VIRAL

ऑफिसचं काम सोडून 6-6 तास टॉयलेटमध्ये बसत होता कर्मचारी, सत्य समोर आल्यानंतर..

त्याचा रेकॉर्ड जेव्हा तपासण्यात आला त्यावेळी दिवसातील 196 मिनिटं म्हणजे तीन तासांच्या वर तो टॉयलेटमध्येच जाऊन बसत असल्याचं निदर्शनास आलं होतं.

Pravina Shirpurkar

नवी दिल्ली - खूप कमी कर्मचारी (Empyoee) असतात की ज्यांना आपण करत असलेली नोकरी (Job) मनापासून आवडत असते. पण जेव्हा काम करण्याची वेळ येते, तेव्हा त्यांना किमान जबाबदारीची जाणीव असते. प्रामाणिकपणे त्यांना देण्यात आलेलं काम पूर्ण करण्याचा ते प्रयत्न तरी करीत असतात. मात्र एखादीच अशी व्यक्ती असते की जी आपल्याला नेमून दिलेलं काम टाळण्यात आणि बेजबाबदारपणे वागण्यात माहीर असते. अशी माणसं काम कसं टाळायचं यात प्रावीण्य मिळवून असतात.

दक्षिण चीनमधल्या (China) एका वृत्तसंस्थेनं अशाच एका कामचुकार कर्मचाऱ्याची बातमी प्रसिद्ध केलेली आहे. हा कर्मचारी ऑफिसात काम करण्याचं सोडून 6-6 तास ऑफिसच्या टॉयलेटमध्ये (Toilet) जाऊन बसत होता. ऑफिसात आल्यानंतर थोड्या-थोड्या वेळानं टॉयलेटमध्ये बसणे, हा त्याला छंदच जडलेला होता. सुरुवातीला ही बाब कामाच्या रगाड्यात फारशा कुणाच्या लक्षात आली नाही. मात्र नंतर जेव्हा हे सत्य समोर आलं, तेव्हा या टॉयलेट ब्रेकमुळं या कर्मचाऱ्याला नोकरीला मुकावं लागलं आहे.

 6 तासांचा घेत होता टॉयलेट ब्रेक

वांग नावाचा हा कतर्मचारी 2006 साली एखा खासगी कंपनीत नोकरीला लागला होता. 2013 सालापर्यंत तो कंत्राटाच्या पद्धतीनं या ठिकाणी नोकरी करीत असे. 2014 साली या कर्मचाऱ्याला पचनाबाबत आजार झाला. त्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले. उपचारानंतरही त्याला बऱ्याच व्याधी आणि अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळेच दिवसातून 3 ते 6 तास हा पठ्ठ्या टॉयलेटमध्ये जाऊन बसत असे.

रेकॉर्ड तपासण्यात आले

आजारपणामुळे हे करावं लागत असल्याचं या कर्मचाऱ्याचं म्हणणं होतं. त्याचा रेकॉर्ड जेव्हा तपासण्यात आला त्यावेळी दिवसातील 196 मिनिटं म्हणजे तीन तासांच्या वर तो टॉयलेटमध्येच जाऊन बसत होता. त्यानंतर कंपनीनं त्याचं कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं. या मुद्द्यावर या कर्मचाऱ्यानं कोर्टात धाव घेतली. कोर्टात न्यायाधीशांनीही या कर्मचाऱ्याला चांगलंच सुनावलं. आता सोशल मीडियावर ही बाब चांगलीच चर्चिली जातेय.

पुणे शहर विद्रूपीकरण पुरस्कारात सत्ताधारी पक्षाचे नेते अव्वल! स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांना ‘साहेब’ किताब

World News : सौदी अरेबियाच्या रास तनुरा तेल रिफायनरीवर हौथींचा हल्ला; आगीचा दावा, चार ड्रोन पाडल्याची माहिती

Big Breaking: क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडणार! एकाच टीममध्ये पुरुष-महिला खेळणार; Zaheer khan च्या 'Equal' ची घोषणा

Pune Court Firing : 'महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे का?' हर्षवर्धन सपकाळ संतापले; फडणवीस सरकारवर गंभीर आरोप!

Sachin Tendulkar Foundation : सारा आणि सानिया तेंडुलकर यांची रांचीतील युवा शाळेला भेट; मुलींसाठी उभारणार नवी शाळा