्तर प्रतिक्रिया दिलेली नसून, या प्रकरणाची चौकशी आणि दोषींवर कारवाईची मागणी होत आहे. प्रकरणातील सर्व आरोप हे तक्रारदारांनी केलेले असून संबंधित यंत्रणांच्या चौकशीनंतरच अंतिम तथ्य स्पष्ट होईल.

पुणे शहर विद्रूपीकरण पुरस्कारात सत्ताधारी पक्षाचे नेते अव्वल! स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांना ‘साहेब’ किताब

World News : सौदी अरेबियाच्या रास तनुरा तेल रिफायनरीवर हौथींचा हल्ला; आगीचा दावा, चार ड्रोन पाडल्याची माहिती

Big Breaking: क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडणार! एकाच टीममध्ये पुरुष-महिला खेळणार; Zaheer khan च्या 'Equal' ची घोषणा

Pune Court Firing : 'महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे का?' हर्षवर्धन सपकाळ संतापले; फडणवीस सरकारवर गंभीर आरोप!

Sachin Tendulkar Foundation : सारा आणि सानिया तेंडुलकर यांची रांचीतील युवा शाळेला भेट; मुलींसाठी उभारणार नवी शाळा